Guava Farming: पेरूची शेती म्हणजे लाखोंची कमाई…. जाणून घ्या सांगलीतील शेतकऱ्याचा मॅजिक फॉर्मुला
Farmer Success Story:- सांगली जिल्ह्यातील शेतकरी उदय पाटील यांनी पारंपरिक ऊस शेतीला मागे सोडून थायलंड वंशाच्या वीएनआर पेरूच्या शेतीत यशस्वीपणे प्रवेश केला आहे. शेतकऱ्यांच्या आयुष्यात जी बदल घडवणारी गोष्ट होती.ती म्हणजे पेरू शेतीची निवड. त्याआधी त्यांनी ऊस आणि इतर पारंपरिक पिकांच्या शेतीतून उत्पन्न मिळवले.पण त्या पद्धतीत कितीही प्रयत्न केले तरी स्थिर नफा मिळणे कठीण होऊ लागले. अशा परिस्थितीत त्यांनी थायलंड वंशाच्या पेरूची शेती करण्याचा निर्णय घेतला.
उदय पाटील यांची पेरू लागवड
उदय पाटील यांनी दीड एकर जमिनीवर पेरूच्या बागेची लागवड केली. या पिकासाठी त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेताची चांगली देखरेख केली आणि उत्तम पद्धतीने पेरूच्या उत्पादनाला चालना दिली. पहिल्या वर्षीच 15 टन उत्पादन मिळालं.परंतु दुसऱ्या वर्षी उत्पादनात वाढ झाली आणि ते 35 टनांपर्यंत पोहोचले. प्रत्येक पेरू साधारणतः 1 किलो वजनाचा असतो आणि पेरूच्या बाजारभावानुसार प्रति किलो 60 ते 65 रुपये मिळतात. यामुळे शेतकऱ्यांना खूप चांगला नफा झाला.
वीएनआर पेरू व्हरायटी आहे फायद्याची
वीएनआर पेरू हा उच्च दर्जाचा वाण असून, त्याची 30 हून अधिक देशांमध्ये निर्यात केली जाते. भारतामध्ये बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटका, ओडिशा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू यासारख्या राज्यांमध्ये पेरूच्या शेतीला मोठा विस्तार आहे. उष्णकटिबंधीय आणि कोरड्या हवामानासाठी या पिकाची शेती उपयुक्त आहे. त्यामुळे या पिकाने उन्हाळ्यात आणि दुष्काळी भागांमध्येही उत्तम उत्पादन देण्याची क्षमता आहे.
उदय पाटील यांच्या पेरू शेतीत केलेल्या प्रयोगांमुळे फळशेतीकडे वळण्याचे महत्त्व शेतकऱ्यांना लक्षात येऊ लागले आहे. पारंपरिक ऊस शेतीपेक्षा पेरू आणि इतर बागायती पिकांमधून अधिक फायदा मिळवता येतो. त्याचबरोबर, पेरूच्या बागेत झेंडूचे अंतरपीक म्हणून लागवड केल्यामुळे जमिनीची सुपीकता सुधारली आणि अतिरिक्त उत्पन्न मिळाले. शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय पद्धती आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे कमी जागेत अधिक उत्पादन मिळवणे शक्य झाले आहे.
उदय पाटील यांच्या यशस्वी प्रयोगाने कृषी क्षेत्रात नवचैतन्य निर्माण केलं आहे. त्यांचे उदाहरण इतर शेतकऱ्यांना प्रेरणा देत आहे की, पारंपरिक शेतीला सोडून फळशेती किंवा बागायती शेतीतून अधिक नफा मिळवता येऊ शकतो. सेंद्रिय पद्धती आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतात आणि त्यांचं जीवनमान सुधारू शकते.
या शेतीच्या पद्धतीमुळे भविष्यात अधिक शेतकऱ्यांना ऊस शेतीऐवजी फळशेतीकडे वळण्याची प्रेरणा मिळणार आहे. उदय पाटील यांच्यासारख्या प्रगतीशील शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्रात एक नवा आदर्श स्थापित केला आहे.