महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात कापूस खरेदीचा श्री गणेशा ! मुहूर्ताच्या कापसाला मिळाला 'हा' भाव
Cotton Rate Maharashtra : महाराष्ट्रात दरवर्षी विजयादशमीपासून नव्या कापसाची आवक वाढत असते. यंदाही महाराष्ट्रात दसरा झाल्यापासून हळूहळू कापसाची आवक वाढू लागली आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या कापूस वेचणी सुरू असून ज्या शेतकऱ्यांचा कापूस वेचणी झाला आहे ते शेतकरी बांधव आपला माल विक्रीसाठी बाजारात नेत आहेत.
दरम्यान राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी हाती आली आहे. विदर्भ विभागातील चंद्रपूर जिल्ह्यातील पारस कॉटन इंडस्ट्रीज येथे कापूस खरेदीचा श्री गणेशा करण्यात आला आहे. या शुभमुहूर्तावर कापसाला सात हजार 209 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे.
सध्या दिवाळीचा सण सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांना पैशांची निकड असून शेतकरी बांधव कापूस वेचणी झाल्याबरोबर आपला माल विकत आहे. यातून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कापूस खरेदीला सुरुवात झाली आहे.
चंद्रपूर मध्ये ही कापूस खरेदीला सुरुवात झाली असून येथील पारस कॉटन इंडस्ट्रीज येथे मुहूर्ताच्या कापसाला सात हजार 209 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे. दरम्यान आता आपण कालच्या लिलावात राज्यातील प्रमुख बाजारांमध्ये कापसाला नेमका काय दर मिळाला आहे याबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात कापसाला किमान 5600, कमाल 7025 आणि सरासरी 6550 असा भाव मिळालाय.
सावनेर कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात कापसाला किमान 7000, कमाल 7000 आणि सरासरी 7000 असा भाव मिळाला आहे.
किनवट कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात कापसाला किमान 6400, कमाल 6600 आणि सरासरी 6500 असा दर मिळाला आहे.
भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात कापसाला सरासरी सात हजाराचा भाव मिळाला आहे.
वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात कापसाला किमान 6 हजार 700, कमाल 7000 आणि सरासरी 6900 असा दर मिळाला आहे.
वर्धा कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात कापसाला किमान 7,000 कमाल 7250 आणि सरासरी सात हजार शंभर रुपये भाव मिळाला आहे.