For the best experience, open
https://m.krushimarathi.com
on your mobile browser.

सुरू उसाच्या लागवडीसाठी निवडा ‘या’ उसाच्या टॉप जाती! मिळेल पैसाच पैसा

08:56 PM Jan 18, 2025 IST | Sonali Pachange
सुरू उसाच्या लागवडीसाठी निवडा ‘या’ उसाच्या टॉप जाती  मिळेल पैसाच पैसा
sugarcane crop
Advertisement

Top Sugarcane Variety:- महाराष्ट्रामध्ये ऊस लागवड खूप मोठ्या प्रमाणावर केली जाते. महाराष्ट्रातील मराठवाड्यातील काही जिल्हे व पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड केली जाते. नगदी पीक म्हणून शेतकरी ऊस पिकाकडे पाहतात व त्यामुळे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचे असे पीक आहे.

Advertisement

गेल्या काही वर्षापासून जर बघितले तर शेतकऱ्यांनी उसाचे भरघोस उत्पादन मिळवण्यामध्ये यश संपादन केल्याचे आपल्याला दिसून येते. यामध्ये शेतकऱ्यांनी जमीन सेंद्रिय खतांनी समृद्ध करण्यापासूनच व्यवस्थापनाच्या उत्तम अशा पद्धतीचा अवलंब करून आणि तंत्रज्ञानाचा वापर करून अपेक्षित उत्पादन मिळवण्यामध्ये यश संपादन केले आहे.

Advertisement

या सगळ्यांमध्ये मात्र उसाच्या लागवडीसाठी टॉप असलेल्या व्हरायटींची म्हणजेच वाणाची लागवड करणे हे देखील तितकेच गरजेचे आहे. या अनुषंगाने तुम्हाला देखील जर सुरू उसाची लागवड करायची असेल तर त्याकरिता लवकर आणि मध्यम पक्व होणाऱ्या वाणांची निवड करणे खूप गरजेचे आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव यांनी सुरू हंगामासाठी काही वाणांची शिफारस केलेली आहे. त्याची आपण थोडक्यात माहिती बघू.

Advertisement

सुरु उसाच्या लागवडीसाठी टॉप व्हरायटी

Advertisement

1- को.एम. 0265( फुले-265)- उसाच्या को 86032 या व्हरायटीपेक्षा 20 ते 25 टक्के जास्त उत्पादन देण्याच्या दृष्टिकोनातून ही व्हरायटी फायद्याची आहे व क्षारयुक्त तसेच चोपण जमिनीत देखील इतर उसाच्या वाणापेक्षा 14 महिन्यात अधिक उत्पादन देते. सरासरी उत्पादन क्षमता जर बघितली तर हेक्टरी दीडशे टन इतकी आहे.

Advertisement

2- फुले 92005- फुले 92005 या व्हरायटीलाच को.92005 असे म्हटले जाते. या व्हरायटीचे वैशिष्ट्य म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये यापासून चांगले उत्पादन मिळते.सरासरी उत्पादन जर बघितले तर हेक्टरी 128.69 टन इतके आहे.

3- फुले 9057( को.एम. 9057)- उसाच्या या व्हरायटीचे वैशिष्ट्य म्हणजे गुळाचे अधिक उत्पादन यापासून मिळते. तसेच साखरेचा उतारा देखील चांगला मिळतो. उसाचे वजन चांगले असते व फूट देखील कमी असल्याने जवळ लागवड करावी लागते. हेक्टरी उत्पादन जर बघितले तर सरासरी 130.05 टन इतके आहे.

4- फुले 15012- हा एक नवीन वाण म्हणजेच व्हरायटी असून अधिक उसाचे उत्पादन मिळवण्याच्या दृष्टिकोनातून फायद्याची व्हरायटी आहे. खोडवा देखील उत्तम येतो तसेच साखरेचा उतारा चांगला मिळतो व पाचट गळून पडते. हेक्टरी सरासरी उत्पादक जर बघितले तर ते 130. 38 मॅट्रिक टन इतके आहे.

5- को.86032( निरा)- या वाणाचे एकरी 75 टनापेक्षा अधिक उत्पादन सुरू हंगामात शेतकरी घेत असून हा वाण 1996 मध्ये प्रसारित करण्यात आलेला होता. साखरेचा उतारा 14.44% असून यापासून सरासरी उत्पादन हे हेक्‍टरी 106 टन इतके मिळते.