Yellow Peas Import Duty: हरभरा, तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सरकारच्या नव्या धोरणामुळे बाजारभावात होईल वाढ? वाचा सविस्तर
Yellow Peas Import:- पिवळा वाटाण्याच्या शुल्कमुक्त आयातीचा कालावधी संपल्यानंतर, १ मार्चपासून सरकारने मोठे धोरणात्मक बदल केले आहेत. यानुसार, आता पिवळा वाटाण्यावर ५० टक्के आयात शुल्क लागू करण्यात आले आहे. तसेच, यासाठी २०० रुपये प्रति किलो किमान आयात मूल्य निश्चित करण्यात आले आहे. या बदलांमुळे स्वस्त आयात रोखली जाणार असून, स्थानिक कडधान्य बाजाराला आधार मिळण्याची शक्यता आहे.
आयात धोरणातील महत्त्वाचे बदल
गेल्या काही महिन्यांपासून कडधान्याच्या वाढत्या किंमती रोखण्यासाठी सरकारने डिसेंबर २०२३ मध्ये पिवळा वाटाण्याच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी दिली होती. यामुळे मोठ्या प्रमाणावर स्वस्त दरात वाटाण्याची आयात झाली. मात्र, २८ फेब्रुवारी २०२४ रोजी हा कालावधी संपल्यानंतर, सरकारने कोणतीही नवीन मुदतवाढ न देता, पूर्वीच्या कठोर आयात अटी पुन्हा लागू केल्या आहेत. त्यामुळे, १ मार्चपासून आयात होणाऱ्या पिवळ्या वाटाण्यावर ५० टक्के शुल्क लागू करण्यात आले आहे आणि त्यासाठी किमान २०० रुपये प्रति किलो हा दर ठरवण्यात आला आहे.
फक्त कोलकाता बंदरावरच आयात
नवीन नियमांनुसार, पिवळ्या वाटाण्याची आयात फक्त कोलकाता बंदरावरच करता येणार आहे. यामुळे देशातील इतर प्रमुख बंदरांद्वारे होणारी मोठ्या प्रमाणातील आयात थांबेल, तसेच स्थानिक शेतकऱ्यांना फायदा मिळेल.
हरभरा, तूर बाजाराला फायदा होणार?
सरकारच्या या निर्णयाचा थेट परिणाम हरभरा, तूर आणि इतर कडधान्य बाजारावर होणार आहे. मागील काही महिन्यांपासून कडधान्याचे भाव हमीभावाच्या खाली आले होते, ज्यामुळे शेतकरी अडचणीत होते. हरभऱ्याचा दर सध्या ५,२०० रुपये प्रति क्विंटलवर आहे, तर तुरीचा दर ७,००० रुपयांवर पोहोचला आहे. पिवळ्या वाटाण्याच्या आयातीवर बंधने आल्याने, स्थानिक कडधान्य बाजाराला आधार मिळू शकतो आणि दर वाढण्याची शक्यता आहे.
बाजारात संभ्रमाचे वातावरण
सरकारच्या निर्णयामुळे हरभऱ्याच्या दरात ५० रुपये प्रति क्विंटल वाढ झाली आहे. मात्र, सरकार आयातीच्या धोरणात पुन्हा बदल करू शकते, अशी चर्चा बाजारात सुरू आहे. त्यामुळे व्यापारी आणि शेतकरी यांच्यात संभ्रमाचे वातावरण आहे. सरकारने पुढील धोरण लवकर स्पष्ट केल्यास, बाजार स्थिर होऊ शकतो.
सरकारच्या धोरणाचा संभाव्य परिणाम
स्वस्त आयात थांबेल, स्थानिक उत्पादकांना चांगला भाव मिळण्याची शक्यतापिवळ्या वाटाण्याच्या किंमतीत वाढ होऊ शकते
तूर, हरभऱ्याच्या दरात सुधारणा होण्याची शक्यता. तसेच आता सरकारच्या पुढील धोरणावर बाजारपेठेचा पुढील कल अवलंबून असेल सरकारने हे धोरण कायम ठेवले, तर स्थानिक कडधान्य बाजाराला चांगला आधार मिळू शकतो. मात्र, जास्त दर वाढल्यास सरकार पुन्हा धोरण बदलू शकते, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.