For the best experience, open
https://m.krushimarathi.com
on your mobile browser.

1 - 2 नाही 2025 मध्ये तब्बल दहा वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरु होणार ! कसे असणार रूट ? पहिली गाडी महाराष्ट्रातील ‘या’ शहराला मिळणार ? वाचा

04:20 PM Nov 16, 2024 IST | Krushi Marathi
1   2 नाही 2025 मध्ये तब्बल दहा वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरु होणार   कसे असणार रूट   पहिली गाडी महाराष्ट्रातील ‘या’ शहराला मिळणार   वाचा
Vande Bharat Sleeper Train
Advertisement

Vande Bharat Sleeper Train : रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वे 2025-26 पर्यंत बहुप्रतीक्षित वंदे भारत स्लीपर ट्रेन्स लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे, ज्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी एक नवीन स्तरावरील आराम आणि सुविधा मिळेल.

Advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय रेल्वे 2025-26 या आर्थिक वर्षात 10 नवीन वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची योजना आखत आहे.

Advertisement

या ट्रेन्समध्ये जागतिक दर्जाच्या सुविधा आणि सर्वोत्तम दर्जाचे इंटिरियर असेल. यामुळे प्रवाशांना उत्तम दर्जाच्या सोयी सुविधा मिळतील आणि त्यांचा प्रवास देखील आरामदायी होणार आहे.

Advertisement

वंदे भारत स्लीपर ट्रेन कधी लॉन्च होणार?

Advertisement

भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन 2025 मध्ये आवश्यक ट्रायल अन चाचणीनंतर सुरू होण्याची शक्यता आहे. यू सुब्बा राव, महाव्यवस्थापक, ICF, चेन्नई यांनी एका खाजगी वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीत याची पुष्टी केली. महत्त्वाचे म्हणजे नुकत्याच काही महिन्यांपूर्वी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी देखील असेच संकेत दिले होते.

Advertisement

आगामी काही महिन्यात ही गाडी रुळावर धावणार असे रेल्वेमंत्र्यांनी स्पष्ट केले होते. दरम्यान आता राव यांनी सुद्धा या वृत्ताला दुजोरा दिला असून या ट्रेन्स ऑसिलेशन ट्रायल आणि इतर गोष्टींना सामोरे जातील अशी माहिती यावेळी दिली.

15 नोव्हेंबरपासून दोन महिन्यांसाठी चाचण्या घेतल्या जातील आणि त्यानंतर ते व्यावसायिक सेवेसाठी सुरु होणार आहेत. अलीकडेच, या गाड्या बनवणाऱ्या BEML ने चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) ला पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेनसेट दिली.

या नवीन स्लीपर ट्रेन्ससाठी भारतीय रेल्वेने अद्याप अचूक मार्ग जाहीर केले नसले तरीही, पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन नवी दिल्ली ते पुणे किंवा कदाचित नवी दिल्ली ते श्रीनगर दरम्यान जाऊ शकते असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये केला जातोय. भारतीय रेल्वेने अद्याप आगामी वंदे भारत स्लीपर गाड्यांचे मार्ग जाहीर केलेले नाहीत.

तथापि, पहिल्या वंदे भारत स्लीपर गाड्यांसाठी अनेक मार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत आणि या गाड्या नवी दिल्ली ते पुणे किंवा नवी दिल्ली ते श्रीनगर दरम्यान धावण्याची सुद्धा शक्यता आहे. 2025 मध्ये तब्बल दहा नवीन वंदे भारत स्लीपर ट्रेन चालवल्या जाऊ शकतात असाही दावा एका प्रतिष्ठित वृत्तसंस्थेने केला आहे.

Tags :