तुमचा CIBIL स्कोर 600 च्या खाली आहे? ‘या’ सोप्या पद्धती वापरा आणि तीन महिन्यात सिबिल स्कोर वाढवा
Cibil Score:- आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत तुमची पत ठरवण्यासाठी CIBIL स्कोर हा एक महत्त्वाचा निकष आहे. हा स्कोर 300 ते 900 च्या दरम्यान असतो आणि तो जास्त असेल तर तुम्हाला अनेक फायदे मिळतात. विशेषतः 700 पेक्षा जास्त CIBIL स्कोर असणाऱ्या व्यक्तींना बँका आणि वित्तीय संस्थांकडून विविध प्रकारचे फायदे मिळतात.
ज्यामुळे त्यांचा आर्थिक व्यवहार अधिक सुलभ आणि किफायतशीर ठरतो. हा स्कोर प्रामुख्याने क्रेडिट कार्ड वापर, कर्जाची वेळेवर परतफेड, आर्थिक शिस्त आणि एकूणच वित्तीय व्यवस्थापनावर आधारित असतो. जर तुम्हाला भविष्यात कर्ज किंवा आर्थिक सहाय्य सहज आणि स्वस्त दरात मिळवायचे असेल तर तुमचा CIBIL स्कोर चांगला ठेवणे गरजेचे आहे.
CIBIL स्कोर म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व काय?
CIBIL स्कोर हा तुमच्या क्रेडिट इतिहासाचा संपूर्ण आढावा घेतल्यानंतर दिला जातो. हा स्कोर Credit Information Bureau India Limited (CIBIL) या संस्थेमार्फत ठरवला जातो. बँका आणि वित्तीय संस्था कर्ज मंजुरीपूर्वी हा स्कोर तपासतात. कारण हा स्कोर व्यक्तीची कर्जफेड करण्याची क्षमता आणि वित्तीय शिस्त दाखवतो. 700 पेक्षा अधिक स्कोर असलेली व्यक्ती अधिक विश्वासार्ह मानली जाते. ज्यामुळे तिला विविध प्रकारचे फायदे मिळतात.
चांगला CIBIL स्कोर असल्यास मिळणारे फायदे
उच्च CIBIL स्कोरचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कर्ज मंजुरीची प्रक्रिया जलद आणि सुलभ होते. ज्या व्यक्तींचा स्कोर 700 पेक्षा अधिक आहे.त्यांना बँका कर्ज देताना कोणत्याही अडथळ्याशिवाय मंजुरी देतात. त्यांच्यासाठी कर्ज प्रक्रियेतील कागदपत्रांची पूर्तता कमी होते आणि कर्ज अर्ज मंजूर होण्यासाठी जास्त प्रतीक्षा करावी लागत नाही.
याशिवाय चांगल्या CIBIL स्कोरमुळे कमी व्याजदरावर कर्ज मिळण्याची शक्यता वाढते. वित्तीय संस्था कमी जोखीम असलेल्या ग्राहकांना प्राधान्य देतात. त्यामुळे त्यांना व्याजदरात सवलत दिली जाते. याचा परिणाम असा होतो की, परतफेडीचा एकूण खर्च कमी होतो आणि ग्राहकाला मोठा आर्थिक फायदा होतो.
उच्च CIBIL स्कोर असलेल्या व्यक्तींना बँका आणि क्रेडिट कार्ड कंपन्या जास्त क्रेडिट लिमिट देतात. यामुळे मोठ्या खरेदीसाठी किंवा आर्थिक आपत्कालीन परिस्थितीत अतिरिक्त निधी मिळण्यास मदत होते. याशिवाय चांगल्या स्कोरमुळे ग्राहकांना अनेक प्रकारची कर्जे सहज उपलब्ध होतात.जसे की होम लोन, कार लोन, पर्सनल लोन इत्यादी. कमी कागदपत्रांमध्येही ही कर्जे मंजूर केली जातात. कारण आर्थिक संस्थांना खात्री असते की अशा व्यक्ती कर्जाची वेळेवर परतफेड करतील.
उच्च CIBIL स्कोरमुळे व्यक्तीची आर्थिक विश्वासार्हता वाढते. भविष्यात मोठ्या रकमेचे कर्ज घेण्याची गरज भासल्यास बँक आणि वित्तीय संस्था अशा ग्राहकांना अधिक प्राधान्य देतात. हा स्कोर चांगला असेल तर आर्थिक संस्थांकडून विविध फायदे मिळू शकतात. जसे की प्रोसेसिंग फीमध्ये सवलत, क्रेडिट कार्डवरील विशेष ऑफर्स, कमी कर्ज प्री-पेमेंट शुल्क इत्यादी.
CIBIL स्कोर सुधारण्यासाठी प्रभावी उपाय
जर तुमचा CIBIL स्कोर कमी असेल तर तो सुधारण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय करता येऊ शकतात. प्रथम सर्व कर्ज आणि क्रेडिट कार्ड बिलांची वेळेवर परतफेड करणे आवश्यक आहे. वेळेवर EMI आणि क्रेडिट कार्ड बिले न भरल्यास स्कोर नकारात्मकपणे प्रभावित होतो. तसेच अविचाराने कर्ज घेणे आणि क्रेडिट कार्डचा अतिरिक्त वापर टाळावा. कारण जास्त कर्ज आणि क्रेडिट लिमिटच्या 80-90% पेक्षा जास्त वापर हा आर्थिक संस्थांकडून धोका मानला जातो.
याशिवाय, नियमितपणे तुमचा क्रेडिट रिपोर्ट तपासणे गरजेचे आहे. काहीवेळा बँकांकडून किंवा क्रेडिट बुरोमधून चुकीची नोंद केली जाते. त्यामुळे तुमच्या स्कोरवर परिणाम होतो. जर अशा चुका आढळल्या, तर त्या त्वरित दुरुस्त करणे आवश्यक आहे. कर्ज घेण्यापूर्वी त्याच्या अटी आणि शर्ती व्यवस्थित वाचाव्यात आणि शक्यतो फक्त आवश्यक तेवढेच कर्ज घ्यावे.
CIBIL स्कोर का महत्त्वाचा आहे?
CIBIL स्कोर चांगला असेल तर बँका आणि वित्तीय संस्था विशेष ऑफर्स आणि कमी व्याजदर देतात.त्यामुळे ग्राहकाला मोठा आर्थिक फायदा होतो. याउलट कमी स्कोर असल्यास कर्ज मंजुरीसाठी अडचणी येऊ शकतात आणि कर्ज घेताना उच्च व्याजदर भरावा लागू शकतो. त्यामुळे, आर्थिक नियोजन करताना CIBIL स्कोर सुधारण्यावर भर देणे आवश्यक आहे.