For the best experience, open
https://m.krushimarathi.com
on your mobile browser.

Summer Groundnut Crop: उन्हाळी भुईमुगाच्या यशस्वी शेतीसाठी ‘या’ पद्धतीचा अवलंब करा, उत्पादन होईल दुप्पट.. कमी खर्च आणि लाखोत नफा

12:27 PM Feb 22, 2025 IST | Krushi Marathi
summer groundnut crop  उन्हाळी भुईमुगाच्या यशस्वी शेतीसाठी ‘या’ पद्धतीचा अवलंब करा  उत्पादन होईल दुप्पट   कमी खर्च आणि लाखोत नफा
groundnut crop
Advertisement

Groundnut Crop Management:- उन्हाळी भुईमुग शेतीत अधिक उत्पादन घेण्यासाठी योग्य नियोजन आणि सुधारित पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक आहे. भुईमूग हे महत्त्वाचे तेलबिया पीक असून, याच्या लागवडीमुळे जमिनीची सुपीकता सुधारते आणि जमिनीचा पोत टिकून राहतो.

Advertisement

खरीप हंगामातील भुईमूग प्रामुख्याने पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतो, त्यामुळे त्यावर कीड आणि रोगांचा अधिक प्रादुर्भाव होतो. मात्र उन्हाळी भुईमुगासाठी अनुकूल हवामान, उष्णता आणि भरपूर सूर्यप्रकाश मिळत असल्याने त्याचे उत्पादन अधिक चांगले होते. ओलिताची सोय असलेल्या शेतांमध्ये तसेच फळबागांमध्ये आंतरपीक म्हणून भुईमूग लागवड फायदेशीर ठरते.

Advertisement

उच्च उत्पादन देणाऱ्या वाणांची निवड

Advertisement

उत्पादनक्षमतेसाठी भुईमुगाच्या लागवडीसाठी उच्च उत्पादन देणाऱ्या आणि रोग-कीड प्रतिकारक वाणांची निवड करणे महत्त्वाचे आहे. प्रमाणित आणि योग्य प्रमाणात बियाणे वापरणे आवश्यक आहे. प्रति हेक्टरी योग्य रोपांची संख्या राखल्यास अधिक उत्पादन मिळू शकते. त्याचप्रमाणे, बीजप्रक्रिया, संतुलित खत व्यवस्थापन आणि जिवाणू संवर्धक तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांचा योग्य प्रमाणात वापर केल्यास उत्पादनात वाढ होते.

Advertisement

आंतरमशागत ठरेल गेमचेंजर

Advertisement

आंतरमशागतीच्या दृष्टीने, भुईमूग पेरणीनंतर ४५ दिवसांपर्यंत दोन वेळा खुरपणी करणे आवश्यक असते, ज्यामुळे पीक तणमुक्त राहते. याशिवाय, १० ते १२ दिवसांच्या अंतराने दोन वेळा कोळपणी करावी, ज्यात शेवटची कोळपणी थोडी खोलवर केल्यास पिकाला चांगली मातीची भर मिळते.

३५ ते ४० दिवसानंतर आऱ्या सुटू लागतात, त्या वेळी आंतरमशागतीचे काम थांबवावे आणि फक्त मोठी तणे हाताने उपटून टाकावीत. जर तणनाशकांचा वापर करायचा असेल, तर पेरणीनंतर दोन दिवसांच्या आत योग्य ओलीवर तणनाशकाची फवारणी करावी. तसेच, पेरणीनंतर २० दिवसांनी उगवलेल्या तणांवर दुसरी फवारणी करणे फायदेशीर ठरते.

पाणी व्यवस्थापनाचे महत्त्व

पाणी व्यवस्थापन हा भुईमुगाच्या उत्पादनासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. उन्हाळी भुईमुगासाठी साधारणतः ७० ते ८० सेंमी पाणी आवश्यक असते. जर प्लास्टिक आच्छादन तंत्राचा अवलंब केला, तर ४० ते ५० टक्के पाण्याची बचत करता येते. पेरणीनंतर साधारण ४ ते ५ दिवसांनी पहिले आंबवणीचे पाणी द्यावे आणि त्यानंतर जमिनीच्या मगदुरानुसार ८ ते १० दिवसांच्या अंतराने एकूण १० ते १२ पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.

विशेषतः आऱ्या घुसण्याच्या वेळी आणि शेंगा पोसण्याच्या कालावधीत पाण्याचा ताण पडू देऊ नये, कारण त्याचा उत्पादनावर मोठा परिणाम होतो. तुषार सिंचन ही पद्धत भुईमुगासाठी उपयुक्त ठरते, कारण यामुळे पाण्याची बचत होऊन पिकाभोवती आद्र्रता टिकून राहते आणि उत्पादन वाढीस मदत होते.

भुईमूग पिकाच्या विविध टप्प्यांमधील पाणी व्यवस्थापन

वाढीच्या विविध टप्प्यांमध्ये पाणी व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे असते. उगवणीच्या टप्प्यावर पेरणीनंतर त्वरित पाणी द्यावे. फुलोरा येण्याच्या अवस्थेत (३०-४० दिवसांनी), आऱ्या सुटण्याच्या टप्प्यावर (४०-४५ दिवसांनी) आणि शेंगा धरण्याच्या व दाणे भरण्याच्या अवस्थेत (६५-७० दिवसांनी) पाण्याच्या नियमित पाळ्या देणे आवश्यक आहे.

अशाप्रकारे योग्य वाणांची निवड, संतुलित खत व पाणी व्यवस्थापन तसेच तण व कीड नियंत्रणाचा योग्य वापर केल्यास उन्हाळी भुईमुगाचे अधिक उत्पादन घेता येईल. शेतकऱ्यांनी या सर्व बाबींचा विचार करून सुधारित पद्धतीने भुईमुगाची शेती केल्यास त्यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळू शकते.