वंदे भारत स्लीपर ट्रेन संदर्भात आत्ताची सर्वात मोठी अपडेट! 'या' तारखेला धावणार पहिली Vande Bharat Sleeper
Vande Bharat Sleeper Train : देशातील सर्वात लोकप्रिय ट्रेन म्हणून वंदे भारत एक्सप्रेस चा गौरव केला जात आहे. वंदे भारत एक्सप्रेस ही अल्पकालावधीत लोकप्रिय झालेली भारतातील संपूर्ण स्वदेशी बनावटीची पहिली हाय स्पीड ट्रेन म्हणून ओळखली जाते.
ही ट्रेन देशातील 65 महत्त्वाच्या मार्गांवर सुरू आहे. आपल्या महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर राज्याला आत्तापर्यंत 11 नवीन वंदे भारत एक्सप्रेस मिळालेल्या आहेत. यापैकी तीन गाड्या नुकत्याच काही दिवसांपूर्वी सुरू झाल्या आहेत.
सध्या महाराष्ट्रातील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, सीएसएमटी ते जालना, सीएसएमटी ते मडगाव, सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते शिर्डी, पुणे ते कोल्हापूर, पुणे ते हुबळी,
नागपूर ते सिकंदराबाद, नागपूर ते इंदोर, नागपूर ते बिलासपूर या मार्गांवर ही गाडी सुरू आहे. आता या वंदे भारत एक्सप्रेसच्या यशानंतर रेल्वे प्रशासन वंदे भारत स्लीपर लाँच करण्याच्या तयारीत आहे.
या गाडीची प्रवासी गेल्या अनेक महिन्यांपासून आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, आता याच संदर्भात भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी हाती आली आहे. वंदे भारत स्लीपरबाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आले आहे.
अलीकडेच, चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) मधील वंदे भारत स्लीपरमधील एक व्हिडिओ समोर आला आहे. ICF चे महाव्यवस्थापक म्हणाले की, वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच सेवेत दाखल होण्यासाठी तयार आहे
आणि ती लवकरच रुळांवर धावण्यासाठी सज्ज होणार आहे. ICF च्या महाव्यवस्थापकांनी एका प्रतिष्ठित वृत्तसंस्थेला सांगितले की, पूर्वी फक्त चेअर कार रेक तयार केले जात होते, परंतु या ट्रेनची लोकप्रियता पाहून रेल्वे बोर्डाने स्लीपर व्हर्जनचे उत्पादन करण्याचे आदेश दिले आहेत.
आमच्याकडे आधीपासूनच अनेक ऑर्डर आहेत, म्हणून आम्ही डिझाइन तयार केले आणि उत्पादनासाठी ते पीएमएलसोबत सामायिक केले. जेव्हा कोच कार्यान्वित होईल तेव्हा ते आमच्याकडे येईल. त्यानंतर कोच बाहेरच्या चाचण्यांसाठी पाठवला जाईल.
यानंतर, कोच हा लखनऊ येथील आरडीएसओ कडे बाहेरील चाचणीसाठी पाठवले जाईल जे त्याच्या धावण्याचे प्रमाणपत्र जारी करणार आहे. ही ट्रेन १५ जानेवारीपर्यंत तयार होईल, असे त्यांनी सांगितले.