For the best experience, open
https://m.krushimarathi.com
on your mobile browser.

गहू पिकातून विक्रमी उत्पादन मिळवायचे असेल तर अशा पद्धतीने पाण्याचे व्यवस्थापन करा; पहिले पाणी 20 दिवसांनी, मग.....

09:32 PM Oct 23, 2024 IST | Krushi Marathi
गहू पिकातून विक्रमी उत्पादन मिळवायचे असेल तर अशा पद्धतीने पाण्याचे व्यवस्थापन करा  पहिले पाणी 20 दिवसांनी  मग
Wheat Farming
Advertisement

Wheat Farming : गहू उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. खरे तर महाराष्ट्रासहित संपूर्ण देशात रब्बी हंगामाला सुरुवात झाली आहे. देशातील बहुतांशी भागांमध्ये रब्बी पिकांच्या पेरणीला सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी रब्बी पिकांची पेरणी पूर्ण देखील झाली आहे.

Advertisement

अनेक जण हरभरा गहू यांसारख्या रब्बी हंगामातील मुख्य पिकांची पेरणी करत आहेत. दरम्यान आजची ही बातमी ज्या शेतकऱ्यांनी गहूची पेरणी केलेली असेल किंवा जे शेतकरी गहू पेरणी करण्याच्या तयारीत असतील त्यांच्यासाठी कामाची ठरणार आहे.

Advertisement

कारण की आज आपण गहू पिकातून चांगले दर्जेदार आणि विक्रमी उत्पादन मिळवण्यासाठी पाण्याचे व्यवस्थापन कसे असायला हवे या संदर्भात कृषी तज्ञांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण माहिती विषयी अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Advertisement

कृषी तज्ञ काय म्हणतात

Advertisement

जमिनीचा प्रकार, पाण्याची उपलब्धता इत्यादीनुसार गहू पिकासाठी आवश्यक असणाऱ्या सिंचनाची संख्या बदलू शकते. खरे तर गहू हे रब्बी हंगामातील पीक आहे. या अन्नधान्य पिकाची लागवड आपल्या राज्यात मोठ्या प्रमाणात होते.

Advertisement

या पिकातून जर तुम्हाला चांगले दर्जेदार उत्पादन मिळवायचे असेल तर सुधारित जातींची निवड करणे आवश्यक असते सोबतच पाणी व्यवस्थापनावर विशेष लक्ष देणे आवश्यक असते. ओलाव्याच्या ताणासाठी क्राउन रूट इनिशिएशन आणि हेडिंग टप्पे सर्वात महत्वाचे आहेत.

जास्त उत्पादन देणाऱ्या वाणांसाठी पेरणीपूर्वी पाणी द्यावे लागते. भारी जमिनीसाठी चार ते सहा सिंचन आवश्यक असतात. तर हलक्या जमिनीत पेरणी केलेली असल्यास जास्त पाणी भरावे लागते, हलक्या जमिनीसाठी 6-8 सिंचन आवश्यक आहेत.

मर्यादित पाणीपुरवठ्यात फक्त महत्त्वाच्या टप्प्यावरच म्हणजेच अवस्थेत सिंचन करावे. जेव्हा फक्त एक सिंचनासाठी पाणी उपलब्ध असेल, तेव्हा मुकुटमुळे निघण्याच्या टप्प्यावर पाणी द्यावे. जेव्हा दोन सिंचन उपलब्ध असतील तेव्हा मुकुट मुळांच्या सुरुवातीच्या आणि फुलांच्या अवस्थेत पाणी द्यावे.

जेथे तीन पाणी देणे शक्य असेल तेथे पहिले पाणी सीआरआय टप्प्यावर आणि दुसरे पाणी उशीरा जोडणी (बूट) आणि तिसरे चीक भरण्याच्या अवस्थेत द्यावे. सीआरआय टप्पा हा सिंचनासाठी सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. असे आढळून आले आहे की सीआरआय अवस्थेपासून पहिल्या सिंचनात दर आठवड्याला उशीर झाल्याने उत्पादनात 83-125 किलो प्रति एकर घट होते.

पाणी व्यवस्थापन कसे असावे?

पहिले सिंचन : 20-25 दिवस
दुसरे सिंचन : 40-45 दिवस
तिसरे सिंचन : ६०-६५ दिवस
4थे सिंचन : 80-85 दिवस
5वे सिंचन : 100-105 दिवस
6वे सिंचन : 115-120 दिवस

Tags :