कृषी बातम्यासरकारी योजनाबाजारभावयशोगाथाहवामानस्पेशल स्टोरी
Advertisement

2 एकर खडकाळ जमिनीवर खड्डे खोदून केली खजुराची लागवड! मिळाले तब्बल 28 लाख रुपयांचे उत्पन्न; जाणून घ्या शेतकऱ्याचा भन्नाट प्रयोग

12:18 PM Jan 21, 2025 IST | Sonali Pachange
dates crop

Dates Farming:- तंत्रज्ञानाच्या मदतीने आता शेतीमध्ये कुठलेही पीक घेता येणे शक्य झाले आहे व शेतकरी आता तंत्रज्ञानाचा वापर करून नावीन्यपूर्ण प्रयोग शेतीमध्ये करत आहेत. आधुनिक तंत्रज्ञान तसेच बदललेली पीक पद्धती व त्याला कष्टाची जोड देऊन कमीत कमी क्षेत्रामध्ये लाखो रुपयांचे उत्पन्न शेतकरी मिळवताना आपल्याला दिसून येत आहेत.

Advertisement

याच मुद्द्याला धरून जर आपण जालना जिल्ह्यातील घनसांगवी तालुक्यात असलेल्या तनवाडी या गावचे जगदशी शेडगे यांची यशोगाथा पाहिली तर ती थक्क करणारी आणि इतर शेतकऱ्यांना खूपच प्रेरणादायी अशी आहे.

Advertisement

या शेतकऱ्याने अक्षरशः खडकाळ जमिनीवर खजुराची लागवड करण्याचा नाविन्यपूर्ण प्रयोग केला आणि तो यशस्वी देखील केला. त्यांचीच प्रेरणादायी कथा आपण थोडक्यात बघणार आहोत.

खडकाळ जमीनवर फुलवला खजुराचा मळा
याबाबत सविस्तर वृत्त असे की, जालना जिल्ह्यातील घनसांगवी तालुक्यात असलेल्या तनवाडी या गावचे प्रयोगशील शेतकरी जगदशी शेडगे शेतीमध्ये कायमच नाविन्यपूर्ण प्रयोग करत असतात व त्यांच्याकडे एकूण 25 एकर शेती आहे. साधारणपणे गेल्या पाच वर्षांपूर्वी त्यांना खजूर शेतीची माहिती मिळाली व त्यासंबंधी त्यांनी सखोल माहिती गोळा करायला सुरुवात केली.

Advertisement

सगळी माहिती घेतल्यानंतर त्यांनी खजूर लागवड करायचे ठरवले व गुजरात येथील एका खजूर रोपांचा पुरवठा करणाऱ्या संस्थेशी संपर्क साधला व त्या संस्थेने इराणमधून त्यांना खजुराचे दोनशे रुपये उपलब्ध करून दिली.

Advertisement

त्यांच्या एकूण 25 एकर जमिनीपैकी दोन एकर जमीन ही निव्वळ खडकाळ जमीन होती व याच जमिनीची निवड त्यांनी खजूर लागवडीसाठी केली. या जमिनीवर त्यांनी चार फूट बाय चार फूट आकाराचे खड्डे खोदले व त्या खड्ड्यांमध्ये शेणखत मिश्रित काळी माती टाकून खजूर रोपांची लागवड केली.

लागवडीनंतर तिसऱ्या वर्षापासून त्यांना खजुराचे उत्पादन मिळायला सुरुवात झाली. परंतु पहिल्या वर्षी मात्र त्यांना खूपच कमी उत्पादन मिळाले. खूप कमी झाडे फुटली व जे झाडे फुटली त्यांना देखील खजुराचे घड खूपच कमी प्रमाणात लागले होते.

परंतु दुसऱ्या वर्षी मात्र त्यांनी तब्बल 14 टन खजुराचे उत्पादन घेतले व जवळपास त्यातून 28 लाख रुपयांची कमाई केली. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे याकरिता त्यांनी जास्त कुठल्याही प्रकारचा खर्च केलेला नाही. रोपांना त्यांना जास्त खर्च लागला. कारण ३८५० रुपये प्रतिरोप या दराने त्यांनी खजुराची रोपे विकत आणलेली होती.

त्यानंतर मात्र कुठल्याही प्रकारचा खर्च त्याकरिता आला नाही व विशेष म्हणजे खजूर पिकावर रोगांचा प्रादुर्भाव देखील होत नाही. फक्त जेव्हा झाड कोवळे असते तेव्हा कोंबामध्ये अळी पडणे किंवा खोड पोखरणारा भुंगा अशा प्रकारच्या किड्यांचा प्रादुर्भाव दिसून येतो. तेव्हा व्यवस्थित लक्ष ठेवून जर नियोजन केले व औषध टाकले तर त्याचेही नियंत्रण होते व त्यामुळे जास्त खर्च या पिकाला येत नाही.

25 एकर जमिनीला भारी पडली दोन एकर शेती
जगदशी शेडगे यांच्याकडे एकूण 25 एकर जमीन आहे व त्यापैकी दोन एकरवर त्यांनी खजूर शेती केलेली आहे व बाकीच्या शेतीमध्ये ऊस तसेच मोसंबी व इतर हंगामी स्वरूपाच्या पिकांची लागवड ते करतात. परंतु या इतर पिकांसाठी फवारणी पासून तर आंतरमशागतीची कामे इत्यादीसाठी खूप मोठ्या प्रमाणावर खर्च त्यांना करावा लागतो.

परंतु या पिकांच्या तुलनेत मात्र खजूर शेतीला पाण्याशिवाय कुठल्याही प्रकारचा खर्च लागत नाही व 25 एकरमध्ये जे उत्पन्न मिळते अगदी तितकेच उत्पन्न त्यांनी या दोन एकर खजूर शेतीतून कोणत्याही खर्चाशिवाय मिळवले आहे.

अशाप्रकारे केले आहे विक्री नियोजन
या खजुराचे विक्री व्यवस्थापन करताना त्यांनी किरकोळ विक्री करण्यावर मोठ्या प्रमाणावर भर दिला. किरकोळ विक्री करून त्यांना प्रतिकिलो दोनशे रुपये असा दर मिळाला व त्यासाठी त्यांनी रस्त्यावर आणि जालना शहरांमध्ये विक्रीचे स्टॉल ठेवले.

तसेच छत्रपती संभाजी नगर, पुणे आणि जालना येथील व्यापाऱ्यांनी देखील या खजुराची विक्री केली. परंतु घाऊक विक्रीपेक्षा किरकोळ विक्रीतून त्यांना चांगला पैसा मिळाल्याचे त्यांनी म्हटले.

Next Article