कृषी बातम्यासरकारी योजनाबाजारभावयशोगाथाहवामानस्पेशल स्टोरी
Advertisement

Success Story:- फक्त 12 हजाराची गुंतवणूक, महिन्याला 50 हजारांचा नफा.. वाचा या शेतकऱ्यांची कमाईची भन्नाट ट्रिक

01:37 PM Feb 15, 2025 IST | Krushi Marathi
mushroom

Mushroom Farming:- अनेक शेतकरी कमी जागा आणि भांडवलाअभावी शेतीपूरक व्यवसाय सुरू करण्यास धजावत नाहीत. मात्र बिहारमधील अवधेश मेहता यांनी कमी खर्च आणि मर्यादित जागेत मोठा नफा मिळवण्याचा एक आदर्श मार्ग दाखवला आहे. त्यांनी पारंपरिक शेतीला आधुनिक दृष्टिकोन दिला आणि मशरूम उत्पादनाच्या माध्यमातून एक नवा उत्पन्न स्रोत निर्माण केला. विशेष म्हणजे ही शेती करण्यासाठी मोठ्या शेतजमिनीची आवश्यकता नाही तर घराच्या एका कोपऱ्यातही सहज सुरू करता येते. त्यामुळे कमी भांडवल असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा व्यवसाय एक आदर्श पर्याय ठरत आहे.

Advertisement

केवळ 12 हजार रुपयांत सुरू केले यशस्वी उत्पादन

Advertisement

अवधेश मेहता यांनी केवळ 12,000 रुपयांच्या सुरुवातीच्या गुंतवणुकीत मशरूम उत्पादन सुरू केले. त्यांनी 200 बॅग तयार केल्या. ज्याची किंमत प्रत्येकी 60 रुपये होती. एका बॅगमधून साधारणतः 1 ते 1.5 किलो मशरूम उत्पादन होत आहे. सध्या बाजारात मशरूमची किंमत 250 रुपये प्रति किलो असल्याने त्यांना केवळ पहिल्या उत्पादनातून 50,000 रुपयांपर्यंतचा नफा मिळाला. कमी खर्चात मोठे उत्पन्न मिळवण्याचे हे मॉडेल इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.

मशरूम शेती – कमी वेळेत जास्त नफा देणारे पीक

Advertisement

मशरूम उत्पादन ही एक वैज्ञानिक प्रक्रिया असून थंड व ओलसर वातावरणात ही शेती उत्तम प्रकारे विकसित होते. मशरूमच्या वाढीसाठी 20-25 अंश सेल्सिअस तापमान आणि 80-85% आर्द्रता आवश्यक असते. मशरूमच्या बियाण्यांना गव्हाच्या किंवा भाताच्या पेंढ्यात मिसळून विशेष प्रकारच्या बॅग तयार केल्या जातात. या बॅग योग्य तापमानात ठेवल्यास केवळ 25-30 दिवसांत मशरूम विक्रीसाठी तयार होते. पारंपरिक शेतीमध्ये एका हंगामात उत्पादन घेण्यासाठी किमान तीन ते चार महिने लागतात.मात्र मशरूमच्या बाबतीत हा कालावधी फारच कमी असल्याने हा व्यवसाय कमी वेळात अधिक नफा देणारा ठरतो.

Advertisement

शासकीय अनुदान योजनांचा मोठा फायदा

शेतकऱ्यांना मशरूम उत्पादनासाठी प्रोत्साहन देण्यासाठी बिहार सरकार विशेष योजना राबवत आहे. या योजनेंतर्गत राज्य सरकार शेतकऱ्यांना मशरूम किटवर 90% अनुदान देत आहे. यामुळे शेतकऱ्यांना केवळ 5 ते 6 रुपयांत मशरूम किट मिळू शकते. बिहार कृषी विभागाच्या माहितीनुसार या योजनेअंतर्गत एका शेतकऱ्याला किमान 25 आणि जास्तीत जास्त 100 मशरूम किट उपलब्ध करून दिल्या जातात. त्यामुळे कमी खर्चात व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी ठरत आहे. या योजनेचा लाभ घेतल्यास, अगदी अल्प गुंतवणुकीत मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेता येऊ शकते.

शेतकऱ्यांसाठी आदर्श व्यवसाय – मशरूम शेतीसोबत मत्स्यपालनही सुरू

अवधेश मेहता यांच्या यशस्वी प्रयोगामुळे अनेक शेतकऱ्यांनी मशरूम उत्पादनाला सुरुवात केली आहे. पारंपरिक शेतीपेक्षा कमी जागेत आणि कमी खर्चात अधिक नफा देणारा हा व्यवसाय असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी तो एक उत्तम पर्याय ठरत आहे. विशेष म्हणजे अवधेश मेहता यांनी पारंपरिक शेती सोडली नाही. तर मशरूम उत्पादनासोबतच मत्स्यपालनही सुरू ठेवले आहे. मत्स्यपालन हा देखील अल्प भांडवल आणि योग्य व्यवस्थापनाच्या आधारे अधिक उत्पन्न देणारा व्यवसाय आहे. मशरूम आणि मत्स्यपालन या दुहेरी शेतीतून ते वर्षाला हजारो रुपयांची कमाई करत आहेत.

Next Article