जम्मू ते श्रीनगर दरम्यान जगातील सर्वात उंच ब्रिजवरून धावली वंदे भारत ट्रेन! जाणून घ्या या ट्रेनची वैशिष्ट्ये आणि भाडे
Vande Bharat Train:- भारतातील अनेक राज्यातील महत्त्वाच्या शहरांना जोडण्यासाठी वंदे भारत एक्सप्रेस सुरू केल्या जात आहेत. वेगवान आणि आरामदायी प्रवासासाठी वंदे भारत ट्रेन प्रवाशांमध्ये देखील तितक्याच लोकप्रिय ठरत असून प्रवाशांकडून खूप मोठा प्रतिसाद मिळताना आपल्याला दिसून येत आहे.
आरामदायी प्रवास मिळावा आणि कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त अंतर पार करता यावे यासाठी वंदे भारत एक्सप्रेस खूप महत्त्वपूर्ण आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहे व आता जम्मू-काश्मीर साठी तेवढी वंदे भारत कधी सुरू होणार ही प्रतीक्षा होती व ती प्रतीक्षा देखील आता पूर्ण झालेली आहे.
कारण जम्मू काश्मीर ते श्रीनगर दरम्यान 25 जानेवारी रोजी वंदे भारत ट्रेनची चाचणी पूर्ण झाली व या चाचणीचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे जगातील सर्वात उंच असलेल्या चिनाब रेल्वे ब्रिजवरून ही वंदे भारत एक्सप्रेस धावली. ही वंदे भारत एक्सप्रेस विशिष्ट पद्धतीने तयार करण्यात आली आहे.
उदाहरणच घ्यायचे झाले तर प्रवाशांना हिवाळ्यामध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याकरिता खास व्यवस्था या ट्रेनमध्ये करण्यात आली आहे.तसेच या ट्रेनच्या काचेवर बर्फ कधी जमा होऊ शकत नाही. त्यामुळे ती मायनस 30 अंश तापमानात देखील वेगाने धावण्यास सक्षम आहे.
विशेष म्हणजे विमानामध्ये जी काही वैशिष्ट्ये असतात त्यातील बरीच वैशिष्ट्ये या ट्रेनला जोडण्यात आलेली आहेत. त्यामुळे भारतात सुरू असलेल्या इतर वंदे भारत एक्सप्रेसच्या तुलनेमध्ये ही वंदे भारत अनेक अर्थाने वेगळी आहे. ही ट्रेन प्रामुख्याने कटरा- बारामुल्ला मार्गावर धावेल व उत्तर रेल्वे क्षेत्राद्वारे ती चालवली जाणार आहे.
कधी धावणार ही ट्रेन?
याबाबत मिळालेली माहिती अशी आहे की, माता वैष्णोदेवी कटरा ते दिल्लीला जोडणारे दोन मार्ग यशस्वी झाल्यानंतर ही आता तिसरी वंदे भारत ट्रेन असणार आहे. आधुनिक केशरी आणि राखाडी रंगाची ही ट्रेन वैष्णोदेवी कटरा ते श्रीनगर दरम्यान धावणार आहे. 25 जानेवारी रोजी या ट्रेनची चाचणी घेण्यात आली.
तेव्हा ही ट्रेन अंजी खड्डा ब्रिज, भारतातील पहिला केबल स्टेड रेल्वे ब्रिज आणि जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज असलेल्या चिनाब ब्रिजवरून धावली. साधारणपणे नियमितपणे ही पुढील महिन्यापासून धावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या वंदे भारत ट्रेनचे वैशिष्ट्य म्हणजे 160 किलोमीटर पेक्षा जास्त अंतर तीन तास दहा मिनिटात पूर्ण करेल.
सुरू झाल्यानंतर ही ट्रेन कटरा इथून सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी निघेल आणि श्रीनगरला अकरा वाजून वीस मिनिटांनी पोहोचेल. त्यानंतर परतीच्या मार्गाला श्रीनगर होऊन बारा वाजून 45 मिनिटांनी निघेल आणि कटरा येथे तीन वाजून 55 मिनिटांनी पोहोचेल.
काय आहेत या ट्रेनमधील खास वैशिष्ट्ये?
ही ट्रेन चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये तयार करण्यात आली असून अनेक आरामदायी सोयीसुविधा यामध्ये देण्यात आलेल्या आहेत. या ट्रेनच्या प्रत्येक भोगीमध्ये पाण्याची टाकी तसेच सिलिकॉन हीटिंग पॅड, हिटिंग प्लंबिंग पाईपलाईन देखील बसवण्यात आलेली आहे. म्हणजे थंडीत पाणी गोठण्यापासून यामुळे मदत होणार आहे.
तसेच या ट्रेनच्या ड्रायव्हर केबिनमध्ये ट्रिपल इयर विंडो स्क्रीन देण्यात आली आहे व मधल्या भागात गरम केलेले फिलामेंट देखील देण्यात आलेले आहे व ते बर्फात प्रभावी ठरणार आहे. त्यामुळे या ट्रेनच्या काचेवर बर्फ जमा होणार नाही व ती वेगात चालवता येणे शक्य होईल. तसेच थंडीमध्ये बचाव व्हावा म्हणून वॉशरूम मध्ये हिटर लावण्यात आलेले आहेत.
या सगळ्या वैशिष्ट्यांमुळे तुम्ही उणे 30 डिग्री तापमानात देखील आरामात प्रवास करू शकतात. इतकेच नाही तर विंडोमध्ये देखील हीटिंग सिस्टम देण्यात आली आहे व डबे उबदार हवेत त्याकरिता हिटर फिट करण्यात आलेले आहेत. म्हणजे साधारणपणे जम्मू-काश्मीरमधील थंडीचा अंदाज पाहता या ट्रेनमध्ये अशा प्रकारच्या सुविधा देण्यात आले आहेत.
इतकेच नाही तर यामध्ये आरामदायी 360 ड्रायव्हेबल सीट्स, चार्जिंग पॉइंट तसे एका बोगीपासून दुसऱ्या बोगीमध्ये स्वयंचलित दरवाजे देण्यात आले आहेत.तसेच मनोरंजनासाठी टीव्ही आणि म्युझिक सिस्टम सारख्या प्रणाली देखील आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत व बायो व्हॅक्युम टॉयलेट म्हणजेच विमानामध्ये ज्या प्रकारचे टॉयलेट असते तेच या ट्रेनमध्ये वापरण्यात आलेले आहे.
या ट्रेनचे भाडे किती असेल?
सध्या तरी अजून या ट्रेनचे तिकीट किती असेल याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. परंतु अंदाज जर बघितला तर एसी चेअर कारसाठी 1500 ते 1600 रुपये आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कारसाठी 2200 ते 2500 रुपये इतके भाडे असू शकते.