50-60 हजार रुपये गुंतवून सुरु करा ‘हा’ बिजनेस, वर्षाकाठी 3 लाखांपर्यंतचा नफा मिळणार !
Small Business Idea : कोरोना काळापासून नोकरींऐवजी व्यवसायाला अधिक प्राधान्य दाखवले जात आहे. अलीकडील काही वर्षांमध्ये नवयुवक तरुणांनी व्यवसायात चांगली प्रगती केली असून जर तुम्हालाही भविष्यात स्वतःचा बिजनेस सुरू करायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी कामाची राहणार आहे.
कमी पैशात सुरु करता येईल असा व्यवसाय सुरु करायचा असेल तर तुम्ही टी-शर्ट प्रिंटिंगचा व्यवसाय सुरु करू शकता. हा एक असा बिजनेस आहे जो की मानवाच्या मूलभूत गरजांशी रिलेटेड आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा असून वस्त्र व्यवसाय नेहमीच फायदेशीर ठरतो.
हा व्यवसाय कधीच मंदीत येऊ शकत नाही. हा बिजनेस कमी गुंतवणुकीत सुरू केला जाऊ शकतो आणि तुमचा बिजनेस जर चांगला चालला तर तुम्हाला या व्यवसायातुन चांगला नफा मिळतो. दरम्यान आता आपण या व्यवसायाच्या काही बारीक-सारीक गोष्टी थोडक्यात समजून घेणार आहोत.
कमी जागेत सुरु करता येतो हा बिजनेस
टी-शर्ट प्रिंटिंग व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला मोठ्या जागेची गरज नसते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याची सुरुवात तुम्ही घरूनही करू शकता. अन तुमच्या प्रोडक्टची विक्री तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करू शकता. यासाठी किमान 100-150 चौरस फूट एवढी लहान खोली आवश्यक असते. सोबतच तुम्ही मार्केट प्लेस मध्ये गाळा घेऊन हा व्यवसाय सुरू करू शकता.
हा बिजनेस सुरू करण्यासाठी तुम्हाला प्रिंटिंग मशीन, प्लेन टी-शर्ट आणि इतर काही गोष्टी लागतील. दरम्यान जर तुम्हाला हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू करायचा असेल तर 200 ते 300 चौरस फूट एवढी जागा लागणार आहे. यासोबतच तुम्हाला पॅकिंग करण्यासाठी आणि शिपिंगसाठी देखील जागा लागणार आहे.
गुंतवणूक किती करावी लागणार?
हा बिजनेस सुरू करण्यासाठी आपल्याला काही विशेष उपकरणांची आवश्यकता लागणार आहे. यासाठी हीट प्रिंटिंग मशीन लागेल. जे की तुम्हाला ₹ 15,000 ते ₹ 40,000 रुपयात मिळेल. तुम्ही मोठ्या प्रमाणात टी-शर्ट खरेदी केल्यास तुम्हाला प्रत्येक टी-शर्टवर सुमारे ₹100-₹200 खर्च करावे लागतील.
या व्यतिरिक्त, तुम्हाला एक डिझाइन सॉफ्टवेअर देखील घ्यावे लागणार आहे, ज्यासाठी तुम्हाला सुमारे ₹ 2,000-₹ 5,000 खर्च करावे लागतील. छपाईतील आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शाई. तुम्हाला शाईसाठी ₹3,000-₹10,000 खर्च करावे लागतील. शाई दर्जेदार असल्याची खात्री करा, अन्यथा टी-शर्ट चांगला प्रिंट होणार नाही आणि यामुळे तुमचा ग्राहक वर्ग दूर होऊ शकतो.
आपल्याला ट्रान्सफर प्रिंटिंग पेपर देखील आवश्यक असेल. यासाठी तुम्हाला 1,000 - 5,000 रुपये खर्च करावे लागतील. तुम्हाला पॅकेजिंग मटेरियलवर ₹2,000-₹5,000 खर्च करावे लागतील. अशाप्रकारे, सुरुवातीला हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला 50-70 हजार रुपये गुंतवावे लागतील.
नफा किती मिळणार?
एक टी-शर्ट बनवण्यासाठी तुम्हाला साधारणता दीडशे ते दोनशे रुपयांचा खर्च येऊ शकतो. जर तुम्ही हाच टी-शर्ट मार्केटमध्ये तीनशे ते साडेचारशे रुपयांपर्यंत सेल करू शकला तर तुम्हाला दीडशे ते अडीचशे रुपयांपर्यंतचा नफा राहू शकतो. अशा तऱ्हेने जर तुम्ही एक हजार टी शर्ट विकलेत तर तुम्हाला तीन लाख रुपयांपर्यंतचा नफा मिळू शकतो.