Safe Bank In India: भारतातील ‘या’ 3 बँका सर्वात सुरक्षित… तुमचे पैसे कधीच बुडणार नाहीत, आरबीआयची हमी
Safe Bank In India:- भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) अलीकडेच देशातील सर्वात सुरक्षित बँकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत डोमेस्टिकली सिस्टेमिकली इम्पॉर्टंट बँक्स (D-SIBS) म्हणजेच देशाच्या आर्थिक व्यवस्थेसाठी महत्त्वाच्या असलेल्या बँकांचा समावेश आहे. या बँकांमध्ये ग्राहकांचे पैसे सर्वाधिक सुरक्षित मानले जातात. यादीत असलेल्या बँकांवर बुडण्याचा धोका अत्यंत कमी असतो आणि कोणत्याही परिस्थितीत या बँका संकटात आल्यास भारत सरकार त्यांना वाचवण्यासाठी पुढाकार घेते. त्यामुळे या बँकांमध्ये पैसे ठेवणे पूर्णपणे सुरक्षित मानले जाते.
आरबीआयने जाहीर केला अहवाल
आरबीआयने जाहीर केलेल्या ताज्या अहवालानुसार, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), एचडीएफसी बँक (HDFC Bank) आणि आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) या तीन बँकांना देशातील सर्वात सुरक्षित बँका म्हणून मान्यता दिली आहे. ग्राहकांनी या बँकांमध्ये केलेली गुंतवणूक कोणत्याही आर्थिक संकटात सुरक्षित राहते. या बँकांना टू बिग टू फेल (Too Big to Fail) म्हणूनही ओळखले जाते, कारण त्यांचा बुडण्याचा परिणाम संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो. त्यामुळे या बँकांवर विशेष देखरेख ठेवली जाते आणि त्यांना अतिरिक्त भांडवल राखण्याचा नियम लागू केला जातो.
डी-एसआयबी बँकांवर एक महत्त्वाची जबाबदारी म्हणजे कॉमन इक्विटी टियर-१ (CET1) भांडवल राखणे. हे भांडवल बँकेच्या आर्थिक स्थैर्यासाठी आणि जोखीम व्यवस्थापनासाठी वापरले जाते. या यादीतील प्रत्येक बँकेला त्यांच्या बकेटनुसार ठरावीक प्रमाणात अतिरिक्त CET1 राखावे लागते. या वर्षीच्या अहवालानुसार, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ला बकेट-४ मध्ये ठेवण्यात आले आहे आणि तिला ०.८०% अतिरिक्त CET1 भांडवल राखावे लागणार आहे. एचडीएफसी बँक बकेट-२ मध्ये असून तिला ०.४०% अतिरिक्त CET1 राखावे लागेल, तर आयसीआयसीआय बँक बकेट-१ मध्ये असून तिला ०.२०% अतिरिक्त CET1 राखण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हे नवीन नियम १ एप्रिल २०२५ पासून लागू होतील.
डी-एसआयबी संकल्पना म्हणजे काय?
डी-एसआयबी संकल्पना रिझर्व्ह बँकेने २०१४ मध्ये प्रथमच लागू केली होती. त्यानंतर २०१५ मध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, २०१६ मध्ये आयसीआयसीआय बँक आणि २०१७ मध्ये एचडीएफसी बँक या यादीत समाविष्ट करण्यात आल्या. या बँकांवर नेहमीच अतिरिक्त बफर भांडवल राखण्याची जबाबदारी असते, जेणेकरून कोणत्याही संभाव्य आर्थिक संकटाला तोंड देता येईल. या बँकांमध्ये गुंतवणूक केल्यास ग्राहकांचे पैसे पूर्णपणे सुरक्षित राहतात आणि कोणत्याही परिस्थितीत त्यांचे नुकसान होण्याचा धोका राहत नाही.
म्हणजे, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या या यादीमुळे स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक या तीन बँकांमध्ये ग्राहकांची गुंतवणूक सर्वात सुरक्षित मानली जाते. या बँकांना भारत सरकारचा पाठिंबा असल्याने, ग्राहकांना आपले पैसे सुरक्षिततेबद्दल पूर्ण विश्वास ठेवता येतो.