हवामान अपडेट: पुणे, सातारा, सांगलीत उन्हाचा जोर वाढला, उष्णतेपासून बचावासाठी काय कराल?
Maharashtra Havaman : राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत असून फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासून तापमान वाढले आहे. गेल्या काही दिवसांत काही भागांमध्ये तापमान घटले असले तरी पश्चिम महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये उन्हाच्या तीव्रतेत वाढ झाली आहे. पुढील २४ तासांत पश्चिम महाराष्ट्रातील हवामान आणि तापमानाच्या स्थितीबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ.
पश्चिम महाराष्ट्रात उन्हाची तीव्रता वाढत असून, काही ठिकाणी तापमान ३७ अंशांवर पोहोचले आहे. विशेषतः सोलापूरमध्ये उष्णतेची लाट जाणवू शकते. त्यामुळे नागरिकांनी उष्णतेपासून संरक्षण घेण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.
पुणे:
गेल्या काही दिवसांत पुण्यातील तापमानात चढ-उतार होताना दिसत आहे. गुरुवारीच्या तुलनेत १ अंशाची घट नोंदवली गेली असून, आज पुण्यात कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १२ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. शहरात मुख्यतः निरभ्र आकाश राहील, त्यामुळे दुपारच्या वेळी उन्हाची तीव्रता जाणवू शकते.
सातारा:
साताऱ्यातील तापमानातही किंचित घट दिसून येत आहे. आज साताऱ्यात कमाल तापमान ३४ अंश तर किमान तापमान १७ अंश सेल्सिअस राहणार आहे. आकाश निरभ्र राहील, त्यामुळे सकाळ आणि रात्रीच्या वेळी थंड हवामानाचा अनुभव येईल.
कोल्हापूर:
कोल्हापूरमध्ये आज संपूर्ण दिवस निरभ्र आकाश राहणार आहे. कमाल तापमान ३४ अंश तर किमान तापमान १९ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. उन्हाच्या तीव्रतेत वाढ होऊ शकते, त्यामुळे नागरिकांनी दुपारी बाहेर पडताना काळजी घेणे गरजेचे आहे.
सांगली:
सांगलीमधील तापमानात किंचित वाढ नोंदवली गेली आहे. आज सांगलीमध्ये कमाल तापमान ३६ अंश तर किमान तापमान १६ अंश सेल्सिअस राहील. मुख्यतः निरभ्र आकाश असल्याने उष्णतेची तीव्रता अधिक जाणवण्याची शक्यता आहे.
सोलापूर:
सोलापूरमध्ये उन्हाचा तडाखा अधिक जाणवत असून, आजचे कमाल तापमान ३७ अंश तर किमान तापमान २० अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागानुसार येत्या काही दिवसांत सोलापूरचे तापमान ३९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
उष्णतेचा प्रभाव आणि आवश्यक काळजी
सोलापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील इतर शहरांमध्येही तापमान वाढताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी पुरेशी द्रवपदार्थांचे सेवन करावे, उन्हाच्या तीव्रतेपासून बचाव करावा आणि शारीरिक आरोग्याची काळजी घ्यावी. तसेच शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे योग्य व्यवस्थापन करून उष्णतेच्या दुष्परिणामांपासून बचाव करण्यासाठी पाणी व्यवस्थापनाकडे लक्ष द्यावे.