Satbara Utara Changes : 50 वर्षानंतर सातबारा उताऱ्यात मोठे बदल
Satbara Utara Changes : महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र जमीन महसूल कायदा १९६६ अंतर्गत सातबारा उताऱ्यात तब्बल ५० वर्षांनंतर मोठे बदल करण्यात आले आहेत. महसूल विभागाने सातबारा उताऱ्यात अधिक स्पष्टता आणि अचूकता निर्माण करण्यासाठी हे बदल लागू केले आहेत. या बदलांमुळे शेतकरी, जमीन मालक आणि गुंतवणूकदारांना संपूर्ण जमिनीची माहिती अधिक स्पष्टपणे उपलब्ध होणार आहे.
सातबारा उताऱ्यातील ११ मोठे बदल:
✅ गाव नमुना 7 मध्ये गावाच्या नावासोबत कोड क्रमांक दिसणार.
✅ लागवड योग्य आणि लागवड नसलेले क्षेत्र वेगळे दर्शवले जाणार.
✅ शेतीसाठी हेक्टर-आर-चौरस मीटर, तर बिनशेतीसाठी आर-चौरस मीटर ही नवीन मापन पद्धत.
✅ 'इतर हक्क' रकान्यातील खाते क्रमांक आता खातेदाराच्या नावासमोर दिसणार.
✅ मृत व्यक्ती, कर्जबोजे आणि ई-कराराच्या नोंदींवर कंसाऐवजी आडवी रेषा मारली जाणार.
✅ फेरफार प्रक्रिया पूर्ण न झालेल्या जमिनींसाठी 'प्रलंबित फेरफार'साठी स्वतंत्र रकाना असणार.
✅ सर्व जुन्या फेरफार क्रमांकांसाठी स्वतंत्र रकाना तयार केला जाणार.
✅ दोन खातेदारांच्या नावामध्ये ठळक रेषा, त्यामुळे नावे स्पष्ट वाचता येतील.
✅ गट क्रमांकासोबत शेवटचा फेरफार क्रमांक आणि तारीख 'इतर हक्क' रकान्यात शेवटी दिसणार.
✅ बिनशेती क्षेत्रासाठी 'आर-चौरस मीटर' हेच एकक; जुडी व विशेष आकारणी रकाने हटवण्यात आले.
✅ बिनशेतीच्या सातबारा उताऱ्याच्या शेवटी आता क्षेत्र अकृषक क्षेत्रामध्ये रूपांतरित झाल्याची नोंद दिसणार.
नवीन सातबारा उताऱ्याचे फायदे:
🔹 जमिनीची माहिती अधिक स्पष्ट आणि अचूक मिळेल.
🔹 जमिनीच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता वाढेल.
🔹 शेतकऱ्यांसाठी सातबारा समजून घेणे अधिक सोपे होणार.
🔹 कर्ज आणि मालकी हक्कासंबंधी माहिती सरळ स्वरूपात उपलब्ध होईल.
महसूल विभागाने हे बदल ५० वर्षांनंतर प्रथमच लागू केले आहेत, त्यामुळे सर्व नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी याबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे.