कृषी बातम्यासरकारी योजनाबाजारभावयशोगाथाहवामानस्पेशल स्टोरी
Advertisement

रब्बी हंगामात शेतकरी मालामाल होणार! 'या' जातीच्या गव्हातून शेतकऱ्यांना मिळणार 80 क्विंटलचे उत्पादन

10:48 PM Nov 08, 2024 IST | Krushi Marathi
Wheat Variety

Wheat Variety : सध्या संपूर्ण देशात रब्बी हंगामाची धावपळ सुरू आहे. रब्बी हंगामातील मुख्य पिकांच्या पेरणीच्या कामांनी गती पकडली आहे. रब्बी हंगामात दरवर्षी महाराष्ट्रात गहू आणि हरभरा या दोन पिकांचे मोठ्या प्रमाणात लागवड होते.

Advertisement

गहू पिकाबाबत बोलायचं झालं तर महाराष्ट्र समवेतच देशातील अनेक भागांमध्ये अशी लागवड होते. राज्यातही हे पीक मोठ्या प्रमाणात उत्पादित होते. दरम्यान आज आपण गावाच्या अशा एका सुधारित जातीची माहिती पाहणार आहोत यातून शेतकऱ्यांना चांगले दर्जेदार उत्पादन मिळवता येणार आहे.

Advertisement

80 क्विंटल पर्यंतचे उत्पादनक्षमता असणाऱ्या एका सुधारित जातीची आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. नोव्हेंबर महिना हा गहू पेरणीसाठी सर्वात अनुकूल असतो.

नोव्हेंबर महिन्याचा पहिला पंधरवडा गव्हाच्या पेरणीसाठी सर्वात अनुकूल असल्याचा दावा तज्ञांनी केला असून या काळात जर गव्हाची पेरणी झाली तर शेतकऱ्यांना नक्कीच दुप्पट उत्पादन मिळवता येणे शक्य आहे.

Advertisement

गव्हाच्या या जातीची लागवड शेतकऱ्यांना बनवणार मलामाल
नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात म्हणजेच एक नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर या काळात जर शेतकऱ्यांनी गव्हाच्या DBW-327 या जातीच्या गव्हाची पेरणी केली तर शेतकऱ्यांना अधिकचे उत्पादन मिळवता येणे शक्य आहे.

Advertisement

ही जात प्रत्येक प्रकारच्या हवामानात एकसमान उत्पादन देण्यास सक्षम आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्येक हंगामात स्थिर नफा मिळण्याची शक्यता वाढते. DBW-327 जातीचे उत्पादन सुमारे 75-80 क्विंटल प्रति हेक्टरपर्यंत पोहोचू शकते,

जे पारंपारिक वाणांपेक्षा जास्त आहे. यातून एकरी सुमारे 30 क्विंटल उत्पादन घेऊन शेतकरी आपले उत्पन्न वाढवू शकतात, असा दावा कृषी तज्ञांकडून करण्यात आला आहे. DBW-327 जातीची विशेष गुणवत्ता म्हणजे ही जात विविध हवामानास विशेष सहनशील आहे.

जास्त सूर्यप्रकाश, कमी पाऊस आणि थंडी अशा प्रतिकूल परिस्थितीतही हा वाण चांगले उत्पादन देतो. त्यामुळे बदलत्या हवामानाचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत नाही. DBW-327 परिपक्व कालावधीबाबत बोलायचं झालं तर या जातीचे पीक 130-140 दिवसात परिपक्व होते.

गव्हाचा हा वाण मध्यम कालावधीत परिपक्व होणारा आहे. त्यामुळे पीक काढणीनंतर लगेचच पुढील पिकाची पेरणी करणे सोपे जाते, जेणेकरून शेतकऱ्यांना पुढील पिकाचे फायदे वेळेवर मिळू शकतील.

हा वाण हवामानाची परिस्थिती असामान्य असलेल्या भागात विशेषतः फायदेशीर ठरू शकते, कारण तिची उत्पादन क्षमता आणि हवामान सहनशीलता शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सुरक्षित ठेवते.

Tags :
wheat variety
Next Article