सरकारकडून 4 लाख रुपयांची मदत घ्या आणि कृषी ड्रोन खरेदी करा! ‘हे’ 4 टॉप कृषी ड्रोन करतात 10 मिनिटात पिकावर फवारणी
Top Krushi Drone:- शेतीमध्ये आता अनेक वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान येऊ घातले असून अवघडातले अवघड शेतीची कामे आता कमीत कमी वेळेमध्ये आणि कमीत कमी खर्चामध्ये करता येणे शक्य झाले आहे. तसेच तंत्रज्ञानाच्या मदतीने आता शेतकरी कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवू लागले आहे.
अत्यंत हायटेक स्वरूपाच्या तंत्रज्ञानाचा वापर आता शेतीमध्ये होत असून याच तंत्रज्ञानाचा भाग म्हणून आता कृषी ड्रोनकडे पाहिले जात आहे. शेती पिकांवरील फवारणी तसेच शेतीच्या पिकांचा डेटा गोळा करणे व रोग नियंत्रणासाठी देखील कृषी ड्रोनचा वापर करता येणे शक्य आहे.
त्यामुळे आता जास्तीत जास्त शेतकरी या ड्रोन तंत्रज्ञानाशी जोडले जावे याकरिता ड्रोन प्रशिक्षण आणि ड्रोन खरेदीवर अनुदान देण्याची तरतूद सरकारच्या माध्यमातून करण्यात आली आहे. सरकार ड्रोन खरेदी करण्यासाठी सामान्य प्रवर्गातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त चार लाख रुपयांची मदत या माध्यमातून करते आणि 40 टक्के अनुदानाची तरतूद देखील यामध्ये आहे.
या अनुषंगाने जर आपण शेती कामासाठी फायद्याचे टॉप कृषी ड्रोन जर बघितले तर ते अनेक अर्थांने शेतीसाठी खूप फायद्याचे ठरतील व हे टॉप कृषी ड्रोन कोणते आहेत? त्याची माहिती थोडक्यात बघू.
शेती कामासाठी ही आहेत चार टॉप कृषी ड्रोन
1- एस-550 स्पीकर ड्रोन- या ड्रोनची पूर्ण बॉडी वॉटरप्रूफ पद्धतीचे असून फवारणी करण्यासाठी यामध्ये दहा लिटर पाणी म्हणजेच द्रव भरता येते व शेतातील पिकांवर फवारणी करण्यासाठी हा ड्रोन खूप फायद्याचा ठरतो.
या कृषी ड्रोनमध्ये सेन्सर्सचा वापर करण्यात आला आहे.काही धोका निर्माण होण्यापूर्वी शेतकऱ्यांना याबाबत अलर्ट केले जाते. या कृषी ड्रोनची किंमत सुमारे चार लाख 50 हजार रुपये इतकी आहे व यामध्ये जीपीएस आणि ग्राउंड कंट्रोल पॅच आहे.
2- कार्बन फायबर कृषी ड्रोन- या ड्रोनला केसीआय हेक्साकॉप्टर असे देखील म्हटले जाते. या ड्रोनमध्ये फवारणीकरिता दहा लिटर पर्यंत कीटकनाशके व पाणी मावू शकते. कार्बन फायबर कृषी ड्रोनला ॲनालॉग कॅमेरा तंत्रज्ञानाशी जोडले गेले आहे
व त्यामुळे पिकांचे निरीक्षण करणे शेतकऱ्यांना खूप सोपे होते. भारतात या कृषी ड्रोनची किंमत भारतामध्ये तीन लाख 60 हजार रुपये इतकी आहे.
3- आयजी ड्रोन एग्री- हे ड्रोन अतिशय वेगात हवेत फिरणारे ड्रोन म्हणून ओळखले जाते. या ड्रोनमध्ये साधारणपणे फवारणीसाठी पाच ते वीस लिटर कीटकनाशके आणि द्रव्य खते सामावू शकतात व हे एक अद्भुत कृषी ड्रोन असून याची बाजारातील किंमत चार लाख रुपये इतकी आहे.
4- केटी डॉन ड्रोन- या कृषी ड्रोनमध्ये क्लाऊड इंटेलिजंट मॅनेजमेंटचा वापर केला असून हे ड्रोन दहा ते शंभर लिटर पर्यंत द्रव पदार्थ आरामात वाहून नेऊ शकते.
यामध्ये मॅप मॅनेजमेंट सिस्टम आहे व हँडहोल्ड स्टेशनच्या मदतीने शेतकरी शेताचे सहज मोजमाप देखील करू शकतात. या ड्रोनची भारतीय बाजारातील किंमत साधारणपणे तीन लाख रुपये इतके आहे.
कृषी ड्रोनचे फायदे
कृषी ड्रोनमध्ये कॅमेरा तंत्रज्ञानाचा वापर एकत्रित करण्यात आला आहे व यामुळे शेताचे मॅपिंग करता येते व त्यासोबतच कीटक तसेच रोग, तण आणि प्राण्यांचे निरीक्षण करण्यास मदत करते. अशा प्रकारच्या ड्रोनमध्ये वापरण्यात आलेले सेन्सर शेतकऱ्यांना पिकात वाढत्या कीटक आणि संभाव्य रोगांच्या धोक्याबद्दल किंवा इतर समस्यांबद्दल आधीच अलर्ट करतात.
इतकेच नाही तर या कृषी ड्रोनच्या मदतीने शेतकरी हवामानाची स्थिती आणि पिकांच्या गरजा देखील ओळखून त्या पूर्ण करू शकतात. सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे फवारणीसाठी जो काही खूप वेळ लागतो. तितक्याच क्षेत्राच्या फवारणीसाठी ड्रोनचा वापर केला तर ते फवारणीचे काम काही मिनिटात पूर्ण होते.