कृषी बातम्यासरकारी योजनाबाजारभावयशोगाथाहवामानस्पेशल स्टोरी
Advertisement

महाराष्ट्रातील 'या' गावांमध्ये नवीन राशन धान्य दुकानासाठी परवाना वाटप सुरू! कुठे करावा लागणार अर्ज, कोणकोणती कागदपत्रे लागतात? वाचा....

09:20 AM Oct 29, 2024 IST | Krushi Marathi
Ration Shop News

Ration Shop News : अलीकडे शहरी तसेच ग्रामीण भागात नोकरी ऐवजी व्यवसायाला प्राधान्य दिले जात आहे. विविध प्रकारचे व्यवसाय अलीकडील काही वर्षांमध्ये सुरू झाले आहेत. राशन धान्य दुकान सुरु करणे हा सुद्धा एक चांगला व्यवसाय आहे.

Advertisement

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी मात्र परवाना घ्यावा लागतो. रास्त भाव दुकानदार परवाना घेतल्यानंतर नवीन राशन दुकान ओपन करता येते. प्रत्येक गावासाठी सरकारच्या माध्यमातून हा परवाना दिला जात असतो.

Advertisement

अनेकांनी हे परवाने काढले आहेत आणि राशन दुकान सुरू केले आहे. दरम्यान आज आपण राशन दुकानाचा परवाना काढण्यासाठी नेमकी कोण कोणती कागदपत्रे लागतात, त्यासाठी अर्ज कुठे करावा लागतो, याच्या पात्रता काय आहेत याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

राशन दुकान परवाना साठी आवश्यक असणारे कागदपत्रे
राशन दुकान परवाना काढण्यासाठी काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. आधार कार्ड, घर टॅक्स पावती/सातबारा/मालकी पत्र, गटाचे वार्षिक लेखे तपासणी केल्याचा अहवाल, ग्राम सभेचा ठराव दुकान मागणी पत्र, गट स्थापन केल्याचे नोंदणी पत्र, गुन्हा दाखल नसल्या बाबत शपथपत्र ही काही आवश्यक कागदपत्रे आहेत जी की अर्जदाराला अर्ज करताना सादर करावी लागतात.

Advertisement

किंबहुना यामध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतो. काही ठिकाणी याहीपेक्षा अधिकचे कागदपत्रे लागू शकतात. यामुळे कागदपत्रांची सविस्तर माहिती तुम्हाला संबंधित अधिकाऱ्यांकडून घ्यावी लागणार आहे.

Advertisement

आवश्यक पात्रता
नवीन राशन दुकान परवाना मिळवण्यासाठी काही पात्रता निश्चित करण्यात आल्या आहेत. पहिली पात्रता म्हणजे अर्जदार हा भारतीय असला पाहिजे. तो किमान दहावी उत्तीर्ण असायला हवा. ज्या ठिकाणी नवीन राशन धान्य दुकानासाठी परवाना दिला जात आहे तो त्या भागातीलच रहिवासी असायला हवा.

रेशन दुकानाशी संबंधित पुस्तके आणि लेखा खात्याची देखभाल करण्याची योग्यता सदर अर्जदारामध्ये असायला हवी. रिक्त स्थानाची अधिसूचना ज्या जागेवर आहे त्या जागेवर अर्जदारास वैध अधिकार असणे आवश्यक आहे. रेशन दुकान अशा ठिकाणी असायला हवं जिथे नागरिक संस्थेने येऊ शकते. दुकानापुढे पंधरा फुटांचा रस्ता असायला हवा.

अर्ज कसा करावा लागणार?
नवीन रेशन दुकानाचा परवाना मिळवण्यासाठी तुम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयात जावे लागणार आहे आणि तेथून अर्ज घ्यायचा आहे. हा अर्ज ऑनलाइन पद्धतीने सुद्धा मिळू शकतो.

ऑफलाइन किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज मिळवल्यानंतर तुम्हाला तो अर्ज बिनचूक भरायचा आहे, आणि त्यासोबत सांगितलेली सर्व कागदपत्रे जोडायची आहेत. यानंतर हा अर्ज संबंधित अधिकाऱ्याकडे तुम्हाला जमा करावा लागणार आहे.

Tags :
Ration Shop News
Next Article