कृषी बातम्यासरकारी योजनाबाजारभावयशोगाथाहवामानस्पेशल स्टोरी
Advertisement

प्रतीक्षा संपली ; 26 जानेवारी 2025 ला ‘या’ मार्गावर सुरू होणार देशातील पहिले वंदे भारत स्लीपर ट्रेन !

06:31 PM Dec 05, 2024 IST | Krushi Marathi
Vande Bharat Sleeper Train

Vande Bharat Sleeper Train : वंदे भारत एक्सप्रेस प्रोजेक्ट ला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर आता रेल्वे आणखी एक मोठा निर्णय घेणार आहे. देशातील लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवास जलद आणि आरामदायी करण्यासाठी, भारतीय रेल्वे आता हाय स्पीड ट्रेन वंदे भारतचे स्लीपर कोच लॉन्च करणार आहे.

Advertisement

या ट्रेन संदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सातत्याने अपडेट दिली आहे. नुकत्याच काही महिन्यांपूर्वी अश्विनी वैष्णवी यांनी पुढील वर्षात म्हणजे 2025 मध्ये वंदे भारत स्लीपर ट्रेन प्रवाशांसाठी सुरू केला याद्वारे 1000 किलोमीटरहून अधिकचा प्रवासही काही तासांत पूर्ण करता येतो.

Advertisement

रेल्वेने पहिली स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन चालवण्याची योजना आखली आहे, जी दिल्ली ते कटरा मार्गे श्रीनगरपर्यंत धावेल, जी पुढील महिन्यात म्हणजे जानेवारी 2025 पासून सुरू होऊ शकते. ही ट्रेन सुरू झाल्यानंतर 800 किमीचा प्रवास अवघ्या 13 तासांत पूर्ण करणार अशी माहिती देण्यात आली आहे.

भारतीय रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ही वंदे भारत एक्सप्रेस स्लीपर सेमी-हाय-स्पीड ट्रेन राष्ट्रीय राजधानी आणि काश्मीर दरम्यानची पहिली थेट रेल्वे सेवा राहणार आहे. ही गाडी 13 तासांपेक्षा कमी वेळेत 800 किलोमीटरहून अधिक अंतर कापणार आहे.

Advertisement

रेल्वेच्या आतापर्यंत लीक झालेल्या योजनेनुसार ही वंदे भारत स्लीपर ट्रेन नवी दिल्लीहून संध्याकाळी ७ वाजता निघून दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता श्रीनगरला पोहोचणार असा अंदाज आहे.

Advertisement

आपल्या 800 किलोमीटरहून अधिक प्रवासादरम्यान ही ट्रेन जम्मू तवी, कटरा आणि बनिहालमधील प्रमुख थांब्यांवर थांबणार आहे. तिकिटांच्या किमतींबद्दल बोलायचे झाल्यास, दिल्ली-श्रीनगर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन AC 3-टियरसाठी ₹2,000 पासून, AC 2-टियरसाठी ₹2,500 आणि फर्स्ट AC साठी ₹3,000 पासून सुरू होण्याची अपेक्षा आहे.

ट्रेनच्या डब्यांबद्दल सांगायचे झाले तर, या ट्रेनमध्ये 11 एसी 3-टायर कोच, 4 एसी 2-टायर कोच आणि 1 फर्स्ट एसी कोच असतील, जे वेगवेगळ्या बजेटच्या प्रवाशांसाठी आरामदायी प्रवास सुनिश्चित करणार आहेत.

Tags :
railwayRailway NewstrainVande Bharat Sleeper TrainVande Bharat Sleeper Train News
Next Article