पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! लवकरच धावणार नागपूर ते पुणे वंदे भारत एक्सप्रेस; आली महत्त्वाची अपडेट
Vande Bharat Train:- महाराष्ट्रातील प्रमुख शहरांचा जर विचार केला तर यामध्ये मुंबई, पुणे आणि नागपूर हे महत्त्वाचे शहर असून शहरांमधील कनेक्टिव्हिटी वाढवणे खूप गरजेचे आहे. कारण महाराष्ट्राची राजधानी मुंबई व उपराजधानी नागपूर असून पुण्याला सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते व या सगळ्या दृष्टिकोनातून ही कनेक्टिव्हिटी खूप महत्त्वाची ठरणार आहे.
नागपूर ते मुंबईच्या बाबतीत जर आपण बघितले तर समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून उत्तम अशी कनेक्टिव्हिटी तयार करण्यात आली आहे व आता त्याही पुढे जात वंदे भारत एक्सप्रेसच्या माध्यमातून पुणे आणि नागपूर व नागपूर ते मुंबई ही महत्त्वाची शहरे जोडले जातील अशी एक शक्यता आहे.
येत्या काही महिन्यांमध्ये नागपूर ते पुणे आणि नागपूर ते मुंबई दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस धावेल अशी शक्यता असून या संदर्भातला एक महत्त्वाचा प्रस्ताव मध्य रेल्वेचे नागपूर मंडळाने रेल्वे बोर्डाकडे सादर केल्याची माहिती नागपूरचे नवनियुक्त डीआरएम विनायक गर्ग यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे.
नागपूर ते पुणे आणि नागपूर ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेस धावणार
सध्या जर आपण सुरू असलेल्या वंदे भारत एक्सप्रेस बघितले तर यामध्ये नागपूर येथून नागपूर ते सिकंदराबाद, नागपूर ते इंदोर आणि नागपूर ते भोपाळ अशा तीन वंदे भारत एक्सप्रेस सध्या सुरू आहेत व त्यामध्ये परत दोन वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात येण्याची शक्यता आहे.
यामध्ये नागपूर ते मुंबई आणि नागपूर ते पुणे या दोन्ही मार्गावर प्रवास करण्याची संख्या मोठी आहे व त्या तुलनेत मात्र रेल्वे गाड्यांची संख्या खूपच कमी आहे.
त्यामुळे या संदर्भात गेल्या वर्षापासून नागपूर ते मुंबई आणि नागपूर ते पुणे या दोन्ही मार्गावर नवीन गाड्या सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून सातत्याने करण्यात येत होती व त्या अनुषंगाने मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळांने रेल्वे बोर्डाच्या या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे.
वंदे भारत ट्रेन सुरू झाली तर नागपूर ते मुंबई प्रवास होणार दहा तासात पूर्ण
सध्या जर आपण नागपूर ते मुंबई या दोन्ही महत्त्वाच्या शहरा दरम्यानचा प्रवासाचा वेळ जर बघितला तर सुपरफास्ट एक्सप्रेसने साधारणपणे 12 ते 13 तास लागतात व दुरांतो एक्सप्रेसने अकरा ते बारा तासाचा कालावधी लागतो.
परंतु वंदे भारत एक्सप्रेस जर सुरू झाली तर नागपूर ते मुंबई हा प्रवास फक्त दहा तासात पूर्ण होणार व इतकेच नाहीतर नागपूर ते पुणे दरम्यान प्रवासाला 15 ते 16 तासाचा कालावधी लागतो.
त्यामुळे येणाऱ्या काळात जर नागपूर ते पुणे ही वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली तर या दोन्ही शहरातील प्रवासाचा वेळ साधारणपणे दोन ते तीन तासांनी कमी होणार आहे.