गव्हाच्या पिकातून विक्रमी उत्पादन मिळवायचे आहे का? मग गहू पेरणी केल्यानंतर इतक्या दिवसांनी ‘या’ औषधाची फवारणी करा
Wheat Farming : गहू हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक आहे. याची लागवड राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये केली जाते. रब्बी हंगामात उत्पादित होणारे हे पीक शेतकऱ्यांसाठी फायद्याचा सौदा ठरते. गव्हाच्या पिकातून शेतकऱ्यांना चांगले विक्रमी उत्पादन मिळत आहे.
मात्र असे असले तरी गव्हाची पेरणी झाल्यानंतर पीक व्यवस्थापनावर शेतकऱ्यांना विशेष लक्ष द्यावे लागते. शेतकऱ्यांनी योग्य वेळी गहू पिकात तन नियंत्रण करणे आवश्यक आहे. पिकात आढळणारे तण गव्हाच्या पिकासोबत स्पर्धा करतात.
त्यामुळे पिकाला मिळणारे पोषण, पाणी आणि प्रकाश यावर परिणाम होतो. त्यामुळे झाडांच्या वाढीवर परिणाम होऊन उत्पादनावरही ३० टक्के परिणाम होतो. गव्हाच्या पिकात मोठ्या प्रमाणात तन राहिले तर गव्हाचे उत्पादन 30% पर्यंत कमी होते असा दावा तज्ञांनी केला आहे.
अशा परिस्थितीत पेरणीच्या वेळी शेतकऱ्यांनी पेंडीमेथालिन 30% EC या तणनाशकाचा वापर करणे महत्त्वाचे आहे. ज्यामुळे तणांची वाढ होण्यापासून रोखता येते आणि तण वाढले तरी ते सिंचनादरम्यान स्वतःच मरतात.
पण, तणनाशक पेंडीमेथालिन वापरताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. गहू पेरल्यानंतर पेंडीमेथालिन औषध ताबडतोब किंवा २४ तासांच्या आत फवारले गेले पाहिजे.
1.5 लिटर पेंडीमेथालिन 200 लिटर पाण्यात मिसळून याची फवारणी करावी, असा सल्ला कृषी क्षेत्रातील तज्ञांनी दिला आहे. कृषी तज्ञ सांगतात की, तणनाशक पेंडीमेथालिन मातीवर एक थर तयार करते.
त्यामुळे तणांच्या बिया उगवत नाहीत आणि कोणतेही तण वाढले तरी ते पहिल्या सिंचनाच्या वेळीच मरून जाते. परंतु या तणनाशकाची फवारणी करताना जमिनीच्या वरचा थर फुटू नये, याची काळजी घेणे खूपच आवश्यक आहे.
म्हणून फवारणी करताना शेतकऱ्यांनी बाजूने किंवा मागे जावे. जर तुम्हीही गव्हाची नुकतीच पेरणी केली असेल तर तुम्ही या तणनाशकाची फवारणी करून पिकातील तणाचे योग्य पद्धतीने नियंत्रण करू शकता आणि गव्हाच्या पिकातून चांगले विक्रमी उत्पादन मिळू शकतात.