For the best experience, open
https://m.krushimarathi.com
on your mobile browser.

गहू पेरणी करताय का ? अलीकडेच विकसित झालेल्या 'या' जातीची पेरणी करा, विक्रमी उत्पादन मिळणार

04:26 PM Oct 13, 2024 IST | Krushi Marathi
गहू पेरणी करताय का   अलीकडेच विकसित झालेल्या  या  जातीची पेरणी करा  विक्रमी उत्पादन मिळणार
Wheat Farming
Advertisement

Wheat Farming : आगामी रब्बी हंगामात गहू पेरणी करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. जस की आपणास ठाऊकच आहे की, देशातील गव्हाचे उत्पादन आणि उत्पादकता वाढवण्यासाठी कृषी शास्त्रज्ञ आणि कृषी विद्यापीठांद्वारे नव-नवीन सुधारित जाती विकसित केल्या जात आहेत.

Advertisement

देशातील कृषी शास्त्रज्ञांनी विविध किटक आणि रोगांविरोधात प्रतिकारक असणाऱ्या शेकडो जाती तयार केल्या आहेत. दरम्यान आज आपण गव्हाच्या अशाच एका उच्च उत्पादन देणाऱ्या जातीची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Advertisement

आज आपण भारतीय कृषी संशोधन संस्था IARI द्वारे विकसित "पुसा अनमोल HI 8737" या जातीची माहिती पाहणार आहोत. खरंतर ही जात अलीकडेच विकसित झाली आहे. देशातील मध्यवर्ती भागातील शेतकऱ्यांसाठी ही जात शिफारशीत करण्यात आली आहे.

Advertisement

या जातीपासून शेतकऱ्यांना विक्रमी उत्पादन मिळते. पुसा अनमोल HI 8737 ला केंद्रीय विविधता प्रकाशन समितीने 2015 मध्ये लागवडीसाठी मान्यता दिली होती. ही जात देशातील विविध राज्यांमध्ये लागवडीसाठी शिफारशीत करण्यात आली आहे.

Advertisement

यामुळे देशातील अनेक प्रमुख उत्पादक भागातील शेतकरी पुसा अनमोल एचआय 8737 ची लागवड करून चांगले उत्पन्न मिळवत आहेत. दरम्यान आता आपण या सुधारित जातीची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

Advertisement

पुसा अनमोल HI 8737 च्या विशेषतः खालील प्रमाणे

हा गव्हाचा डुरम गहू प्रकार आहे.
गव्हाची ही जात देशाच्या मध्यवर्ती भागातील हवामानासाठी योग्य आहे.
ही जात रब्बी हंगामात वेळेवर पेरणी व सिंचनासाठी योग्य आहे.
या जातीची सरासरी उत्पादन क्षमता ५३.४ क्विंटल प्रति हेक्टर आहे.
पुसा अनमोल HI 8737 सह, शेतकरी प्रति हेक्टर 78 क्विंटल पर्यंत कमाल उत्पादन मिळवू शकतात.
ही जात 125 दिवसांत पक्व होऊन काढणीस तयार होते.
पुसा अनमोल ही जात काळ्या व तपकिरी तांबेरा रोगास प्रतिरोधक आहे.
या जातीमध्ये जास्त प्रथिने (12.1%) सोबत जास्त रवा मिळू शकतो.
ही जात उच्च तापमानाला सहनशील आहे.
या जातीमध्ये पिवळे रंगद्रव्य (5.4 PPM), लोह (38.5 PPM) आणि जस्त (40.0 PPM) जास्त प्रमाणात असते.

Tags :