कृषी बातम्यासरकारी योजनाबाजारभावयशोगाथाहवामानस्पेशल स्टोरी
Advertisement

युट्युब वरून माहिती मिळवून शेवगा पावडर तयार करायला केली सुरुवात! अमेरिकेला निर्यात करून मिळवतो लाखो रुपये

09:30 AM Jan 23, 2025 IST | Sonali Pachange
moringa powder

Farmer Success Story:- कुठल्याही क्षेत्रामध्ये नाविन्यपणा आणला किंवा काही वेगळेपण आणले तर नक्कीच फायदा होतो हे आपल्याला अनेक उदाहरणाच्या माध्यमातून दिसून येते. काहीतरी वेगळे करण्याच्या उद्देशाने जर प्रयत्न केले तर हाच प्रयोगशीलपणा किंवा काहीतरी वेगळे करण्याची वृत्ती व्यक्तीला चांगले पैसे देऊन जाते व पैसा देखील मिळवून जाते.

Advertisement

हाच मुद्दा शेतीच्या बाबतीत देखील लागू होतो. शेतीमध्ये जर काहीतरी वेगळेपण आणण्याचे ठरवले व त्या दृष्टिकोनातून काम केले तर नक्की शेतीत देखील लाखो रुपये मिळवून देते हे आपल्याला अनेक शेतकऱ्यांच्या उदाहरणावरून सध्या दिसून येते.

Advertisement

जर आपण करमाळा तालुक्यातील महादेव मोरे या शेतकऱ्याची यशोगाथा बघितली तर या शेतकऱ्याने शेवग्याची लागवड करून शेवग्याच्या शेंगा न विकता त्या शेवग्याच्या पाल्यापासून पावडर तयार करून त्याची विक्री करायला सुरुवात केली व ती शेवगा पावडर अमेरिकेला पाठवून त्यातून लाखो रुपये कमावले.

शेवगा पावडर विक्रीतून लाखोत कमाई
याबाबत सविस्तर वृत्त असे की, करमाळा तालुक्यातील साडे या गावचे तरुण शेतकरी महादेव मोरे यांनी शेवगा शेती करायची ठरवली व अगोदर फक्त एक एकर शेवगा लागवड त्यांनी केली. परंतु दुर्दैवाने कोरोना आला आणि शेवग्याच्या शेतीमधून त्यांना नुकसान झाले. एक एकर शेवगा लागवडीसाठी त्यांनी जितका खर्च केलेला होता तो सुद्धा त्यांना परत मिळाला नाही.

Advertisement

म्हणून त्यांनी शेवग्याच्या शेंगा न विकता शेवग्याच्या पालाची पावडर करून विक्री करायचा निर्णय घेतला. शेवग्याच्या पावडरची जी काही कल्पना आहे ती त्यांना गुजरात मधील शेवगा शेती विषयीची युट्युब वर जी माहिती पाहिली त्यावरून मिळाली. यासाठी त्यांनी सुरुवात म्हणून एक ते दीड एकरात शेवगा पाल्याचा पावडरचा प्रयोग करायचे ठरवले.

Advertisement

सुरुवातीची तयार पावडर त्यांनी कोलकत्ता तसेच हैदराबाद, नागपूर, मुंबई तसेच पुणे इत्यादी ठिकाणी विक्री केली व त्यामध्ये त्यांना यश मिळाले. आज ते साडेसात एकर शेवगा शेती करतात व या शेवग्याच्या पाल्यापासून पावडर तयार करून ती हवाबंद ड्रममध्ये 25 किलोची पॅकिंग याप्रमाणे अमेरिकेला पाठवत असून त्यातून लाख रुपये त्यांनी आतापर्यंत कमावलेली आहेत.

शेवगा पाला पावडर उत्पादनाचा एकरी खर्च हा पन्नास हजारापर्यंत येतो व त्यातून मिळणारे उत्पन्न मात्र तब्बल चार ते पाच लाख रुपये इतके मिळते. विशेष म्हणजे शेवगा पाला पावडर उत्पादनासाठीचा जो काही प्लॉट असतो तो एकदा लागवडीनंतर आठ ते दहा वर्षे चालतो व त्याकरिता पाणीदेखील कमीत कमी लागते.

शेवग्याच्या पावडरची मागणी का?
शेवगाच्या शेंगा या गुणकारी आहेत तसेच शेवग्याची पावडर ही देखील आरोग्यदायी असून शुगर तसेच ब्लड प्रेशर यासह इतर 300 पेक्षा जास्त आजारांवर गुणकारी औषध म्हणून ओळखली जाते. असे म्हटले जाते की,मुळव्याध आणि मुतखडा असे दोन आजार वगळले तर सर्व आजारांवर शेवगा गुणकारी आहे.

शेवगा पाला पावडर म्हणजेच मोरिंगा पावडर औषधासाठी उपयोगात आणली जात आहे.महादेव मोरेंनी कुठल्याही प्रकारचा रासायनिक खतांचा वापर न करता फक्त गांडूळ खत व शेणखताचा वापर करून या शेवग्याच्या पिकाची जोपासना केली व त्याच्या पाल्यापासून ही पावडर ते तयार करतात. एकरी पन्नास हजार खर्च करून चार ते पाच लाख रुपयांचे उत्पन्न ते मिळवत असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

Next Article