कमी खर्चात मिळेल जास्त Profit! लागवड कराल ‘या’ 3 पिकांची तर दरवर्षी 7 ते 10 लाखांचा होईल हमखास फायदा
Profitable Crop:- शेतीत अधिक नफा मिळवण्यासाठी शेतकरी आता पारंपारिक पद्धतीऐवजी आधुनिक शेतीकडे वळत आहेत. पूर्वी प्रामुख्याने गहू, तांदूळ, डाळी आणि भाजीपाला यांचीच लागवड केली जायची पण बदलत्या काळानुसार बाजारातील मागणी आणि दर याचा विचार करता शेतकऱ्यांनी आता जास्त उत्पन्न देणाऱ्या आणि उच्च बाजारभाव असलेल्या पिकांकडे वळणे गरजेचे आहे.
कृषी तज्ज्ञही शेतकऱ्यांना अशी पिके निवडण्याचा सल्ला देतात. ज्यांना बाजारात सतत मागणी असते आणि चांगला दर मिळतो. भाजीपाला शेती हा सध्या सर्वाधिक नफा देणारा पर्याय आहे. कारण कमी गुंतवणुकीत जास्त परतावा मिळू शकतो. काही विशिष्ट पिके बाजारात हजारो रुपयांपर्यंत दर मिळवतात.त्यामुळे त्यांची लागवड फायदेशीर ठरू शकते.
ही आहेत फायद्याची पिके
शतावरी शेती
शतावरी ही भारतातील सर्वात महागड्या भाज्यांपैकी एक आहे. जी औषधी गुणधर्मांमुळे अत्यंत लोकप्रिय आहे. तिची बाजारातील किंमत 1200 ते 1500 रुपये प्रति किलो असते.तर काही वेळा ती 2000 रुपये प्रति किलोपर्यंत जाते. आयुर्वेदात शतावरीला अत्यंत महत्त्व आहे आणि तिला अनेक औषधांमध्ये वापरले जाते.
त्यामुळे भारतातच नाही तर परदेशी बाजारपेठेतही याची मोठी मागणी आहे. शतावरीच्या लागवडीसाठी हलकी आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन उपयुक्त ठरते. तसेच यासाठी फारसा खर्च येत नाही आणि कमी क्षेत्रातही भरघोस उत्पादन घेता येते. योग्य नियोजन आणि बाजारपेठेची माहिती असल्यास शतावरी शेती शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी ठरू शकते.
बोक चॉय शेती
बोक चॉय ही मूळतः चीनमध्ये प्रचलित असलेली भाजी असून आता भारतातही ती लोकप्रिय होत आहे. विशेषतः मोठ्या शहरांमध्ये हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि सुपरमार्केटमध्ये याला मोठी मागणी आहे. बोक चॉय ही एक परदेशी भाजी असून तिची लागवड भारतात मर्यादित प्रमाणात होते.
त्यामुळे तिच्या दरात मोठी चढउतार दिसून येते. भारतीय बाजारपेठेत तिच्या एका देठाची किंमत सुमारे 120 रुपये असते. त्यामुळे कमी क्षेत्रात अधिक उत्पादन घेऊन जास्त नफा मिळवण्यासाठी बोक चॉय लागवड फायदेशीर ठरू शकते.
या पिकाची शेती केवळ कमी क्षेत्रात केली तरीही त्यातून चांगले उत्पन्न मिळते. लागवडीसाठी साधारण 20-25 अंश सेल्सियस तापमान योग्य असते आणि चांगला निचरा असलेली जमीन यासाठी फायदेशीर ठरते.
बोक चॉय शेती अत्यंत जलद वाढणारी आहे आणि अवघ्या 45-50 दिवसांत कापणीसाठी तयार होते. त्यामुळे कमी वेळात अधिक उत्पादन मिळू शकते.
चेरी टोमॅटो शेती
चेरी टोमॅटो हे सामान्य टोमॅटोपेक्षा आकाराने लहान पण अधिक पौष्टिक असते. त्यामुळे आरोग्य तज्ज्ञ आणि डॉक्टर याच्या सेवनाचा सल्ला देतात. बाजारातही त्याची मागणी वाढत आहे आणि त्यामुळे साध्या टोमॅटोपेक्षा त्याची किंमत खूपच जास्त असते. सध्या चेरी टोमॅटोचा बाजारभाव प्रति किलो 350 ते 450 रुपये आहे. तर काही वेळा 500 रुपयांपर्यंतही जातो.
चेरी टोमॅटो शेती ही हरितगृह शेतीसाठी आदर्श मानली जाते. पण ते मोकळ्या शेतातही सहज उगवते. याला उष्ण आणि समशीतोष्ण हवामान अनुकूल असते. या पिकाला जास्त खतांची गरज नसते.मात्र योग्य प्रमाणात पाणी आणि जैविक खतांचा वापर केल्यास उत्पादन अधिक होते. शेतकऱ्यांनी बाजारपेठेचा अभ्यास करून योग्य वेळी विक्री केली, तर यातून मोठा नफा मिळवता येतो.
शेतीतून अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी बाजारपेठेचा अभ्यास आवश्यक
ही तिन्ही पिके पारंपारिक शेतीपेक्षा अधिक फायदेशीर आहेत. शतावरी, बोक चॉय आणि चेरी टोमॅटो यांना देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे. योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि योग्य बाजारपेठ शोधली तर कमी क्षेत्रातही जास्त उत्पन्न मिळू शकते.
त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपारिक शेतीला आधुनिक शेतीच्या तंत्रज्ञानासोबत एकत्र करून नव्या संधी शोधायला हव्यात. कमी गुंतवणुकीत अधिक नफा मिळवण्यासाठी आधुनिक शेतीचा स्वीकार करणे ही काळाची गरज आहे.