For the best experience, open
https://m.krushimarathi.com
on your mobile browser.

शेतातील Electric पंपाचे आयुष्य 2 पट वाढवा! फक्त वापरा या सोप्या टिप्स आणि मिळवा फायदेच फायदे

09:32 AM Feb 15, 2025 IST | Krushi Marathi
शेतातील electric पंपाचे आयुष्य 2 पट वाढवा  फक्त वापरा या सोप्या टिप्स आणि मिळवा फायदेच फायदे
electric pump
Advertisement

Electric Pump Care Tips:- शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या मोटारी वारंवार जळण्याची समस्या अनेक शेतकऱ्यांना भेडसावत असते. विजेवर चालणाऱ्या मोटारी प्रामुख्याने दोन प्रकारच्या असतात ए.सी. आणि डी.सी. महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी ए.सी. वीजपुरवठा असल्याने प्रामुख्याने ए.सी. मोटारीच वापरण्यात येतात. या मोटारी सिंगल फेज (एक तार असलेली) आणि थ्री फेज (तीन तार असलेली) अशा दोन प्रकारांत विभागल्या जातात.

Advertisement

लहान क्षमतेच्या (एक हॉर्सपॉवर किंवा त्याहून कमी) मोटारींना एक फेजचा पुरवठा दिला जातो. तर मोठ्या क्षमतेच्या मोटारींना तीन तारांद्वारे थ्री फेज पुरवठा केला जातो. विशेषतः ए.सी. मोटारी सुरू होताना तब्बल चौपट विद्युत प्रवाह घेतात. त्यामुळे त्यांना सुरुवातीला स्टार्टरची आवश्यकता असते. मोटारीचा योग्य वापर आणि देखभाल केल्यास ती दीर्घकाळ टिकते आणि वारंवार होणारे बिघाड टाळता येतात.

Advertisement

मोटार निवडताना लक्षात घ्यायच्या बाबी

Advertisement

मोटारची किंमत आणि दर्जा – स्वस्त पर्यायांऐवजी गुणवत्तेशी तडजोड न करता योग्य ब्रँडची मोटार निवडावी.

Advertisement

मोटारीची क्षमता – करावयाच्या कामाच्या स्वरूपानुसार योग्य अश्वशक्ती (एचपी) असलेली मोटार निवडावी.

Advertisement

आरपीएम (फेऱ्यांची संख्या) – पंप, गिरणी, किंवा चाकासाठी आवश्यक फेऱ्यांची गणना करून मोटार निवडावी.

स्थळाची परिस्थिती – मोटार बसवायची जागा पाण्याच्या संपर्कात असेल किंवा धूळ व कचरा जमा होणारा भाग असेल तर पूर्ण झाकलेली मोटार घ्यावी.

मोटार जळण्याची संभाव्य कारणे

मोटारच्या वेटोळ्यातील तारेवरचा इन्सुलेशनचा पापुद्रा वितळून वेटोळे जळले की, मोटार ‘जळली’ असे म्हणतात. मोटार जळण्याची कारणे पुढीलप्रमाणे असू शकतात –

अयोग्य क्षमतेची मोटार वापरणे – कमी अश्वशक्तीची मोटार अधिक भार सहन करू शकत नाही.

ओलसरपणा आणि पाणी शिरणे – मोटारच्या वेटोळ्यात पाणी शिरल्यास शॉर्टसर्किट होऊन ती जळू शकते.

प्राणी आणि कीटक शिरणे – उंदीर, पाली, झुरळे, लहान बेडूक मोटारीत शिरल्यास विद्युत प्रवाह अनियमित होतो आणि मोटार जळते.

धूळ आणि कचरा साचणे – मोटारीत जास्त धूळ आणि कचरा गेल्यास ती अधिक तापते आणि जळण्याचा धोका निर्माण होतो.

रोटर व स्टार्टर यांच्यात घर्षण होणे – यामुळे मोटारीत जास्त तापमान निर्माण होते आणि ती जळते.

मोटार जळण्यापासून वाचण्यासाठी उपाय

पाण्याचा संपर्क टाळा – मोटारीवर पाणी उडू देऊ नये. चालू करण्यापूर्वी पाणी शिरलेले नाही याची खात्री करावी.

प्राणी व कीटक दूर ठेवा – मोटार झाकून ठेवावी, जेणेकरून उंदीर, पाली, झुरळे इत्यादी आत जाऊ शकणार नाहीत.

योग्य फाऊंडेशन– मोटार समतल ठिकाणी बसवावी आणि नियमितपणे बेअरिंगला ग्रीस आणि वंगण तेल द्यावे.

ओव्हरलोडिंग टाळा – कमी क्षमतेच्या मोटारीवर जास्त भार देणे टाळावे.

पर्यायी आधार टाळा – इतर वस्तूंचा टेकू लावून मोटार चालवू नये.

सतत वापर टाळा – मोटार सतत न चालवता मधूनमधून विश्रांती द्यावी.

तज्ञांकडून दुरुस्ती करून घ्या – मोटार जळल्यास खात्रीच्या ठिकाणी रीवाइंडिंग करून घ्यावे.

विजेच्या धोक्यांपासून बचाव करण्यासाठी घ्यायची काळजी

कोरड्या लाकडी फळीवर उभे राहून काम करावे – हे विजेच्या धक्क्यापासून संरक्षण करते.

फ्यूज वायर बसवताना रबर हातमोजे वापरावेत – यामुळे विजेचा धक्का बसण्याची शक्यता कमी होते.

मोटारीचे काम करताना मुख्य स्विच बंद करावा – विजेचा अपघात टाळण्यासाठी हे आवश्यक आहे.

चालू मोटारीला हात लावू नये – यामुळे विजेचा झटका बसू शकतो.
काम झाल्यानंतर मुख्य स्विच बंद करावा – वीज अपघात टाळण्यासाठी हा महत्त्वाचा उपाय आहे.