लाडकी बहिणींसाठी सगळ्यात मोठी खुशखबर! उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली सर्वात मोठी अपडेट…..
Majhi Ladki Bahin Yojana:- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही एक महत्त्वाची योजना असून योजनेच्या माध्यमातून पात्र महिला लाभार्थ्यांना महिन्याचे 1500 रुपये बँक खात्यात जमा करण्यात येतात. जेव्हापासून या योजनेची सुरुवात झाली तेव्हापासून ही योजना अनेक बाबतीत चर्चेत राहिली.
विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या आधी घोषणा करण्यात आलेल्या या योजनेमुळे महायुतीला खूप मोठा फायदा झाल्याचे देखील बोलले गेले व महायुतीला राज्याच्या सत्तास्थानी बसवण्यामध्ये या योजनेचा मोठा हातभार लागला.
आतापर्यंत या योजनेचे जवळपास सहा हप्त्यांचे वितरण करण्यात आलेले आहे व आता जानेवारीतील मिळणाऱ्या हफ्त्याची प्रतीक्षा लाडक्या बहिणींना लागून राहिलेली आहे. याबाबतीत आता महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
काय म्हणाले राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार?
माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्त्याची प्रतीक्षा असताना आता स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री,अर्थमंत्री अजित पवार यांनी यावर भाष्य केले व त्यांनी म्हटले की, ही योजना कोणत्याही परिस्थितीत चालूच राहणार आहे.
त्यामुळे कुठल्याही पद्धतीची काळजी करण्याची गरज नाही. फक्त या योजनेचा लाभ गरजू महिलेला मिळणे महत्वाचे आहे व जी व्यक्ती श्रीमंत आहे, टॅक्स भरते किंवा ज्यांचा ऊस चांगला जातो अशांबाबत वेगळा विचार करणार असल्याचे त्यांनी म्हटले.
परंतु ही योजना ज्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचायला हवी त्यांच्यापर्यंत ही योजना पोहोचवण्याचं काम राज्याच्या महिला व बालविकास विभागाने केले असून परवाच या योजनेसाठी 3700 कोटींचा चेक महिला आणि बाल विकास खात्याला दिला असल्याचे महत्त्वाची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे 26 जानेवारी च्या आत लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये या योजनेचा सातवा हप्ता जमा होईल असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
आदिती तटकरे यांनी दिली होती महत्त्वाची माहिती
इतकेच नाही तर राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी देखील याबाबतीत काही दिवसांपूर्वीच महत्वाची माहिती दिली होती. येत्या आठ ते दहा दिवसात लाडक्या बहिणींना या महिन्याचा हप्ता मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.
या योजनेचा हप्ता राज्य सरकार 26 जानेवारीच्या आधी वितरित करायला सुरुवात करेल व यासंदर्भाचे आर्थिक नियोजन आम्हाला अर्थ खात्याकडून महिला व बालविकास विभागाला प्राप्त झाल्याची त्यांनी सांगितले होते. त्यामुळे आता 26 जानेवारीच्या आधी या योजनेचा लाभ महिलांना द्यायला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली होती.
तसेच नवीन अर्थसंकल्प मांडण्यात आल्यानंतर राज्यातील लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल.परंतु तोपर्यंत तरी लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयांचा लाभ आपण देणार आहोत असे देखील त्यांनी म्हटले आहे.