For the best experience, open
https://m.krushimarathi.com
on your mobile browser.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा महामार्गावरून शेतकऱ्यांचा आक्रोश ! भूसंपादनाविरोधात मोठा मोर्चा

01:53 PM Feb 01, 2025 IST | krushimarathioffice
shaktipeeth highway   नागपूर गोवा महामार्गावरून शेतकऱ्यांचा आक्रोश    भूसंपादनाविरोधात मोठा मोर्चा
Advertisement

Shaktipeeth Highway Latest News : परभणी जिल्ह्यातून प्रस्तावित नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा किंवा जिल्ह्यातून त्याचा मार्ग वगळावा, अशी मागणी करत मराठवाडा शक्तिपीठ महामार्गविरोधी कृती समितीने मोठा मोर्चा काढला.

Advertisement

शुक्रवारी (३१ जाने.) कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे या आंदोलनाची दिशा होती. भूसंपादन प्रक्रियेवर त्वरित स्थगिती द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.

Advertisement

या महामार्गाची परभणी जिल्ह्यातील लांबी सुमारे ७१ किलोमीटर असून, पूर्णा, परभणी आणि सोनपेठ या तालुक्यातील ३१ गावांतील जवळपास ७३३ हेक्टर सुपीक जमिनीचे अधिग्रहण प्रस्तावित आहे.

Advertisement

हा महामार्ग बहुतांश गावांमध्ये जायकवाडी, सिद्धेश्वर आणि माजलगाव प्रकल्पांच्या कालव्यांच्या लाभक्षेत्रातून जात असल्याने शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

Advertisement

शेतकऱ्यांनी जोरदार विरोध करत महामार्गाचे नियोजन बदलण्याची मागणी केली आहे. या भूसंपादनामुळे हजारो शेतकऱ्यांना त्यांच्या उपजीविकेचा पर्याय शोधावा लागणार आहे, असे आंदोलकांचे म्हणणे आहे.

Advertisement

त्यामुळे महामार्गाचे नियोजन फेरविचार करून शेतकऱ्यांना अन्याय होणार नाही, याची सरकारने काळजी घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.

या आंदोलनात गोविंद घाटोळ, केशव हजारे, गजानन देशमुख, शेख रहीम, नामदेव आडे, महादेव चांगभले आणि सुनील बेले यांच्यासह अनेक गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सरकारने त्वरित निर्णय न घेतल्यास लढा अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

Tags :