कृषी बातम्यासरकारी योजनाबाजारभावयशोगाथाहवामानस्पेशल स्टोरी
Advertisement

Keshar Lagvad: नागपूरच्या दाम्पत्याने छोट्या खोलीत उभं केलं मिनी काश्मीर… केशर शेतीतून वार्षिक मिळवले 50 लाखांचे उत्पन्न

12:24 PM Feb 19, 2025 IST | Krushi Marathi
keshar lagvad

Success Story:- केशर हा जगातील सर्वात महागडा आणि प्रतिष्ठेचा मसाला आहे. एका किलो केशरला लाखो रुपयांचा दर मिळतो आणि मिठाई, औषधं, सौंदर्यप्रसाधने यासारख्या क्षेत्रांमध्ये त्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. परंतु, केशर शेतीसाठी थंड हवामान आवश्यक असल्याने भारतात केवळ जम्मू-काश्मीरमध्येच ही शेती केली जाते. अशा वेळी नागपूरमधील एका उच्चशिक्षित दाम्पत्याने केशर शेतीचा अनोखा प्रयोग करून दाखवला आहे. त्यांनी एका खोलीत एरोपोनिक पद्धतीने केशर शेती सुरू केली असून, आज ते लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवत आहेत.

Advertisement

अशाप्रकारे सुरू केली केशर शेती

Advertisement

अक्षय होले आणि दिव्या लोहकरे असे या दाम्पत्याचे नाव असून, ते नागपूरच्या लोकसेवा नगर परिसरात राहतात. दोघेही उच्चशिक्षित असून, शेती आणि कृषी क्षेत्रात प्रयोगशीलतेची आवड असल्याने त्यांनी 2020 मध्ये त्यांच्या टेरेसवर 80 चौरस फूट क्षेत्रफळावर एरोपोनिक युनिट तयार करून केशर लागवडीचा प्रयोग सुरू केला.

मात्र, हा प्रयोग सुरू करण्यापूर्वी त्यांनी काश्मीरमध्ये तब्बल साडेतीन महिने राहून पारंपरिक केशर शेतीचे बारकावे शिकले. केशर हा महागडा आणि उच्च मागणी असलेला मसाला असल्याने, भारतात त्याचे उत्पादन कमी असूनही त्याची मोठ्या प्रमाणात गरज आहे. हे लक्षात घेऊन त्यांनी प्रयोग करण्याचा निर्णय घेतला.

Advertisement

शेतीच्या पहिल्या टप्प्यात, अक्षय आणि दिव्याने 100 कॉर्म्स (केशरचे बियाणे) विकत घेतले आणि त्यांची लागवड केली. मात्र, त्यातून केवळ काही ग्रॅम केशर मिळाले. यामुळे त्यांनी उत्पादन तंत्रज्ञान अधिक समजून घेऊन मोठ्या प्रमाणावर लागवड करण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्यांनी 350 किलो कॉर्म्स आणले आणि त्यातून तब्बल 1,600 ग्रॅम (1.6 किलो) उत्पादन करण्यात यश मिळवले. हे यश मिळाल्यानंतर त्यांनी आपली केशर शेती वाढवत नेली आणि सध्या त्यांचे युनिट 480 चौरस मीटरपर्यंत विस्तारले आहे.

Advertisement

केशर शेतीतून मिळवले 40 ते 50 लाखांचे उत्पन्न

या अभिनव प्रयोगामुळे गेल्या दोन वर्षांत या जोडप्याला वार्षिक 40 ते 50 लाख रुपये उत्पन्न मिळत आहे. केवळ स्वतःच केशर शेती यशस्वीपणे करत नाहीत, तर इच्छुक शेतकऱ्यांना प्रशिक्षणही देत आहेत. आतापर्यंत 150 हून अधिक लोकांना त्यांनी केशर लागवडीचे प्रशिक्षण दिले आहे, त्यापैकी 29 जणांनी स्वतःचे युनिट सुरू केले आहे.

हे जोडपे प्रत्येक सहभागीला 15,000 रुपये शुल्क आकारून प्रशिक्षण देतात आणि नवीन उत्पादकांना त्यांची युनिट्स स्थापन करण्यात मदत करतात. त्यानंतर, उत्पादन झाल्यावर त्यांनीच हे केशर परत विकत घेऊन पॅकेजिंग व मार्केटिंगसाठी मदत करतात.

नागपूरमधील या दाम्पत्याने अल्प जागेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती करून एक नवा आदर्श निर्माण केला आहे. पारंपरिक शेतीच्या पलीकडे जाऊन नवीन संधी कशा निर्माण करता येतात याचे उत्तम उदाहरण त्यांनी घालून दिले आहे. त्यांचा हा उपक्रम अनेक नवउद्योजक आणि शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Next Article