उन्हाळी हंगामात भुईमुगाची लागवड करणार असाल तर ‘या’ वाणाची निवड करा !
Unhali Bhuimug Lagwad : भुईमूग हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक प्रमुख तेलबिया पिक. याची लागवड राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये केली जाते. याची लागवड ही खरीप आणि उन्हाळी हंगामात सुद्धा केली जाते.
दरम्यान जर तुम्हीही उन्हाळी हंगामात भुईमूग लागवडीच्या तयारीत असाल तर आजची बातमी तुमच्या कामाची ठरणार आहे. कारण की आज आपण उन्हाळी हंगामात लागवडीसाठी उपयुक्त अशा भुईमुगाच्या सुधारित जातींची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
शेतकरी मित्रांनो जून महिन्यात खरीप हंगामातील पिकांची पेरणी सुरू होत असते. यामुळे जर तुम्हाला उन्हाळी हंगामात भुईमुगाची लागवड करायची असेल तर कमी कालावधी तयार होणाऱ्या वाणाची निवड करणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरणार आहे.
आगामी खरीप हंगाम लक्षात घेता उन्हाळी भूईमुग मे महिन्या अखेरपर्यंत निघणे आवश्यक असते. यामुळे कृषी तज्ञ भुईमुगाच्या अशा वाणाची निवड करण्याचा सल्ला देतात जे जास्तीत जास्त 115 दिवसांपर्यंत परिपक्व होतील.
उन्हाळी हंगामात जर ११० ते ११५ दिवसात परिपक्व होणाऱ्या उपट्या प्रकारातील जातीची निवड केली तर शेतकऱ्यांना चांगले उत्पादन तर मिळणारच आहे शिवाय आगामी खरीप हंगामातील पेरणीसाठी देखील शेत रीकामे होणार आहे.
उन्हाळी हंगामातील पेरणीसाठी कोणत्या वाणाची निवड कराल?
उन्हाळी हंगामात भुईमुगाची पेरणी करायची असेल तर शेतकरी बांधव टीएजी ७३, टीएजी २४ आणि एसबी ११ या वाणापैकी एका वाणाची निवड करु शकतात. यातील टीएजी ७३ या वाणाबाबत बोलायचं झालं तर हा विद्यापीठाने अलीकडेच विकसित केलेला वाण आहे.
या वाणाची उत्पादन क्षमता टीएजी २४ या वाणा पेक्षा जास्त आहे. तसेच याचा दाण्याचा उतारा सुध्दा जास्त आहे. हा वाण 110 ते 115 दिवसात परिपक्व होतो. टीएजी २४ हा सुद्धा असाच एक वाण असून
याची उत्पादनक्षमता टी ए जी 73 पेक्षा कमी असली तरी देखील हा वाण देखील उन्हाळी हंगामातील एक उत्कृष्ट वाण असून हा सुद्धा 110 ते 115 दिवसात पक्व होतो. या जातींची निवड करायची असल्यास हेक्टरी १०० ते १२५ किलो बियाणे वापरावे असा सल्ला कृषी तज्ञांनी दिला आहे.