कृषी बातम्यासरकारी योजनाबाजारभावयशोगाथाहवामानस्पेशल स्टोरी
Advertisement

वंदे भारत स्लीपर ट्रेनची प्रतीक्षा संपणार ! प्रवाशांना ‘या’ महिन्यापासून करता येणार प्रवास

03:13 PM Dec 07, 2024 IST | Krushi Marathi
Vande Bharat Sleeper Train

Vande Bharat Sleeper Train : वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन नंतर आता देशात वंदे भारत स्लीपर ट्रेन देखील सुरू होणार आहे. वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन 2019 मध्ये सुरू झाली. तेव्हापासून आत्तापर्यंत देशातील 65 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू झाली आहे. अकरा वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन आपल्या महाराष्ट्राला देखील मिळाल्या आहेत.

Advertisement

महत्त्वाचे म्हणजे ज्या मार्गांवर ही गाडी सुरू आहे त्या गाडयांना प्रवाशांच्या माध्यमातून चांगला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. यामुळे आता भारतीय रेल्वे वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या संदर्भात राज्यसभेत मोठी माहिती दिली.

Advertisement

लांब पल्ल्याच्या मार्गावर वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होणार असून लॉंग रूटवरील प्रवासाला आरामदायी बनवण्यासाठी भारतीय रेल्वे सातत्याने सुविधांमध्ये वाढ करतांना दिसत आहे. रेल्वे आता हायस्पीड ट्रेन वंदे भारतचे स्लीपर कोच लाँच करणार आहे.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितल्याप्रमाणे, भारतीय रेल्वेने देशातील पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनचा प्रोटोटाइप तयार केला आहे. आता याची चाचणी घेतली जाईल. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर मग ही ट्रेन प्रवाशांसाठी सुरू केली जाणार आहे.

Advertisement

जानेवारीमध्ये ही गाडी लॉन्च केली जाऊ शकते. वंदे भारत स्लीपर लांब आणि मध्यम अंतराच्या प्रवासासाठी डिझाइन केले आहे, ज्यामुळे खूप आरामदायी प्रवास शक्य होईल, असा दावा रेल्वेमंत्र्यांनी यावेळी केलाय. खरंतर वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहेत.

Advertisement

मात्र आता प्रत्यक्षात ही गाडी रुळावर धावताना दिसणार आहे. सर्वप्रथम ही गाडी कोणत्या मार्गावर धावणार हे अजून ठरलेले नाही मात्र काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये ही गाडी नवी दिल्ली ते श्रीनगर यादरम्यान चालवली जाऊ शकते असा दावा करण्यात आला आहे.

एवढेच नाही तर आपल्या महाराष्ट्राला देखील या गाडीची भेट मिळणार आहे. ही गाडी राज्यातील मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमधून चालवण्याची योजना आखली जाऊ शकते असे म्हटले जात आहे.

पुण्याचे खासदार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणे ते दिल्ली दरम्यान ही गाडी सुरू करण्याची मागणी देखील रेल्वे मंत्र्यांकडे केली आहे. यामुळे पुणे ते दिल्लीदरम्यान देखील ही गाडी सुरू होण्याची शक्यता आहे. मुंबई ते दिल्ली या मार्गावरही ही गाडी सुरू होऊ शकते अशी माहिती मध्यंतरी समोर आली होती.

Tags :
Vande Bharat Sleeper Train
Next Article