डिसेंबर महिन्यात गव्हाच्या ‘या’ वाणाची लागवड करा ; कृषी तज्ञांचा शेतकऱ्यांसाठी अनमोल सल्ला
Wheat Farming : डिसेंबर महिन्यात गव्हाच्या कोणत्या जातींची लागवड करावी असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जातो. खरंतर गव्हाची लागवड ही ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात केली जाते.
ऑक्टोबर मध्ये जिरायती भागात गव्हाची लागवड होते आणि नोव्हेंबर महिन्यात बागायती भागात गहू लागवड केली जाते. एक नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान वेळेवर गहू पेरणी केली जाते.
पण अनेक शेतकऱ्यांना गेल्या नोव्हेंबर महिन्यात गव्हाची पेरणी करता आली नाही. त्यामुळे आज आपण ज्या शेतकऱ्यांना गेल्या महिन्यात गव्हाची लागवड करता आली नसेल त्यांच्यासाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत.
आज आपण डिसेंबर महिन्यात लागवडी योग्य अशा गव्हाच्या काही सुधारित जातींची माहिती पाहणार आहोत. आज आपण उशिरा लागवड करता येणाऱ्या गव्हाच्या जातींची माहिती पाहणार आहोत.
मात्र गव्हाच्या या सुधारित जातींची पेरणी 25 डिसेंबर पर्यंत पूर्ण करणे आवश्यक राहणार आहे. पंचवीस डिसेंबर नंतर गव्हाची पेरणी करू नये असा सल्ला कृषी तज्ञांनी दिलेला आहे.
गव्हाच्या या जातींची लागवड करा
ज्या शेतकऱ्यांनी अजून गव्हाची पेरणी केलेली नसेल ते शेतकरी 25 डिसेंबर पर्यंत गहू पेरणी करू शकतात. पण 25 डिसेंबर नंतर गव्हाची पेरणी करू नका. यानंतर गव्हाची लागवड केली तर उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येण्याची भीती व्यक्त केली जाते.
खरंतर कृषी शास्त्रज्ञांनी देशभरातील शेतकऱ्यांसाठी गावाच्या वेगवेगळ्या जाती विकसित केले आहेत. गव्हाची काही नवीन वाण विकसित करण्यात आलेली आहेत. पंजाब, हरियाणा आणि राजस्थानच्या काही भागांमध्ये तसेच इतर भागात या जातीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.
या जातींची पेरणी तुम्हाला 25 डिसेंबर पर्यंत करता येते. DBW 316, PBW 833, DBW 107, HD 3118 JKW 261, PBW 752 या अशा काही सुधारित जाती आहेत ज्या 25 डिसेंबर पर्यंत पेरता येतात.