आता नाही शेतजमीन किंवा प्लॉट मोजण्याची झंझट! तुमच्या मोबाईलचा वापर करा आणि पटकन जमीन किंवा प्लॉट मोजा
Land Measurement:- बऱ्याचदा जमीन किंवा प्लॉटच्या हद्दीसंबंधी वाद उद्भवतात व अशावेळी जमिनीची किंवा प्लॉटची मोजणी करण्याशिवाय पर्याय राहत नाही. जमीन मोजण्यासाठी मग सरकारी मोजणी किंवा मोजणीच्या ज्या काही परंपरागत पद्धती आहेत त्यांचा वापर केला जातो. या सगळ्या गोष्टींना पैसा तर खर्च करावा लागतो,परंतु वेळ देखील खूप मोठ्या प्रमाणावर जातो.
परंतु म्हणतात ना की,आता या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये कुठलीही गोष्ट एका क्लिकवर करता येणे शक्य आहे व तसेच तुम्हाला जमीन किंवा घराचा भूखंड मोजण्यासाठी जास्त काही करण्याची गरज नसून तुम्ही तुमच्या हातातील मोबाईलच्या सहाय्याने प्लॉट किंवा जमिनीचे अचूक मोजमाप करू शकतात.
याकरिता फक्त तुमच्या मोबाईल मध्ये एक ॲप्लिकेशन डाऊनलोड करावे लागते व त्या माध्यमातून तुम्ही प्लॉटची किंवा जमिनीची मोजणी अगदी सहजपणे करू शकतात.
मोबाईलचा वापर करून अशा पद्धतीने जमीन किंवा प्लॉटची मोजणी करा
आज जर आपण बघितले तर प्रत्येकाच्या हातामध्ये आपल्याला स्मार्टफोन असल्याचे दिसून येते. याच स्मार्टफोनचा वापर करून तुम्ही जमीन मोजू शकतात. याकरिता सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमच्या फोनमध्ये जीपीएस(GPS) फिल्ड्स एरिया मेजर किंवा जीपीएस एरिया कॅल्क्युलेटर एप्लीकेशन डाउनलोड करावे लागेल.
एप्लीकेशन गुगलमध्ये डाऊनलोड केल्यानंतर ते ओपन करावे आणि ओपन केल्यावर काही वेळात एक नवीन पेज या ठिकाणी उघडते व त्या ठिकाणी तुम्हाला सर्च असा ऑप्शन दिसतो. या सर्च ऑप्शन वर तुम्हाला क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला जे ठिकाण मोजायचे आहे ते येथे शोधावे व तुम्हाला चित्राप्रमाणे बटन क्रमांक एक वर क्लिक करावे लागेल.
एक या बटणावर क्लिक करताच तुमच्या मोबाईल स्क्रीनवर तीन पर्याय तुम्हाला दिसतील. त्यातील दुसऱ्या क्रमांकाच्या पर्यायावर क्लिक करावे व त्यानंतर तुम्हाला तुमच्या जमिनीचे फोटो त्या ठिकाणी दिसतील. त्यानंतर तुम्हाला तुमच्या फोनमध्ये कंपास अँप डाऊनलोड करावे लागेल. त्यानंतर स्मार्टफोन प्लॉटच्या नकाशावर ठेवावा लागेल.
यामध्ये समजा तुमचा प्लॉट जर 20 बाय 40 चौरस फूट आहे तर तो तुम्हाला मोबाईल मध्ये दोनशे पाच अंशाच्या आसपास दाखवेल. विशेष म्हणजे तुम्हाला तुमचा मोबाईल शून्य अंशापर्यंत पोहोचेपर्यंत फिरवावा लागेल व ज्या ठिकाणी शून्य अंश असेल तिथे तुमच्या मोबाईलची योग्य दिशा मानली जाईल आणि तुम्हाला तुमच्या जमिनीचे पूर्ण माप कळेल.