For the best experience, open
https://m.krushimarathi.com
on your mobile browser.

Sonalika Tractor: भारताच्या नंबर 1 ट्रॅक्टर ब्रँडकडून शेतकऱ्यांसाठी मोठी भेट! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सोनालिकाचा चिता ट्रॅक्टर लाँच

08:07 AM Feb 23, 2025 IST | Krushi Marathi
sonalika tractor  भारताच्या नंबर 1 ट्रॅक्टर ब्रँडकडून शेतकऱ्यांसाठी मोठी भेट  महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सोनालिकाचा चिता ट्रॅक्टर लाँच
sonalika chita tractor
Advertisement

Tractor News:- सोनालिका ट्रॅक्टर्सने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी त्यांच्या नवीन "चीता" मालिकेतील ट्रॅक्टर लाँच केले आहेत. हे ट्रॅक्टर अत्याधुनिक डिझाईन, प्रगत तंत्रज्ञान आणि शक्तिशाली इंजिनसह सुसज्ज असून शेतीतील विविध गरजा पूर्ण करण्यासाठी तयार करण्यात आले आहेत. विशेषतः डाळिंब, ऊस, द्राक्षे, फळबागा आणि सुपारी यांसारख्या पिकांसाठी हे ट्रॅक्टर उपयुक्त ठरणार आहेत. सोनालिकाने या नव्या उत्पादनांद्वारे शेतकऱ्यांचा खर्च कमी करण्याबरोबरच त्यांच्या कामगिरीत वाढ करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

Advertisement

या सिरीजमध्ये तीन ट्रॅक्टर केले लॉन्च

Advertisement

या मालिकेत तीन प्रमुख मॉडेल्स समाविष्ट आहेत – सोनालिका चीता डीआय ३२, सोनालिका चीता डीआय ३० ४डब्ल्यूडी आणि सोनालिका चीता एमएम १८. यामधील सोनालिका चीता डीआय ३२ हेवी-ड्युटी ट्रॅक्टर असून त्यात २,७८० सीसी क्षमतेचे ३-सिलेंडर इंजिन बसवले आहे, जे १३० एनएम टॉर्क निर्माण करते.

Advertisement

याची इंधन कार्यक्षमता या श्रेणीतील इतर ट्रॅक्टरच्या तुलनेत अधिक असल्याने आंतर-शेती आणि बागायत शेतीसाठी हे अत्यंत उपयुक्त ठरते. तसेच, यात १,३२५ किलो लिफ्ट क्षमता, ऑइल इमर्स्ड ब्रेक्स आणि सिंगल-पीस बोनेटसह ४डी कूलिंग सिस्टम देण्यात आली आहे. हा ट्रॅक्टर रोटाव्हेटर, कल्टिव्हेटर आणि आरएमबी प्लोसारखी अवजारे सहज हाताळू शकतो, त्यामुळे तो अधिक कार्यक्षम ठरतो.

Advertisement

सोनालिका चिता एमएम 18 चे वैशिष्ट्ये

Advertisement

त्याचप्रमाणे, सोनालिका चीता एमएम १८ हे लहान शेतांसाठी विशेषतः डिझाइन करण्यात आले आहे. यामध्ये ८६३.५ सीसी क्षमतेचे सिंगल-सिलेंडर इंजिन असून ते ४७ एनएम टॉर्क प्रदान करते. त्यात ८०० किलो लिफ्ट क्षमता, ट्रॉली टिपिंग पाईप, ड्युअल-स्पीड पीटीओ आणि ४डी एअर कूलिंग प्रणाली उपलब्ध आहे. हा ट्रॅक्टर ऊस व शेंगदाणा शेतीमध्ये आंतर मशागतीच्या कामांसाठी अतिशय उपयुक्त ठरतो.

कशी आहे सोनालिकाची ही ट्रॅक्टर सिरीज?

सोनालिका ट्रॅक्टर्सच्या विक्री व विपणन विभागाचे प्रमुख विवेक गोयल यांनी या नवीन ट्रॅक्टर मालिकेबाबत सांगितले की, "नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकऱ्यांचे जीवन सुकर करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. डाळिंब, ऊस आणि इतर फळपिके तसेच विविध अवजारे वापरणाऱ्या शेतकऱ्यांना नवीन चीता ट्रॅक्टरमुळे जास्तीत जास्त उत्पादनक्षमतेचा आणि कार्यक्षमतेचा लाभ मिळेल.

" महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना उत्कृष्ट सेवा पुरवण्यासाठी कंपनीने राज्यभरात १०० हून अधिक डीलरशिप कार्यान्वित केल्या आहेत. उच्च-कार्यक्षमतेच्या आणि नफ्यासाठी मदत करणाऱ्या ट्रॅक्टरच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला सक्षम बनवण्याची सोनालिकाची कटिबद्धता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.