कृषी बातम्यासरकारी योजनाबाजारभावयशोगाथाहवामानस्पेशल स्टोरी
Advertisement

सोलापूर ते मुंबई आणि सोलापूर ते गोवा दरम्यान 'या' तारखेला सुरू होणार नवीन विमानसेवा ! Solapur - तिरुपती विमानसेवेसाठी देखील प्रयत्न

12:31 PM Nov 17, 2024 IST | Krushi Marathi
Solapur News

Solapur News : पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर शहरातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी हाती आली आहे. सोलापुरातील नागरिकांसाठी लवकरच दोन शहरा दरम्यान नवीन विमान सेवा सुरू करण्यात येणार आहे. सोलापूर ते मुंबई आणि सोलापूर ते गोवा दरम्यान नवीन विमानसेवा सुरू होणार असून यामुळे मुंबई आणि गोव्याला जाणाऱ्या नागरिकांना याचा मोठा फायदा होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

Advertisement

आम्ही आपणास सांगू इच्छितो की येत्या 23 डिसेंबरला सोलापूर ते मुंबई आणि सोलापूर ते गोवा दरम्यान नवीन विमानसेवा सुरू होणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीचं या संदर्भात माहिती दिली आहे.

Advertisement

मोळ यांनी सांगितल्याप्रमाणे 23 डिसेंबरला सोलापूर ते मुंबई आणि सोलापूर ते गोवा दरम्यान विमान सेवा तर सुरू होणारच आहे शिवाय पुढील काळात 'उडान' योजनेच्या माध्यमातून सोलापूर ते तिरुपती अशी सुद्धा विमानसेवा आपण सुरू करणार आहोत.

यामुळे सोलापूर ते तिरुपती दरम्यान प्रवास करणाऱ्यांना या सेवेचा फायदा होणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की सोलापूर होऊन तिरुपती येथे दर्शनासाठी जाणाऱ्यांची संख्या फारच मोठी आहे.

Advertisement

तिरुपती येथील बालाजी मंदिराच्या दर्शनासाठी सोलापूर शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात आणि याच पार्श्वभूमीवर आता सोलापूर ते तिरुपती दरम्यान नवीन विमान सेवा चालवण्याचा प्लॅन मोदी सरकारने तयार केला आहे.

Advertisement

मोहोळ यांनीच ही माहिती दिली असल्याने आगामी काळात ही विमानसेवा सुरू होईल असा विश्वास येथील नागरिकांकडून देखील व्यक्त करण्यात आला आहे. बोरामणी विमानतळासाठीही आम्ही विचार सुरू केलेला आहे.

मात्र, माळढोक पक्षामुळे तो विषय थांबला आहे, त्यातून मार्ग काढला जाईल, असेही त्यांनी यावेळी म्हटले. येत्या 23 डिसेंबरला सोलापूर ते मुंबई आणि सोलापूर ते गोवा ही विमानसेवा सुरू होत आहे, त्यासाठी फ्लाय-91 विमान कंपनी पुढाकार घेत आहे.

सोलापुरातून विमान सेवा सुरु करण्यासाठी vgf च्या माध्यमातून राज्य सरकार आपल्याला मदत करत आहे, असेही मोहोळ यांनी नमूद केले आहे.

दरम्यान, आज आपण सोलापूर ते मुंबई आणि सोलापूर ते गोवा दरम्यान सुरू होणाऱ्या नव्या विमानसेवेचे वेळापत्रक कसे राहणार यासंदर्भात अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

मुंबई सोलापूर विमानसेवेचे वेळापत्रक कसे राहणार?

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहुन 11:55 ला निघेल अन सोलापुरात 01:45 ला पोहचेल. तसेच सोलापुरातून 09:40 ला निघेल अन मुंबईला 11:20 ला पोहचेल.

गोवा सोलापूर विमानसेवेचे वेळापत्रक कसे राहणार?

गोव्यातून सकाळी 08 वाजता निघेल अन सोलापुरात 9:10 ला पोहचेल. तसेच सोलापुरातून 02:15 ला निघेल अन गोव्यात 03:30 ला पोहचेल.

Tags :
goaMumbaiNewFlightSolapursolapur newsSolapur to Goa FlightSolapur to Mumbai Flight
Next Article