ठाणे ते बोरिवली प्रवास होणार सुसाट! महत्त्वाच्या ‘या’ बोगदा प्रकल्पाच्या भूसंपादनाला येणार वेग; महत्त्वाचे अडथळे दूर
Thane-Borivali Tunnel:- कुठलाही प्रकल्प पूर्ण होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे असते ते म्हणजे त्या प्रकल्पासाठी लागणाऱ्या आवश्यक जमिनीचे संपादन म्हणजेच भूसंपादन होय. परंतु भूसंपादनाच्या बाबतीत अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात व त्यामुळे प्रकल्प रखडले जातात असे चित्र आपल्याला महाराष्ट्रात बऱ्याच प्रकल्पांच्या बाबतीत पाहायला मिळाले आहे व सद्यस्थितीत जर याचे उदाहरण यायचे असेल तर शक्तिपीठ महामार्गचे घेता येईल.
अगदी याच पद्धतीचा भूसंपादनाचा अडथळा हा ठाणे आणि बोरिवली दुहेरी बोगदा उभारण्यामध्ये येत होता. कारण बोरिवलीच्या बाजूला असलेली जवळपास 3652 चौरस मीटर जागा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे होती व या जागेसंबंधी काही समस्या होत्या व त्यामुळे भूसंपादनात अडथळे येत होते.
परंतु आता हा अडथळा दूर झाला असून लवकरात लवकर ठाणे ते बोरिवली दुहेरी बोगद्याच्या कामाचा मार्ग मोकळा होऊन ठाणे ते बोरिवली हा प्रवास फक्त पंधरा मिनिटात पूर्ण करता येणे आता शक्य होणार आहे.
ठाणे ते बोरिवली बोगद्याच्या कामाला येणार वेग
ठाणे ते बोरिवली दुहेरी बोगदा उभारण्यामध्ये बोरिवलीच्या बाजूकडील उर्वरित 3658 चौरस मीटर जागा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे हस्तांतरित केल्यामुळे आता ठाणे ते बोरिवली दुहेरी बोगद्याचा मार्ग मोकळा झाला आहे व हा बोगदा ठाणे व बोरिवलीकरांसाठी खूप महत्त्वाचा असून या बोगद्यामुळे हे अंतर अवघ्या पंधरा मिनिटात आता पूर्ण करता येणार आहे.
पश्चिम उपनगरांना थेट ठाण्याशी जोडता यावे त्याकरिता हा बोगदा अतिशय महत्त्वाचा आहे. परंतु याकरिता भूसंपादनाचा अडथळा येत होता. प्रकल्पासाठी आवश्यक असलेली बोरिवली बाजूकडील 3652 चौरस मीटर जागा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे होती.
परंतु आता ही जागा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आली आहे व त्यामुळे आता भूसंपादनातील अडथळा दूर होऊन हे काम लवकरच सुरू होणार आहे.
कसे आहे या बोगद्याच्या कामाचे स्वरूप?
ठाणे ते बोरिवली दरम्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून 11.85 किलोमीटर लांबीच्या या मार्गाची उभारणी केली जात आहे व यामध्ये तब्बल 10.25 किमी लांबीच्या बोगद्याचा समावेश असून या प्रकल्पाकरिता सुमारे अठरा हजार आठशे बत्तीस कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.
एमएमआरडीएच्या माध्यमातून संपूर्ण या कामाचे नियोजन असून या प्रकल्पाचे काम मेघा इंजीनियरिंग कंपनीला जून 2023 मध्ये देण्यात आले आहे. आतापर्यंत झालेल्या या कामाची प्रगती जर बघितली तर ठाण्याकडून या प्रकल्पाचे बरेच काम सुरू झाले आहे.इतकेच नाही तर बोगदयात भुयारीकरणासाठी टीबीएम मशीन देखील आता उतरवण्याकरिता ठेकेदाराने शाफ्ट उभारण्याचे काम सुरू केले आहे.
परंतु बोरिवली कडून मात्र भुयारी करणापूर्वी जी काही प्राथमिक कामे करावी लागतात ती अद्याप पर्यंत सुरू झालेले नाहीत व याच कामांमध्ये भूसंपादनाचा खरा अडथळा येत होता.
परंतु आता ही जमीन हस्तांतरित झाल्यामुळे भूसंपादनातील अडथळा दूर होऊन बोरवली बाजूकडील कामे देखील आता ताबडतोब सुरू होतील अशी शक्यता आहे.