गव्हाच्या 'या' जातीची पेरणी करा, उत्पादनात दुप्पट वाढ होणार ! खरीप हंगामाची भरपाई रब्बीमधून करता येईल
Wheat Farming : खरीप हंगाम संपून आता रब्बी हंगामाला सुरुवात झाली आहे. रब्बी हंगामातील पीक पेरणी सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. वाढत्या मजुरीमुळे आणि खरिपात अपेक्षित असे उत्पादन मिळालेले नसल्याने, तसेच खरीप पिकांना बाजारात अपेक्षित भाव नसलेले शेतकरी बांधव आपल्या मुलाबाळांसहित सध्या शेतीमध्ये रब्बी हंगामातील पिकांची पीक पेरणी करत आहेत.
अशा या परिस्थितीत जर तुम्हाला खरीप हंगामातील भरपाई रब्बी हंगामातून भरून काढायची असेल तर आज आम्ही तुम्हाला गव्हाच्या काही सुधारित जातींची माहिती सांगणार आहोत.
जर तुम्हीही रब्बी हंगामात गहू पेरणी करण्याचा विचार करत असाल आणि यातून तुम्हाला अधिकचे उत्पादन मिळवायचे असेल तर आज आम्ही तुम्हाला अशा टॉप 3 जातींची माहिती सांगणार आहोत ज्याच्या लागवडीतून तुम्हाला नक्कीच चांगली कमाई होणार आहे.
अजित 109 संकरित गव्हाचे बियाणे : गव्हाचा हा एक सुधारित प्रकार म्हणून संपूर्ण देशात ओळखला जातो. या जातीची लागवड आपल्या महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात होते. अजित 109 संकरित गहू ही एक उत्कृष्ट संकरित गव्हाची जात म्हणून शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहे.
मराठवाडा, विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील अनेक शेतकरी गव्हाच्या या जातीची लागवड करत असल्याची माहिती जाणकारांनी दिली आहे. या जातीचा पीक परिपक्वता कालावधी हा 105-110 दिवसांचा आहे. या जातीच्या गव्हाची उंची 90-100 सेंमी असते आणि त्याच्या दाण्यांना आकर्षक अंबर रंग असतो आणि ते मध्यम आकाराचे असतात.
प्रत्येक घडामध्ये ४५-५० दाणे असतात आणि उत्पादन क्षमता ४५-५० क्विंटल प्रति हेक्टरपर्यंत पोहोचू शकते. त्याचे उत्पादन उच्च स्थिरता आहे आणि ते ओलावा आणि ताण सहनशील आहे. हा वाण पान आणि खोडावर येणाऱ्या तांबेरा रोगास देखील सहनशीलं असल्याचा दावा केला जात आहे.
अजित 349 : गव्हाची ही देखील एक सुधारित आणि संकरित जात आहे. ही संकरित जात उत्कृष्ट आहे. या जातीची लागवड आपल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात होते. या जातीच्या गहू पिकाचा पीक परिपक्वता कालावधी 135-140 दिवस आहे.
या जातीच्या गव्हाची उंची 80-90 सेमी आहे आणि प्रत्येक घडामध्ये 45-50 दाणे असतात. या जातीची उत्पादन क्षमता जास्त आहे, ज्यातून 65-70 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळू शकते. हा वाण विविध रोगांना अन कीटकांना सहनशील आहे आणि त्याची उच्च उत्पादन क्षमता त्याला विशेष बनवते.
मुकुट प्लस (MWL 6278) : अजित सीड्स कंपनीच्या वर दिलेल्या दोन जातींप्रमाणेच मुकुट प्लस ही देखील एक उच्च उत्पादन क्षमता असणारी जात आहे. बाजारात या जातीच्या गव्हाला मोठी मागणी असून प्रोसेसिंगसाठी या जातीच्या गव्हाची मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे. ही एक आघाडीची गव्हाची जात आहे जी 125-130 दिवसात परिपक्व होते.
या जातीला मुबलक प्रमाणात फुटवे फुटतात. त्याचे पॅनिकल्स जाड आणि लांब असतात, जे विशेषतः त्याचे सौंदर्य वाढवतात. याच्या बिया चमकदार असून त्यापासून बनवलेली चपाती अतिशय चवदार असते. हा गहू रोगांना प्रतिरोधक आहे आणि उच्च उत्पादन क्षमता आहे.