शेतामध्ये पाईपलाईन आणण्यासाठी शेजारचा शेतकरी समस्या निर्माण करत आहे का? तर पटकन वाचा कायदेशीर मार्ग
Pipeline Rule For Farm Land:- पाण्याशिवाय शेती व्यवसाय नाही हे तर त्रिकालबाधित सत्य आहे. त्यामुळे शेतीसाठी पाण्याची सोय करण्यासाठी शेतकरी विविध पर्यायांचा अवलंब करतात. यामध्ये शेतात विहिरी घेणे तसेच बोअरवेल करणे इत्यादी माध्यमातून शेतासाठी पाण्याचा स्त्रोत निर्माण केला जातो व अशा माध्यमातून बागायती शेती करणे शक्य होते.
तसेच बरेच शेतकरी शेताच्या काही अंतरावर जर पाण्याचे स्त्रोत असतील तर त्या ठिकाणाहून पाईपलाईनद्वारे शेतामध्ये पाणी आणतात व शेतामध्ये पाण्याची व्यवस्था निर्माण करतात. परंतु अशा पद्धतीने जेव्हा शेतापर्यंत पाईपलाईन आणली जाते तेव्हा ती पाईपलाईन इतर शेतकऱ्यांच्या शेतातून आपल्याला आणावी लागते.
तसे पाहायला गेले तर यामध्ये बऱ्याचदा शेतकरी कुठल्याही प्रकारचा अडथळा मात्र आणत नाहीत. परंतु काही काही शेतकरी मात्र अशा त्यांच्या शेतातून पाईपलाईन नेण्याला अडथळा आणतात किंवा नकार देतात.
अशावेळी मात्र खूप मोठी समस्या निर्माण होऊ शकते. जर अशाच पद्धतीची समस्या तुमच्या बाबतीत देखील आली असेल तर त्यासाठीच्या कायदेशीर मार्गांची तुम्हाला माहिती असणे खूप गरजेचे आहे.
यासाठी नेमके कोणते कायदेशीर मार्ग आहेत? ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या शेतात कायदेशीर मार्गाने हक्काची पाईपलाईन आणू शकाल, त्याचीच माहिती थोडक्यात आपण बघू.
अगोदर पटकन हा नियम वाचा
यासंबंधी जर आपण महत्त्वाचा असलेला महाराष्ट्र जमीन महसूल कायदा 1967 बघितला तर त्या कायद्यानुसार एखाद्या शेतकऱ्याने जर दुसऱ्या शेतकऱ्याच्या जमिनीतून किंवा शेतीतून पाईपलाईन करण्याचा निर्णय घेतला असेल तर अगोदर त्याला एका विहित नमुन्यामध्ये तहसील कार्यालयाकडे अर्ज करणे गरजेचे असते.
शेजारील शेतकरी त्याच्या शेतातून पाईपलाईन टाकायला नकार देत असेल तर संबंधित शेतकरी कलम 1966 च्या 49 नियमानुसार तहसीलदाराकडे याबाबतीत अर्ज करू शकतात.
जेव्हा अशा तक्रारीचा अर्ज तहसीलदारांना मिळतो किंवा प्राप्त होतो त्यानंतर संबंधित पाईपलाईन ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून जाणार आहेत त्यांना कायदेशीर नोटीस बजावली जाते आणि त्यांचे म्हणणे मांडायला त्यांना सांगण्यात येते. सदरील शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकल्यानंतर तहसीलदार पाईपलाईन संदर्भात निर्णय घेत असतात.
पाईपलाईनसाठीचे कायदेशीर नियम काय आहेत?
1- ज्या शेतकऱ्याला पाईपलाईन न्यायची आहे असा अर्जदार शेतकरी जेव्हा पाईपलाईन करत असेल व ती पाईपलाईन करताना जर शेजारच्या शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान झाले तर मात्र त्याची भरपाई करून देणे त्यामध्ये अनिवार्य असते.
2- तसेच सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे पाईपलाईन करताना सदरील शेतकऱ्याचे कमीत कमी नुकसान होईल याची काळजी घेणे महत्वाचे असून त्यासोबतच पाईपलाईन ही कमी अंतरावरून नेण्यात यावी व जमिनीत किमान एक मीटर आतमध्ये ती खोदली जावी असा नियम आहे.
3- तसेच अर्जदार शेतकऱ्याने पाईपलाईनच्या कामासाठी शेतकऱ्याची जमीन खोदलेली असेल ती जमीन स्वतःच्या खर्चाने पूर्ववत करणे यामध्ये खूप गरजेचे असते.