पुणेकरांचा पुन्हा अपेक्षाभंग! महत्त्वाच्या ‘या’ मेट्रो मार्गाचे काम आणखी लांबणीवर; कधी धावणार या मार्गावर मेट्रो?
Pune Metro Project:- पुणे शहरामध्ये वाहतूक कोंडीची समस्या दूर होण्याच्या करिता अनेक प्रकल्पांची कामे सुरू आहेत व त्यामध्ये प्रस्तावित असलेल्या मेट्रो मार्गांची कामे खूप महत्त्वाचे आहेत. कारण जेव्हा हे सगळे मेट्रो मार्गांचे कामे पूर्णत्वास येतील व या मार्गांवर मेट्रो धावायला लागेल तेव्हा पुणेकरांना वाहतूक कोंडीपासून दिलासा तर मिळेलच. परंतु वेगवान प्रवास करता येणे देखील शक्य होणार आहे. आपल्याला माहित आहे की,सध्या पुणे शहरामध्ये काही मार्गांवर मेट्रो धावत आहे व काही मार्गांचे काम सुरू आहे.
या सगळ्या मेट्रो मार्गांमध्ये हिंजवडी ते शिवाजीनगर हा एक महत्त्वाचा मेट्रो मार्ग आहे. हा मेट्रो मार्ग लवकरात लवकर सुरू व्हावा अशी प्रतीक्षा पुणेकरांना आहे. परंतु पुणेकरांना हा मार्ग सुरू होण्यासाठी आणखी काही महिने वाट पहावी लागणार आहे अशा स्वरूपाची माहिती सध्या समोर आलेली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बघितले तर हिंजवडी ते शिवाजीनगर या महत्त्वाच्या मेट्रो मार्गावर मेट्रो धावायला आणखीन सहा महिन्याचा कालावधी लागणार असून मार्च 2025 पर्यंत या मार्गावर मेट्रो धावण्याचे जे काही उद्दिष्ट होते ते ठेकेदाराला पूर्ण करता आलेले नाही त्याऐवजी हे काम ऑक्टोबर महिन्यापर्यंत पूर्ण होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाला लागणार उशीर
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बघितले तर पुणेकरांसाठी महत्त्वाचा असलेला हिंजवडी ते शिवाजीनगर हा मेट्रोमार्ग सुरू व्हायला आणखी सहा महिन्याचा कालावधी लागणार आहे व यामागील प्रमुख कारण म्हणजे मार्च 2025 पर्यंत हा मेट्रोमार्ग पूर्ण करण्याची डेडलाईन देण्यात आलेली होती. परंतु ठेकेदाराला हे काम या कालावधीत पूर्ण करता आलेले नाही व आता हे काम पूर्ण व्हायला ऑक्टोबर महिना उजाडेल अशी शक्यता आहे.
कारण या 23 किलोमीटर मेट्रो मार्गावर काही स्थानकांचे काम बाकी असल्यामुळे या कामाला मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अर्थात पीपीपी तत्वावर या प्रकल्पाचे काम सध्या सुरू असून बऱ्याच महिन्यापासून हे काम रखडलेले होते व जुलै नंतर या कामाला गती मिळाली होती. परंतु दिलेली डेडलाईन पूर्ण करण्यामध्ये ठेकेदार अपयशी ठरल्याचे चित्र आहे.
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्ग व त्याचे स्वरूप
पुण्यामध्ये जे काही मेट्रो मार्ग आहेत त्यामध्ये तिसऱ्या क्रमांकाचा महत्त्वाचा मेट्रो मार्ग म्हणून शिवाजीनगर ते हिंजवडी हा मेट्रो मार्ग ओळखला जातो. हा मेट्रो मार्ग 18 ते 20 मीटर उभ्या केलेल्या खांबांवर असून पुणे ते बेंगलोर महामार्ग
आणि मुळा नदीवर तो उभारण्यात आला आहे व 8313 कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प आहे. साधारणपणे नोव्हेंबर 2021 मध्ये या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली व 2025 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे ठरवण्यात आलेले होते.
परंतु सध्या परिस्थिती पाहता ते या कालावधीत पूर्ण करणे शक्य नसल्याने त्याला मुदतवाढ मिळणार आहे. सध्या जर बघितले तर या मार्गाचे 79% काम पूर्ण झाले आहे व पिलर उभारण्याचे काम शंभर टक्के झालेले आहे. परंतु या मार्गावरील 23 मेट्रोस्थानकांपैकी बारा स्थानकांची कामे पूर्ण झालेली आहेत व इतर स्थानकांची कामे मात्र अपूर्ण आहेत.
यामध्ये स्थानकांवरील जिने तसेच अकरा स्थानकांचे महत्वाचे काम अद्याप बाकी असल्याने व त्यासोबतच विद्यापीठ चौकात इंटरकनेक्टचे काम असल्यामुळे कामाची गती कमी आहे. तसेच या ठिकाणी असलेल्या एचडी लाईनमुळे देखील कामात अडथळा निर्माण झाल्यामुळे दिलेल्या डेडलाईनमध्ये हे काम पूर्ण होण्याची शक्यता कमीत कमी आहे.
सप्टेंबरपर्यंत धावणार का मेट्रो?
हिंजवडी ते शिवाजीनगर हा मेट्रो मार्ग पुढील सहा महिन्यात पूर्ण होणे आता गरजेचे आहे व त्यासाठी आवश्यक असलेले ट्रायल रन आणि काम पूर्ण झाल्यानंतर मेट्रो प्रवासी वाहतुकीसाठी खुली करण्यात येईल. परंतु ही सगळी अपूर्ण कामे सहा महिन्यात पूर्ण होणार का हा एक मोठा प्रश्न आहे.
यामध्ये डॉ. योगेश म्हसे महानगर आयुक्त,पीएमआरडीए यांनी म्हटले आहे की,या प्रकल्पाचे काम मुदतीत पूर्ण होणार नाही व त्यामुळे जाता मुदतवाढ देण्यात आली आहे. करारानुसार संबंधित कंपनीला दंड देखील आकारण्यात येणार आहे व पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.