कृषी बातम्यासरकारी योजनाबाजारभावयशोगाथाहवामानस्पेशल स्टोरी
Advertisement

काय सांगता ! ठाणे ते जोगेश्वरी प्रवास फक्त 20 मिनिटात, कसा आहे 6 हजार 500 कोटी रुपयांचा प्रकल्प ?

08:59 PM Dec 31, 2024 IST | Krushi Marathi
Thane To Jogeshwari Travel

Thane To Jogeshwari Travel : मुंबई शहरात आणि उपनगरात गेल्या काही वर्षांमध्ये विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. शहरात आणि उपनगरात अजूनही अनेक रस्ते विकासाची कामे सुरू आहेत. या प्रकल्पांमुळे मात्र शहरातील वाहतूक कोंडी बऱ्यापैकी कमी झाली आहे. आता लवकरच पूर्व आणि पश्चिम उपनगरांदरम्यान प्रवास करणे सोयीचे होणार आहे.

Advertisement

कारण की पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा गोरेगाव मुलुंड लिंक रोड चे काम युद्ध पातळीवर सुरू असून या प्रकल्पाचे काम नियोजित वेळेत पूर्ण होऊ शकते. हा बीएमसी चा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पांतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानांतर्गत ४.७ किमी लांबीचा दुहेरी बोगदा बांधण्यात येणार आहे.

Advertisement

यामुळे ठाणे ते जोगेश्वरी दरम्यान चा प्रवास अवघ्या वीस मिनिटात पूर्ण करता येणार आहे. सध्या या प्रवासासाठी प्रवाशांना जवळपास 75 मिनिटांचा वेळ लागतोय. परंतु जेव्हा हा प्रकल्प सर्वसामान्यांसाठी सुरू होईल तेव्हा हा प्रवासाचा कालावधी 50 ते 55 मिनिटांनी कमी होण्याची शक्यता आहे.

यामुळे हा प्रकल्प पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील नागरिकांसाठी मोठा गेम चेंजर ठरण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून बऱ्यापैकी दिलासा मिळेल असा विश्वास तज्ञांनी व्यक्त केला आहे. यामुळे गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्प कधीपर्यंत पूर्ण होणार? याची मुंबईकरांना आतुरता लागली आहे.

Advertisement

आम्ही आपणास सांगू इच्छितो की या प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यातील दुहेरी बोगद्याचे भूमिपूजन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. तेव्हापासून या प्रकल्पाचे काम सुरू आहे. मात्र आता या प्रकल्पाला गती देण्यासाठी एक मोठा निर्णय झाला आहे.

Advertisement

या कामासाठी थर्ड पार्टी टेक्निकल ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यामुळे या प्रकल्पाच्या कामाला गती मिळेल असे म्हटले जात आहे. बीएमसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितल्याप्रमाणे या कामासाठी व्हीजेटीआयची नियुक्ती करण्यात आली आहे.

सध्या जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडने प्रवास करताना मुलुंड ठाणे येथे पोहोचण्यासाठी जवळपास सव्वा तास लागतो. मात्र जेव्हा या प्रकल्पाचे काम पूर्ण होईल तेव्हा हा प्रवास अवघ्या पंधरा ते वीस मिनिटात होऊ शकतो.

म्हणजेच भविष्यात गोरेगाव ते मुलुंड दरम्यान चा प्रवास वेगवान होणार आहे. त्यामुळे मुंबईच्या पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील उपनगरांमधील नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळू शकणार आहे. पण, या प्रकल्पाचा अपेक्षित खर्च वाढणार आहे.

सध्या या प्रकल्पासाठी सहा हजार तीनशे कोटी रुपयांचा खर्च गृहीत धरण्यात आला आहे मात्र हा खर्च 6500 कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकतो. एकंदरीत हा एक खर्चीक प्रकल्प आहे मात्र यामुळे उपनगरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

Tags :
Thane To Jogeshwari Travel
Next Article