कृषी बातम्यासरकारी योजनाबाजारभावयशोगाथाहवामानस्पेशल स्टोरी
Advertisement

पुण्याच्या ‘या’ संस्थेने विकसित केले कांद्याचे 3 नवीन वाण! साठवता येईल जास्त दिवस कांदा आणि हेक्टरी मिळेल 200 क्विंटल उत्पादन

12:58 PM Jan 24, 2025 IST | Sonali Pachange
onion crop

Onion Variety:- शेती विकासामध्ये कृषी विद्यापीठे आणि देशात असलेल्या कृषी संशोधन संस्था यांची खूप मोलाची भूमिका असून शेती संबंधित असलेले तंत्रज्ञान आणि विविध पिकांचे नवनवीन वाण विकसित करून विविध पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी अशा संस्थांचे किंवा विद्यापीठांचे योगदान खूप अमूल्य आहे.

Advertisement

तसेच आपण कांदा या पिकाच्या दृष्टिकोनातून बघितले तर महाराष्ट्रमध्ये मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड केली जाते. परंतु कांदा हा लवकर खराब होतो व त्यामुळे त्याची जास्त दिवस साठवण करता येत नसल्यामुळे आहे त्या बाजारभावात कांद्याची विक्री शेतकऱ्यांना करावी लागते व बऱ्याचदा कमी बाजारभाव शेतकऱ्यांना मिळत असल्याने आर्थिक फटका बसतो.

Advertisement

परंतु आता कांद्याचे तीन नवीन वाण विकसित करण्यात आले आहेत व या वाणांचे वैशिष्ट्ये जर बघितले तर त्यांची टिकवण क्षमता चांगली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नक्कीच याचा फायदा होईल.

विकसित करण्यात आले कांद्याचे हे तीन वाण

Advertisement

1- डीओजीआर-1625- कांद्याचे दर्जेदार आणि जास्त उत्पादन देणारा हा वाण असून कांद्याचा रंग चमकदार लाल असतो व गोलाकार आकाराचा हा कांदा विविध रोगांना देखील चांगला प्रतिकारक आहे. विशेष म्हणजे ही जात डबल्स आणि बोल्टर्स रोगापासून मुक्त आहे व या रोगामध्ये कांद्याचे कंद तयार होत नाहीत व त्या जागी फुले येऊन बिया तयार होतात.

Advertisement

कांद्याच्या या वाणापासून हेक्टरी २१७ क्विंटल उत्पादन मिळू शकते.लागवडीनंतर 105 ते 110 दिवसात काढणीस तयार होतो. खरीप हंगामात लागवडीसाठी फायद्याचा वाण असून जबलपूर तसेच रायपूर, अकोला आणि झालावाड करिता हे वाण खास करून विकसित करण्यात आले आहे. हे वाण आयसीएआर कांदा आणि लसूण संशोधन संस्था पुणे यांनी विकसित केले आहे.

2- डीओजीआर-1203- डीआर- कांद्याचा हा वाण पुण्यातील कांदा आणि लसूण संशोधन संस्थेने विकसित केला असून उच्च उत्पादन देणारा हा वाण आहे. यामध्ये देखील बोल्टर आणि डबल्सची समस्या येत नाही.

काढणीस लवकर तयार होणारा वाण असून रब्बी हंगामात या जातीची लागवड केली जाते. या जातीपासून प्रति हेक्टरी 278 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळू शकते. विशेष म्हणजे या वाणाचा कांदा पाच ते सहा महिन्यांपर्यंत साठवता येतो. नासिक, पुणे तसेच राहुरी व जुनागड या भागांमध्ये याची लागवड करून चांगले उत्पादन घेतले जाऊ शकते.

3- डीओजीआर-आरजीपी-3- या जातीचा कांदा हा दिसायला आकर्षक आणि गोलाकार असतो. तीन महिन्यापर्यंत उत्तम पद्धतीने साठवण्यासाठी कांद्याची ही जात फायद्याची ठरते. या जातीपासून हेक्टरी 207 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळू शकते.

सगळ्यात महत्वाचे म्हणजे लागवडीनंतर 100 ते 105 दिवसात काढणीस तयार होतो व खरीप हंगामामध्ये लागवडीसाठी उपयुक्त आहे. कांद्याचा हा वाण देखील अकोला,

जबलपूर तसेच रायपूर व झालावाड इत्यादी ठिकाणी लागवडीसाठी योग्य असल्याचे म्हटले गेले आहे. कांद्याचा हा वाण आयसीएआर- कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय राजगुरुनगर, पुणे येथे विकसित करण्यात आला आहे.

Next Article