कृषी बातम्यासरकारी योजनाबाजारभावयशोगाथाहवामानस्पेशल स्टोरी
Advertisement

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! टोमॅटो,कांदा आणि बटाट्याचा वाहतूक आणि साठवणुकीचा खर्च आता Government देणार?

05:05 PM Feb 13, 2025 IST | Krushi Marathi
potato crop

Government Decision:- सध्या टोमॅटोच्या किमतीत मोठ्या प्रमाणात घट झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. विशेषतः दिल्ली, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि ओडिशामधील बाजारपेठांमध्ये टोमॅटोचा दर प्रति किलो २ ते ३ रुपयांवर आला आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही भरून निघत नाही.

Advertisement

परिणामी अनेकांनी उभ्या पिकांमध्ये गुरांना चारण्यासाठी सोडले किंवा शेतातच टाकून दिली. ही परिस्थिती सुधारण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने टोमॅटोच्या वाहतूक आणि साठवणुकीच्या खर्चाची जबाबदारी उचलण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

Advertisement

केंद्र सरकारने घेतलेला निर्णय

केंद्र सरकारने बुधवारी स्पष्ट केले की बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत (MIS) सहकारी संस्था एनसीसीएफ (National Cooperative Consumers' Federation) मार्फत मध्य प्रदेश आणि इतर राज्यांमधील टोमॅटो साठवणूक व वाहतूक खर्चाची भरपाई केली जाईल. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन सहजपणे विक्रीसाठी पाठवणे सोपे होणार असून दर सुधारण्यास मदत होईल.

Advertisement

कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले की, मार्केट इंटरव्हेन्शन स्कीमअंतर्गत एनसीसीएफ वाहतूक खर्चाची अंमलबजावणी करणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना थेट मदत मिळेल. शेतमाल उत्पादक आणि ग्राहक राज्यांमध्ये मोठा किंमत फरक असतो. त्यामुळे उत्पादक राज्यांमधून ग्राहक राज्यांपर्यंत साठवणूक आणि वाहतुकीचा खर्च सरकारकडून भरून दिला जाईल.

Advertisement

नाफेड आणि एनसीसीएफ या नोडल एजन्सींमार्फत ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाईल. टोमॅटोसोबत कांदा आणि बटाट्यासाठीही हा निर्णय लागू होईल. यामुळे शेतकरी त्यांचे उत्पादन मोठ्या बाजारपेठेत पाठवू शकतील आणि त्यांना चांगला दर मिळण्याची शक्यता वाढेल. उत्पादक राज्यांमधील शेतकऱ्यांच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

हा निर्णय शेतकऱ्यांना मोठा आधार देणारा ठरेल.कारण बाजारातील अनिश्चिततेमुळे त्यांना वारंवार आर्थिक फटका बसत असतो. सरकारच्या या मदतीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल आणि त्यांची आर्थिक स्थिरता कायम राहण्यास हातभार लागेल.

Next Article