लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात! पटकन चेक करा 1500 आले की 2100?
Ladki Bahin Yojana:- महाराष्ट्र सरकारची लाडकी बहिण योजना ही महत्त्वाची योजना असून अनेक अर्थांनी ही योजना खूप महत्त्वपूर्ण ठरली आहे. राज्यामध्ये महायुतीचे सरकार स्थापन होण्यामागे या योजनेचा खूप मोठा हातभार असल्याचे देखील बोलले गेले. आपल्याला माहित आहे की, या योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थी महिलेच्या खात्यामध्ये पंधराशे रुपयांचा लाभ हा दर महिन्याला दिला जातो व आतापर्यंत साधारणपणे नऊ हजार रुपयांचा लाभ महिलांना देण्यात आलेला आहे.
तसेच या योजनेच्या अनुषंगाने बघितले तर विधानसभा निवडणुकीच्या कालावधीमध्ये महायुतीच्या माध्यमातून जो जाहीरनामा घोषित करण्यात आला होता त्यामध्ये जर महायुतीचे सरकार सत्तेत आले तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता पंधराशे रुपये ऐवजी 2100 रुपये करण्यात येईल. परंतु आता याबाबत अजून मात्र निर्णय घेण्यात आलेला नाही.
या सगळ्या पार्श्वभूमीवर मात्र महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होईल याची प्रतीक्षा होती. हा आता 26 जानेवारीच्या अगोदर महिलांच्या खात्यामध्ये येईल असे आश्वासन अर्थमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते व त्यानुसार 24 तारखेच्या सायंकाळपासून महिलांच्या खात्यामध्ये या योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे.
आतापर्यंत या योजनेचे जवळपास सहा हप्ते पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा झाले आहेत व आता सातवा हप्ता देखील जमा व्हायला सुरुवात झाली आहे. 24 जानेवारी च्या मध्यरात्रीपासून हे पैसे यायला सुरुवात झाली असून पात्र लाभार्थी महिलांनी आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक खाते तपासण्याचे आव्हान देखील करण्यात आलेले आहे.26 जानेवारी पर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात हे पैसे जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
पैसे आले की नाही कसे चेक करावे?
लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यात जमा झाले असेल तर तुमचा जो मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक असेल त्यांच्यावर तुम्हाला एसएमएस मिळाला असेलच.
परंतु काही अडचणी पुढे जर एसएमएस मिळाला नसेल तर तुम्ही बँकेच्या एप्लीकेशन मध्ये जाऊन स्टेटमेंट चेक करू शकतात किंवा बँकेत जाऊन स्टेटमेंट अपडेट करून पैसे आले की नाही ते तपासू शकतात. मात्र जर पैसे आले नसतील तर 26 जानेवारी पर्यंत प्रतीक्षा करणे गरजेचे आहे.
एकवीसशे रुपये केव्हा मिळणार?
जसे आपण बघितले की, महायुतीच्या माध्यमातून जाहीरनाम्यात घोषणा करण्यात आली होती की, जर महायुतीचे सरकार सत्तेत आले तर लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये ऐवजी 2100 रुपये देण्यात येतील. त्यामुळे साहजिकच हे 2100 रुपये कधीपासून मिळायला सुरुवात होईल? याबाबत पात्र लाभार्थी महिलांमध्ये मोठा प्रश्न आहे.
परंतु या बाबतीत जर बघितले तर महाराष्ट्र सरकारच्या अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये लाडक्या बहीण योजनेकरिता निधी वाढवून देण्यासाठी महिला व बालविकास खात्याकडून प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे व हा सादर करण्यात आलेला प्रस्ताव अर्थसंकल्पामध्ये मंजूर झाल्यानंतर पात्र महिलांना 1500 रुपयांना ऐवजी 2100 रुपये मिळणार आहेत.