पुण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या ‘या’ महामार्गाचे भूसंपादन लवकरच होणार सुरू! समोर आली महत्त्वाची अपडेट
Expressway Update:- वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रामध्ये अनेक महामार्गांची कामे प्रस्तावित आहेत व या कामांना येणाऱ्या कालावधीमध्ये गती देऊन ही कामे पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टिकोनातून बरेचसे प्रयत्न सरकारच्या माध्यमातून करण्यात येत आहेत व जेव्हा हे प्रकल्प प्रवाशांसाठी वाहतुकीकरिता खूले होतील तेव्हा नक्कीच वाहतूक कोंडीची समस्या कमी होऊन जलद प्रवास कुठल्याही अडथळा विना करता येणे शक्य होईल.
अशा प्रस्तावित प्रकल्पांपैकी जर आपण तळेगाव- चाकण- शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 डी हा एक महत्त्वाचा प्रस्तावित पुणे शहराकरता बाह्य वळण मार्ग असणार असून मुंबई ते पुणे राष्ट्रीय महामार्ग NH-48 आणि प्रस्तावित असलेला पुणे ते संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग - 753 ला हा 53 किलोमीटरचा बाह्यवळण मार्ग जोडला जाणार आहे
व तो या रस्त्यावर होणारी अनेक ठिकाणची वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी फायद्याचा ठरणार आहे. या दुपदरी मार्गाचे आता चार पदरी उन्नत मार्गात बांधकाम करण्यात येणार आहे व अनेक ठिकाणी उड्डाणपूल देखील उभारण्याचे नियोजन केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे.
लवकरच सुरू होणार भूसंपादन प्रक्रिया आणि निविदा कार्यवाही
प्रस्तावित असलेला तळेगाव-चाकण-शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 डी चा कामाचा विस्तृत प्रकल्प अहवाल व त्यासोबत टिप्पणीचा प्रारूप मसुदा महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर केला असल्याची माहिती एमएसआयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी दिली आहे.
नुकतेच मावळचे आमदार सुनील शेळके तसेच खेडचे आमदार बाबाजी काळे व तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्ग कृती समितीचे पदाधिकारी यांनी बुधवारी म्हणजेच 22 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्यासोबत या कामाच्या सद्यस्थितीबाबत आढावा बैठक घेऊन यात याविषयी सविस्तर चर्चा केली.
या बैठकीमध्ये एमएसआयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी म्हटले की, या महामार्गाच्या प्रस्तावित कामासाठी आर्थिकदृष्ट्या समस्या निर्माण होऊ नयेत याकरिता महाराष्ट्र शासनाने वस्तू व सेवा कर तसेच मुद्रांक शुल्क,
गौण खनिज वापराबाबत सवलत मिळावी या संदर्भात एमएसआयडीसीकडून एक जानेवारीला मसुदा कॅबिनेटच्या मंजुरीसाठी पाठवला आहे व महाराष्ट्र शासनाची याला मंजूरी मिळाल्यानंतर ताबडतोब भूसंपादन आणि निविदा कार्यवाही सुरू करण्यात येईल असे देखील त्यांनी म्हटले.
सादर करण्यात आलेल्या मसुद्यात हे आहेत प्रमुख मुद्दे
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांनी मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी जो काही मसुदा सादर केलेला आहे त्यामध्ये अनेक गोष्टींचा उल्लेख करण्यात आलेला आहे.
या मसुद्यानुसार बघितले तर मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग 48 आणि प्रस्तावित असलेला पुणे ते संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग 753 ला जोडणारा हा 53 किलोमीटरचा तळेगाव-चाकण-शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 डी हा पुणे शहराकरिता बाह्य वळण मार्ग म्हणून फायद्याचा ठरणार आहे.
या रस्त्यावर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची मोठी समस्या होते व ही समस्या मिटावी याकरिता सदर दुपदरी मार्गाचे चार पदरी उन्नत मार्गात बांधकाम करण्यात येणार आहे व त्यासाठी आवश्यक उड्डाणपूल देखील उभारले जाणार आहेत.
या सगळ्या कामांसाठी 6499.22 कोटींचा निधी पथकर गुंतवणुकीच्या द्वारे ईपीसी तत्वावर विकसित करण्याबाबत किंवा आवश्यकतेनुसार कर्ज उभारून अथवा बीओटी तत्त्वावर आवश्यक निविदा कार्यवाही उद्योजक म्हणून एमएसआयडीसी मार्फत करण्यात यावी असे देखील यामध्ये नमूद करण्यात आले आहे.
तसेच आर्थिक दृष्ट्या कुठल्याही प्रकारची समस्या येऊ नये याकरिता महाराष्ट्र शासनाने वस्तू व सेवा कर, मुद्रांक शुल्क तसेच गौण खनिज वापराबाबत सवलत द्यावी आणि सदर कामासाठी 41 हेक्टर भूसंपादनासाठी दहा कोटी प्रती हेक्टर असा एकूण 410 कोटींचा निधी उपलब्ध करून द्यावा असे देखील या मसुद्यात नमूद करण्यात आले आहे.
केंद्रीय परिवहन मंत्रालयाचे जे काही पथकर धोरण आहे.त्यानुसार एमएसआयडीसी मार्फत पथकर लावून या रस्त्याची सुधारणा करण्यास मान्यता द्यावी असं देखील यामध्ये नमूद करण्यात आले आहे.सदर मार्ग हरित मार्ग म्हणून विकसित करून त्या माध्यमातून कार्बन क्रेडिट प्राप्त करून आर्थिक सुधारणा सुलभता एमएसआयडीसीने तपासावी.
तसेच या रस्त्याचे बांधकाम तात्काळ सुरू होण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने वेळोवेळी आवश्यक ती पावले उचलावीत अशा अनेक बाबी या मसुद्यामध्ये असून हा मसुदा आता मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.