For the best experience, open
https://m.krushimarathi.com
on your mobile browser.

जमीन,प्लॉट खरेदी करताना ‘या’ गोष्टींची काळजी म्हणजे मानसिक त्रासापासून मुक्ती! कशी कराल कायदेशीर कागदपत्रांची पडताळणी?

05:52 PM Jan 24, 2025 IST | Sonali Pachange
जमीन प्लॉट खरेदी करताना ‘या’ गोष्टींची काळजी म्हणजे मानसिक त्रासापासून मुक्ती  कशी कराल कायदेशीर कागदपत्रांची पडताळणी
land procurement
Advertisement

Tips For Land Procurement:- जमीन किंवा भूखंड म्हणजेच प्लॉटची खरेदी-विक्रीचा व्यवहार हा एक आर्थिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा असा व्यवहार असतो व यामध्ये मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च केला जातो. त्यामुळे अशा प्रकारचे व्यवहार करताना बऱ्याच गोष्टींची काळजी घेऊन ते व्यवहार करणे खूप गरजेचे असते.

Advertisement

नाहीतर उगीचच पैसाही जातो आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. सध्या जर आपण बघितले तर रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये गुंतवणुकीचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे व तितकेच फसवणुकीचे प्रकरणे देखील समोर आल्याचे आपण बघतो.

Advertisement

त्यामुळे अशाप्रकारे जर तुम्हाला देखील जमीन किंवा प्लॉट खरेदी करायचा असेल तर त्या अगोदर काही महत्त्वाच्या गोष्टी माहित करून घेणे गरजेचे आहे. जेणेकरून भविष्यात पैसा जाऊन मानसिक त्रासाला सामोरे जावे लागणार नाही.

Advertisement

जमिनीची खरेदी करण्याअगोदर सखोल चौकशी का करावी?
प्लॉट किंवा जमीन खरेदी करण्याचा जेव्हा विचार केला जातो तेव्हा व्यक्ती आपली आयुष्यभराची जी काही कमाई असते ती त्यामध्ये गुंतवत असते. या दृष्टिकोनातून आपण ज्या जमिन किंवा प्लॉटमध्ये पैसे गुंतवत आहोत ती खरेदी आपल्यासाठी कायदेशीरदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या देखील किती सुरक्षित आहे? याचा शोध हा खूप महत्त्वाचा ठरतो.

Advertisement

दुसरे महत्त्वाचे म्हणजे तुम्ही जी जमीन खरेदी करत असाल ती जमीन कुठल्याही बाबतीत वादग्रस्त आहे का किंवा त्या जमिनीच्या बाबतीत कायदेशीर प्रक्रिया तर सुरू नाही ना? या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत व कायदेशीरदृष्ट्या सदरील जमीन विकण्यायोग्य आहे का नाही? हे देखील तपासणे खूप गरजेचे आहे.

Advertisement

दुसरे महत्वाचे म्हणजे आपल्याला जी व्यक्ती जमिन विकत आहे ती त्या जमिनीचा खरा मालक आहे की नाही हे देखील यामध्ये पाहणे महत्त्वाचे आहे. व्यवहार झाल्यानंतर सदरील प्लॉट किंवा जमिनीची संपूर्ण मालकी हस्तांतरित करण्याचे जे काही अधिकार असतात ते त्या व्यक्तीला आहेत का? हे देखील यामध्ये तपासावे. तसेच संबंधित जमीन किंवा प्लॉटचा विक्री करार आणि मालमत्ता कराची पावती या कागदपत्रांची तपासणी खूप फायद्याचे ठरते.

या अशा सगळ्या गोष्टींमध्ये जर तुम्हाला जास्त माहिती नसेल तर तुम्ही या क्षेत्रातील तज्ञ किंवा वकिलाशी संपर्क साधून त्यांच्यानुसार या प्रक्रिया पार पाडू शकतात. तसेच जमीन विक्री करणाऱ्या व्यक्तीकडून जमिनी संदर्भातील सर्व कागदपत्रे मिळवणे देखील तितकेच गरजेचे आहे.

दुसरे महत्त्वाचे म्हणजे कागदपत्र काळजीपूर्वक तपासावे. तुम्हाला जर जमिनीचे किंवा प्लॉटच्या व्यवहारांमध्ये कुठलाही वाद नको असेल तर तुम्ही मालमत्तेच्या हक्कांचा दावा करता येणाऱ्या मर्यादा लक्षात घ्याव्यात व गेल्या 30 वर्षाच्या जमिनीच्या नोंदी तपासून घेतल्या पाहिजेत.

जमिनीच्या संदर्भातील कायदेशीर कागदपत्रांची पडताळणी कशी कराल?
तुम्हाला कुठलीही जमीन खरेदी करायची असेल तर त्या जमिनीचे कायदेशीर कागदपत्र अगोदर तपासून पाहणे अत्यंत गरजेचे आहे. याकरिता तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या ठिकाणाच्या सब रजिस्ट्रार कार्यालयात जाऊन यासंबंधीचे कागदपत्रे मिळतात. यासाठी तुम्हाला अगोदर त्या कार्यालयात एक शोध अर्ज भरावा लागतो आणि तो एसआरओकडे सादर करावा लागतो.

तसेच अर्जासोबत मालकी हक्काची प्रत आणि तुमच्या ओळखीचा पुरावा जोडणे गरजेचे आहे. अशाप्रकारे तुम्ही या अर्जाच्या माध्यमातून सदरील जमिनीच्या संबंधित व्यवहार, त्या जमिनीची मालकी बद्दल तसेच कायदेशीर दायित्वे इत्यादी बद्दल माहिती मिळते.

महाराष्ट्रात जर बघितले तर सर्व रजिस्ट्रार कार्यालयात नोंदणीकृत वकील किंवा अनुभवी व्यक्ती अशा प्रकारचे मालमत्ता शोध अहवाल तयार करतात. कुठल्याही मालमत्तेचा व्यवहार पूर्ण करण्याअगोदर संबंधित अधिकाऱ्यांनी कायदेशीर कागदपत्रे देखील तपासली गेली पाहिजेत.

अगोदर ‘ही’ प्लॅनिंग नंतर जमिनीची खरेदी
तुम्हाला जर जमीन खरेदी करायची असेल तर यामध्ये तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर पैशांची गुंतवणूक करावी लागते. याकरता तुम्ही विश्वासू व्यक्तीकडून जमिनीची खरेदी करावी किंवा मध्यस्थ टाकावा व त्या माध्यमातून असा व्यवहार पूर्ण करावा.

अशा मालमत्तेतील गुंतवणुकी अगोदर तुमच्या ओळखीच्या व्यक्तीच्या सहकार्याने जमिनीचा शोध घ्यावा किंवा संबंधित क्षेत्रातील जमिनीबद्दल पूर्ण माहिती असलेला प्रॉपर्टी एजंट किंवा कन्सल्टंट शोधावा व त्याच्या माध्यमातून असे व्यवहार करावे. म्हणजे अशाप्रकारे काळजी घेतली तर चुकीचा व्यवहार घडत नाही व पैसे देखील वाया न जाता उगीचच मानसिक त्रास देखील होत नाही.

तुम्ही एखादी जमीन/प्लॉट खरेदीसाठी निवडला तर त्या अगोदर त्या जमिनीच्या मालकाशी एक मीटिंग अरेंज करावी व त्या मीटिंगमध्ये संबंधित जमिनीची सर्व कागदपत्रे तपासावेत व त्यांचे ओळखपत्र देखील तपासावेत. तसेच आजूबाजूला राहणाऱ्या लोकांकडून सदरील जमीन किंवा प्लॉटबद्दल चौकशी करणे कधीही फायद्याचे ठरते.

तसेच जमिनी बाबतचे जुने रेकॉर्ड तपासणे खूप गरजेचे आहे. कारण यामुळे तुम्हाला जमिनीच्या बाबत सुरू असलेल्या अनेक वादांची माहिती देखील मिळू शकते व तुम्ही चुकीच्या व्यवहारात अडकण्यापासून वाचू शकता.