शेतकरी मित्रांनो! 5 मिनिटात मोबाईलवरच मिळवा तुमचा Farmer ID…. ओळखपत्र डाऊनलोड करण्याची सोपी पद्धत
Farmer ID Download:- राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी फार्मर आयडीसाठी नोंदणी केली असून, त्यांना आता युनिक आयडी मंजूर झाल्याचे संदेश मिळू लागले आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी हा आयडी कसा डाउनलोड करायचा, याबद्दल उत्सुक आहेत. राज्य सरकारने अग्रिस्टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी हा फार्मर आयडी सुरू केला आहे. या आयडीच्या माध्यमातून शेतजमिनीची संपूर्ण माहिती, पिकांचे उत्पादन, बाजारभाव, डिजिटलायझेशन आणि जमीन मालकीशी संबंधित सर्व महत्त्वाची माहिती एका ठिकाणी उपलब्ध होणार आहे. परिणामी, सरकारी योजनांचा लाभ अधिक सुलभतेने मिळू शकतो.
फार्मर आयडी डाऊनलोड करण्याची प्रक्रिया
फार्मर आयडी डाउनलोड करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. यासाठी, प्रथम शेतकऱ्यांनी https://apfr.agristack.gov.in/farmer-registry-ap/#/checkEnrolmentStatus या अधिकृत वेबसाईटवर जावे. त्यानंतर, आपला आधार क्रमांक प्रविष्ट करून सबमिट करावा. जर शेतकरी आधीच नोंदणी केलेला असेल, तर त्याचा संपूर्ण तपशील स्क्रीनवर दिसेल. आधार क्रमांक सबमिट केल्यानंतर, संबंधित शेतकऱ्याचा युनिक फार्मर आयडी स्क्रीनवर दर्शविला जाईल. मात्र, सध्या या माहितीमध्ये कोणतीही दुरुस्ती करण्याचा पर्याय उपलब्ध नाही, त्यामुळे पूर्वी नोंदणी करताना दिलेली माहितीच दाखवली जाणार आहे.
पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करा
फार्मर आयडीचे पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी, वेबसाईटवर 'View Details' या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, संपूर्ण माहिती पाहता येते. त्याच पानावर 'Generate PDF' किंवा 'Download PDF' हा पर्याय दिसेल. 'Download PDF' वर क्लिक केल्यावर फार्मर आयडी पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करता येतो, तसेच त्याची प्रिंटही काढता येते. यामुळे शेतकऱ्यांकडे अधिकृत ओळखपत्राची डिजिटल प्रत सहज उपलब्ध होईल, जी भविष्यात वेगवेगळ्या सरकारी योजनांमध्ये उपयोगी पडू शकते.
लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कृषी मंत्री यांच्या हस्ते हे कार्ड अधिकृतरित्या वितरित केले जाणार आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणीच्या पत्त्यावर हे कार्ड पोस्टाने मिळेल. तसेच, इच्छुक शेतकरी हे कार्ड स्वतःही Agristack च्या अधिकृत संकेतस्थळावरून डाउनलोड करू शकतील. यामुळे शेतकऱ्यांना सरकारच्या योजनांचा लाभ अधिक जलद आणि पारदर्शक पद्धतीने मिळेल.
फार्मर आयडीमुळे शेतकऱ्यांना मिळणारे फायदे
फार्मर आयडीमुळे शेतकऱ्यांना अनेक फायदे मिळतील. सर्वप्रथम, हा आयडी असलेल्या शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ सहज मिळू शकतो. यामध्ये पीकविमा योजना, अनुदाने आणि डिजिटल शेतकीशी संबंधित अनेक सुविधा एका प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होतील. याशिवाय, बँका आणि वित्तीय संस्थांकडून मिळणाऱ्या कर्ज प्रक्रियेसाठीही फार्मर आयडी एक महत्त्वाचा दस्तऐवज ठरणार आहे. त्यामुळे जर एखाद्या शेतकऱ्याने अद्याप त्याचा फार्मर आयडी डाउनलोड केलेला नसेल, तर त्याने वरील प्रक्रिया पूर्ण करून तो त्वरित डाउनलोड करावा आणि भविष्यातील योजनांचा लाभ घ्यावा.