For the best experience, open
https://m.krushimarathi.com
on your mobile browser.

बातमी कामाची ! ‘इतके’ दिवस धान्य भरले नाही तर Ration Card रद्द होते, रेशन कार्डचा हा नियम तुम्हाला माहितीये का ?

01:48 PM Dec 06, 2024 IST | Krushi Marathi
बातमी कामाची   ‘इतके’ दिवस धान्य भरले नाही तर ration card रद्द होते  रेशन कार्डचा हा नियम तुम्हाला माहितीये का
Ration Card News
Advertisement

Ration Card News : रेशन कार्ड धारकांसाठी आजची ही बातमी खूपच कामाची ठरणार आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून देशभरातील गरजवंत लोकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. गरीब लोकांना स्वस्त दरात अन्नधान्य सुद्धा उपलब्ध करून दिले जात आहे.

Advertisement

यासाठी संबंधित लाभार्थ्यांकडे रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. मात्र रेशन कार्ड चे काही नियम देखील आहेत. या नियमांचे उल्लंघन झाले तर रेशन कार्ड रद्द होते. दरम्यान आज आपण रेशन कार्ड च्या संदर्भातील अशाच एका नियमाची माहिती पाहणार आहोत.

Advertisement

इतके दिवस धान्य घेतले नाही तर रेशन कार्ड रद्द होते

Advertisement

केंद्रातील सरकारच्या माध्यमातून राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत रेशन कार्ड असणाऱ्या कुटुंबाला स्वस्त दरात अन्नधान्य दिले जाते. गहू तांदूळ ज्वारी बाजरी सारखे धान्य रेशन कार्डधारकांना मिळते.

Advertisement

महत्त्वाची बाब अशी की कोरोना काळापासून रेशन कार्ड धारकांना मोफत अन्नधान्य उपलब्ध करून दिले जात आहे. ज्या कुटुंबाकडे अंत्योदय शिधापत्रिका आहे अशा कुटुंबाला तर गहू तांदूळ सोबतच साखर सुद्धा देतात.

Advertisement

पण जर रेशन कार्ड धारकांनी सलग काही महिने रेशन भरले नाही तर त्यांचे रेशन कार्ड रद्द होऊ शकते. याबाबत अनेकांना माहिती नसते यामुळे रेशन कार्डधारकांना अडचणीचा सामना करावा लागतो.

केंद्र शासन आणि तयार केलेल्या नियमानुसार जर शिधापत्रिकाधारकांनी सलग सहा महिने रेशन कार्डचा वापर करून धान्य भरले नाही तर त्यांचे रेशन कार्ड रद्द होते. जे लोक सलग सहा महिने धान्याचा लाभ घेण्यासाठी जात नाहीत त्यांच्यासाठी रेशन कार्डच्या सुविधा रद्द होतात.

सलग सहा महिने रेशन घेतले नाही तर तुम्हाला याची आवश्यकता नाही असे समजले जाते. अशा वेळेस मग त्यांचे रेशन कार्ड रद्द केले जाते. म्हणजे सहा महिने रेशन भरले नाही तर तुमचे रेशन कार्ड सुद्धा रद्द होऊ शकते.

दरम्यान जर काही कारणास्तव तुम्हाला सलग सहा महिने रेशन घेता आले नाही आणि तुमचे रेशन कार्ड जर रद्द झाले तर तुम्ही ते रेशन कार्ड पुन्हा एकदा ऍक्टिव्हेट करू शकता, पुन्हा एकदा सुरू करू शकता. यासाठी मात्र तुम्हाला रेशन कार्ड दुकानात जाऊन काही आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

Tags :