निवडणुकीच्या रणधुमाळीत महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा ! आता....
Soybean Farming : सोयाबीन हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक आहे. याची लागवड राज्यातील मराठवाडा विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये होते. मात्र सध्या सोयाबीनला अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आले आहेत. यामुळे याचा विधानसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना फटका बसण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्रातील 60 पेक्षा जास्त विधानसभा मतदारसंघात सोयाबीनचा मुद्दा वरचढ ठरण्याची शक्यता आहे.
याच पार्श्वभूमीवर आता सरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी राज्य कृषी मूल्य आयोगाने नुकतीच एक मोठी घोषणा केली असून यामुळे ऐन निवडणुकीच्या काळात वातावरण फिरण्याची शक्यता आहे.
या घोषणामुळे राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्य कृषी मूल्य आयोगाने सोयाबीनमधील मॉइश्चर संदर्भातली अट शिथिल करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सोयाबीन विक्री करताना दिलासा मिळेल.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की आतापर्यंत सोयाबीन विक्रीसाठी 12% मॉईश्चरची अट घालून देण्यात आली होती. पण यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत होते. म्हणून ही अट शिथिल करण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा केला जात होता. दरम्यान आता हा पाठपुरावा यशस्वी झाला असून मॉईश्चरची अट 15% पर्यंत शिथिल करण्यात आली आहे.
राज्य कृषी मूल्य आयोगाने हा निर्णय घेतला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणून शेतकऱ्यांना याचा मोठा दिलासा मिळणार असल्याचे बोलले जात आहे. राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.
पटेल यांनी सांगितल्याप्रमाणे, यंदा सोयाबीनच्या काढणीच्या काळात पावसाचे सावट होते. सोयाबीन हार्वेस्टिंग पिरेडमध्ये यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि याचा फटका सोयाबीन पिकाला बसला. यंदा काढणीच्या वेळी पाऊस झाल्याने सोयाबीन मध्ये जास्त ओलावा (मॉईश्चर) होता. पण यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले.
सोयाबीन खरेदी केंद्रावर जास्त ओलाव्यामुळे शेतकऱ्यांचा सोयाबीन नाकारला जात होता. म्हणून केंद्र सरकारला विनंती करून खरेदी केंद्रावर मॉइश्चर संदर्भातली मर्यादा 12% वरून 15% पर्यंत वाढवून घेतली असल्याची माहिती पाशा पटेल यांनी यावेळी दिली आहे.
नाफेड ने याबाबतचा निर्णय घेतला असून काल तसे जाहीरही करण्यात आले आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात शेतकऱ्यांना त्यांचा सर्व सोयाबीन कोणत्याही अडचणीविना खरेदी केंद्रावर 4 हजार 892 रू प्रति क्विंटल दराने विकता येणार आहे.
निश्चितच शासनाच्या निर्णयाचा शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. मात्र शेतकऱ्यांकडून सोयाबीनला किमान सहा ते सात हजार रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे.