'या' महिन्यात सुरू होणार वंदे भारत स्लीपर ट्रेन ! कोणत्या शहरांना मिळणार भेट?
Vande Bharat Sleeper Train : वंदे भारत एक्सप्रेस नंतर आता देशात वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होणार आहे. या ट्रेन साठी येत्या काही महिन्यात व्यावसायिक चाचणी घेतली जाणार आहे. जेव्हा ही चाचणी संपन्न होईल त्यानंतर वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू केली जाणार आहे. येत्या काही दिवसात या ट्रेनची ट्रायल रन सुरू होणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ही 2019 मध्ये सुरू झाली होती. सर्वप्रथम ही गाडी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर सुरू झाली. यानंतर ही गाडी टप्प्याटप्प्याने देशातील इतर महत्त्वाच्या मार्गांवर सुरू करण्यात आली. आतापर्यंत ही गाडी देशातील 65 महत्त्वाच्या मार्गांवर सुरू झाली आहे.
यातील अकरा मार्ग हे आपल्या महाराष्ट्रातील आहेत हे विशेष. राज्यातील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते शिर्डी, सीएसएमटी ते जालना, सीएसएमटी ते मडगाव, पुणे ते कोल्हापूर, पुणे ते हुबळी, नागपुर ते सिकंदराबाद, नागपूर ते बिलासपूर, नागपूर ते इंदोर या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.
दरम्यान आता वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या ट्रेनची व्यावसायिक चाचणी डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे. मात्र ही पहिली गाडी देशातील कोणत्या मार्गावर धावणार हे अजून स्पष्ट झालेले नाही.
परंतु ही गाडी देशातील विविध विभागात सुरू करण्याची मागणी आतापासूनच जोर धरत आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणे ते दिल्ली दरम्यान ही गाडी सुरू होऊ शकते असे संकेत दिले होते.
याशिवाय मुंबई ते दिल्ली या मार्गावर देखील ही गाडी सुरू होण्याची शक्यता असल्याची माहिती समोर आली होती. पुणे, मुंबई, दिल्ली समावेतच बेंगलोरला देखील या गाडीची भेट मिळू शकते असा दावा प्रसारमाध्यमांमध्ये करण्यात आला आहे.
या गाडीच्या तिकिट दराबाबतही माहिती समोर आली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या गाडीचे तिकीट दर कसे असणार या संदर्भात माहिती दिलीय. वैष्णव यांनी म्हटल्याप्रमाणे या गाडीचे तिकीट दर हे राजधानी एक्सप्रेस प्रमाणेच राहू शकते.
या ट्रेनमध्ये USB चार्जिंग सुविधासह रीडिंग लाईट, सार्वजनिक उद्घोष, दृश्यस्वरुपात माहिती प्रणाली, इनसाईड डिस्प्ले पॅनल आणि सुरक्षेसाठी कॅमेरे असतील. दिव्यांग यात्रेकरूसाठी विशेष बर्थ आणि शौचालय असतील.
या ट्रेनमध्ये अतिरिक्त, फर्स्ट एसी डब्बे असेल. यामध्ये गरम पाण्याच्या शॉवरची सुविधा सुद्धा प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे.
या ट्रेनमध्ये एकूण 16 कोच असतील. त्यामध्ये 3 एसीचे 11 डब्बे, 2 एसीचे 4 डब्बे आणि 1 फर्स्ट क्लासचा डब्बा राहणार आहे. या गाडीचा कमाल वेग हा 160 किलोमीटर प्रतितास एवढा राहू शकतो असा अंदाज आहे.