पीएम किसान योजनेचे आता 6000 नाही तर मिळतील 12000? पटकन करा ‘अशा पद्धती’ने घरबसल्या अर्ज! वाचा एका क्लिकवर
PM Kisan Yojana:- पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची अतिशय महत्त्वाची योजना असून सगळ्या योजनांमध्ये यशस्वी झालेली योजना म्हणून देखील ओळखले जाते. आपल्याला माहित आहे की, या योजनेच्या माध्यमातून वार्षिक सहा हजार रुपये तीन टप्प्यांमध्ये विभागून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये याप्रमाणे जमा करण्यात येतात.
आतापर्यंत पीएम किसान योजनेचे 18 हप्ते शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले आहेत व 24 फेब्रुवारी रोजी या योजनेचा 19 वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार असल्याची माहिती खुद्द देशाचे केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली आहे.
परंतु गेल्या काही दिवसांपासून जर आपण बघितले तर पीएम किसान योजनेच्या मिळणाऱ्या रकमेमध्ये वाढ करण्यात यावी अशा पद्धतीची मागणी सातत्याने केली जात आहे. त्या अनुषंगाने येणाऱ्या या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये या योजनेच्या रकमेत वाढ केली जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
त्यामुळे या रकमेत जर वाढ झाली तर लाखो शेतकऱ्यांना याचा खूप मोठ्या प्रमाणावर फायदा मिळू शकणार आहे. विशेष म्हणजे या योजनेची रक्कम वर्षाला 12000 रुपये करण्यात यावी अशा प्रकारची महत्त्वाची शिफारस संसदीय समितीने देखील केली आहे.
म्हणून सरकार आता अर्थसंकल्पामध्ये ही रक्कम एकतर दहा हजार रुपये किंवा 12 हजार रुपये पर्यंत वाढवेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु याबाबत केंद्र सरकारच्या माध्यमातून मात्र कुठल्याही स्वरूपाची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
नवीन असाल तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी घरबसल्या करा अर्ज
1- या योजनेचा लाभ घेण्यासाठी जर अर्ज करायचा असेल तर त्याकरिता तुम्हाला या योजनेच्या pmkisan.gov.in या संकेतस्थळावर जावे लागेल व त्या ठिकाणी न्यू फार्मर रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करावे.
2-त्यानंतर तुमचे नाव, आधार नंबर तसेच बँक खात्याची माहिती व जमीन विषयीची माहिती विचारली आहे ती पूर्ण नमूद करावी.
3-तसेच आधार कार्ड, बँकेचे पासबुक व जमिनीशी संबंधित कागदपत्रे अपलोड करणे गरजेचे राहील.
4- अशाप्रकारे संपूर्ण माहिती तुम्ही व्यवस्थित भरून अर्ज सबमिट करावा.
5- अर्ज सबमिट केल्यानंतर तुमच्या अर्जाची स्थिती तुम्ही काही दिवसांनी तपासू शकतात व तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर तुमच्या बँक खात्यात या योजनेचे पैसे जमा व्हायला लागतील.
अशा सोप्या पद्धतीने तुम्ही अगदी घरी बसून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून या योजनेचा लाभ मिळवू शकतात.